NCP MLA Disqualification Verdict Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दोन्ही गटांमधील एकही आमदार अपात्र नाही, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. हा निकाल १० जानेवारी रोजी त्यांनी दिलेल्या निकालानुसारच हाही निकाल असल्याचं आता बोललं जात आहे.
जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
NCP MLA Disqualification Live Updates, 15 February 2024: मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!
नाशिक : श्री गंगा गोदावरी आरतीचा उपक्रम समस्त हिंदू समाजाला समरसतेचा संदेश देणारा ठरावा, अशी श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची सर्वसमावेशक भूमिका आहे. कोणी विरोधासाठी लाठ्या आणल्यास प्रसाद समजून स्वीकार करण्यात येईल. या वादाचे कारण आर्थिक निधीची जमवाजमव असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी केला.
धुळे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करुन गुरुवारी धुळे येथे सकल मराठा समाजातर्फे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जाहीर निषेध करण्यात आला. भविष्यात जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यास राणे यांना फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी समाजाच्या सुकाणू समितीतर्फे देण्यात आला.
मराठा समाजाचे नेते जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने मराठा समाजातर्फे नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला. जरांगे यांना आम्ही मराठा नेता मानत नाही, असे राणे यांनी म्हटले होते. जरांगे हे आमचे क्रांतीसूर्य आहेत, असे मराठा समाजातर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज जरांगे यांच्या पाठिशी असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी दिवसागणिक वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत महसूल पथकांवर हल्ले होत आहेत. वाळूमाफियांकडून महसूल पथकांवर नजर ठेवली जात आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कारवाई मोहिमेतील महिला तहसीलदारांच्या वाहनाचा आठ ते १० दुचाकींवरुन पाठलाग होत असलेली चित्रफीत प्रसारित झाली आहे.
नाशिक : शिवसेनेचे २५ वर्षे आमदार राहिलेले ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांनी अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मागण्या मांडण्याच्या निमित्ताने अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
पुणे : नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे आढळून येत असल्याने आता ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. या औषध फवारणीमुळे कीटकांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
कल्याण : उतार वयात एकाकी जीवन जगणाऱ्या, घर नसलेल्या, कौटुंबिक जीवनापासून दूर असलेल्या, काही व्याधीग्रस्त चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलाकारांना आयुष्याच्या उतार वयात आनंदी जीवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने भिवंडी, शहापूर तालुक्यातील पडघा पिसे, खर्डी, बेळवड परिसरात महूसल विभागाच्या माध्यमातून जमीन शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या मिल्हे जिल्हा परिषद शाळेत सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आणखी ९० शाळांमध्ये ही योजना राबविण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले होते. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ३५ शाळांमध्ये सौर यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध कामांचा प्रवाशांना फायदा कधी होईल याबाबत कल्पना नाही. मात्र सध्या वाढत्या पाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
सर्वोच्च न्यायालय संविधानातील तरतुदींप्रमाणे काम करतं. लोकांपासून माहिती लपवणं हा स्वातंत्र्याचा अवमान आहे. लोकांना हे कळलं पाहिजे की कुणी किती पैसे दिले. त्यांनी सांगितलंय की २०१९ पासून जे जे काही झालं, ते जाहीर करा. आता कळे की १०० रुपयांपैकी ९९ रुपये कुणाकडून कुठल्या पक्षाकडे गेले – जितेंद्र आव्हाड</p>
पुणे : महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला असून, जूनअखेरपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत.
पिंपरी : आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी राहिल्याने महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. एक हजार थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला अशोक चव्हाण यांचं आश्चर्य वाटतं. कारण गेल्या आठवड्यात देशाच्या संसदेत…!”
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याआधीच सुप्रिया सुळेंनी पक्षाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. “जर शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरले, तर आम्ही कोर्टात जाऊ. त्यात समस्या काय आहे?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मला उमेदवारी दिल्याबद्दल मी अजित पवार व इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. मी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर दुसऱ्या कुणालातरी संधी मिळेल. आम्ही जे काही केलं, ते योग्यच आहे. त्यासाठी कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.
आमदार अपात्रता प्रकरणात आमच्या बाजूने निकाल लागेल अशी आम्ही प्रार्थना करतो.
इलेक्टोरल बॉण्ड्सची आधीची पद्धत कायद्यानंच केली होती. त्यात बदल करायचा असेल तर त्याअनुषंगाने अभ्यास होईल.
– प्रफुल्ल पटेल, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस</p>
आजच्या बैठकीसाठी सर्व काँग्रेस आमदार येत आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका – नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
#WATCH | Maharashtra Congress chief Nana Patole says "Rumours are being spread that Congress MLAs are not coming for the meeting today which is not true. We have our 2 day session in Lonavala from tomorrow and MLAs will move from there. A few MLAs are not coming today due to… pic.twitter.com/ITdRu2uULE
— ANI (@ANI) February 15, 2024
भाजपा हा फुगलेला बेडूक आहे. तो कितीही फुगला तरी बैल होणार नाही. हे प्रत्येक वेळी आकडे फुगवून सांगतात. शेतकरी मूर्ख आहे का जो हजारोंच्या संख्येनं दिल्लीच्या दिशेनं चालत निघालाय. तुम्ही त्यांना मूर्ख समजता का? – संजय राऊत</p>
शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या संदर्भात या निकालाचे निकष सध्या चर्चेत आहेत. यात प्रामुख्याने दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी त्यांनी विधिमंडळ पक्षादेशाचा (व्हीप) भंग केला आहे का? हा मुद्दा प्रामुख्याने पाहिला जाईल. त्याचबरोबर आमदारांचं जाहीर वर्तन पक्षविरोधी आहे का? विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणारं आहे का? या मुद्द्यांचाही समावेश राहुल नार्वेकर यांच्या निकालपत्रात असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकमेकांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका सादर केली होती. विधानसभा अध्यक्षांना निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिलेली मुदत आज संपत असून आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालात कुठल्याच आमदाराला अपात्र ठरवलेलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल जाहीर होणार असून शिवसेनेच्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचेही सर्व आमदार पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदारही पात्र ठरणार ? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
NCP MLA Disqualification Live Updates, 15 February 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!