Maharashtra Election Results 2019 Telecast: विधानसभा निवडणुकाचं चित्र आता स्पष्ट होत चाललं आहे. हाती आलेल्या कलांनुसार भाजपाचं स्वबळाचं स्वप्न भंगलं आहे. भाजपाला जरी सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना स्वबळावर सत्ता मिळवता येणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

एकीकडे ही निवडणूक एकतर्फी होणार असं वाटतं होतं. परंतु ही निवडणूक एकतर्फी झाली नसल्याचं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Delhi Elections 2025
Delhi Elections 2025 : भाजपाला २६ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची तर काँग्रेसला चमत्काराची आशा; दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’समोर सत्तेत आल्यापासून सर्वात मोठे आव्हान

Live Blog

Maharashtra Election Results Live: 2019 Vidhan Sabha Election Results Maharashtra Live Updates

17:34 (IST)24 Oct 2019
लातूरमध्ये देशमुख बंधूंचा विजय

लातूरमध्ये देशमुख बंधूंचा विजय. अमित देशमुख लातूरमधून तर धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीणमधून विजय झाला आहे. अमित देशमुख यांनी १ लाख १९ हजार मतांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला.

17:29 (IST)24 Oct 2019
सुनील शेळके यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता अखेरीस संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेडगे यांचा पराभव केला आहे. सुनील शेळके यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं असून मोठ्या जल्लोषात ते हा विजय साजरा करत आहेत.

16:48 (IST)24 Oct 2019
१५ जणांशी संपर्क, महायुतीसोबत येतील : मुख्यमंत्री

महायुतीला जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे. महायुतीचं सरकार येणार यात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रात चांगला निकाल मिळाला. ही विश्लेषण करण्याची वेळ नाही. गेल्या निवडणुकीत २०७ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळालं आहे. यावेळी मतांची टक्केवारीही वाढली आहे. जनतेचं मोठं समर्थन मिळालं. राज्यातील सर्व भागांमध्ये कामगिरी उत्तम राहिली आहे. साताऱ्याचा लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. तसंच परळीचा निकालही धक्कादायक आहे. काही मंत्रीही पराभूत झाले. त्याचं नक्कीच विश्लेषण करू. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली. त्याचा फटका आम्हाला बसला. १५ जणांचा संपर्क झाला. ते महायुतीसोबत येणार आहेत,  अशी माहिती मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

16:37 (IST)24 Oct 2019
प्रत्येक वेळी तडजोड करणार नाही - उद्धव ठाकरे

महायुतीला सरकार स्थापन करता येईल इतक्या जागा आमच्या आल्या आहेत. जागावाटपावेळी जी तडजोज करण्यात आली होती. त्यावेळी जी तडजोड केली ती यावेळी करण्यात येणार नाही. विधानसभेचा निकाल हा सर्वांचे डोळे उघडायला लावणारा आहे. फॉर्म्युलावर निर्णय झाल्यास सत्ता स्थापनेचा दावा करणार, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

16:28 (IST)24 Oct 2019
अजित पवारांची 'ती' धमकी ठरली खरी

लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं होती. यावेली त्यांनी शिवतारे यांना धमकी दिली होती.
सविस्तर वाचा

16:23 (IST)24 Oct 2019
पंकज भुजबळ पराभूत

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा पराभव. नांदगाव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याकडून पराभव

16:08 (IST)24 Oct 2019
पवारांच्या सभेचा राष्ट्रवादीला फायदा

पवारच ठरले राजकारणातले तेल लावलेले पैलवान; अनेक ठिकाणी ‘राष्ट्रवादी पुन्हा’
सविस्तर वाचा

16:05 (IST)24 Oct 2019
आम्ही कमी पडलो; काँग्रेसची कबुली

या निवडणुकीत मतदार आमच्या सोबत होते. परंतु आम्ही कमी पडलो असं मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे. 
सविस्तर वाचा

15:58 (IST)24 Oct 2019
प्रमोद पाटील कल्याण ग्रामीणमधून विजयी

मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयानं मनसेचं खातं उघडलं आहे.

15:15 (IST)24 Oct 2019
मुक्ताई नगरमधून रोहिणी खडसे पराभूत

मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत, एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे

14:51 (IST)24 Oct 2019
सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे विजयी

सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत. अटीतटीच्या लढतीत दिलीप माने यांचा पराभव

14:33 (IST)24 Oct 2019
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 

14:18 (IST)24 Oct 2019
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी

वरळी मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला. 

14:13 (IST)24 Oct 2019
बार्शीत सोपल यांचा पराभव

बार्शीमध्ये दिलीप सोपल यांचा पराभव. सोपल यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता.

14:02 (IST)24 Oct 2019
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे विजयी झाले आहेत. त्यांनी ६१ हजार ५०० मतांनी विजय मिळवला आहे.

13:52 (IST)24 Oct 2019
चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी

रत्नागिरीत शिवसेनेचे राजन साळवी (राजापूर), उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (गुहागर) आणि योगेश कदम (दापोली) यांची विजयी आघाडी. चिपळूणमधून शेखर निकम (राष्ट्रवादी) विजयी

13:33 (IST)24 Oct 2019
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल- मनोहर जोशी

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नव्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल, असं ते म्हणाले.

13:33 (IST)24 Oct 2019
परळीत पंकजा मुंडे पराभूत

परळीत पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, मी पराभव स्वीकारत असून आपल्या वडिलांनी पराभव कसा खांद्यावर घ्यायचा हे शिकवलं असल्याचं त्या म्हणाल्या.

13:23 (IST)24 Oct 2019
मातोश्रीच्या अंगणात शिवसेना पराभूत

मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांनी महाडेश्वर यांचा पराभव केला आहे. त्यांच्या समोर अपक्ष उभ्या असलेल्या तृप्ती सावंत यांचा फटका महाडेश्वरांना बसला आहे.

13:18 (IST)24 Oct 2019
अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी अणुशक्ती नगरमधून विजय मिळवला आहे. 

13:17 (IST)24 Oct 2019
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विजयी

सिल्लोडमध्ये शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार विजयी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.

13:10 (IST)24 Oct 2019
बोरीवलीत नोटाला मोठं मतदान

बोरीवलीमध्ये नोटाला १० हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर लातुरमध्येही अनेक मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. लातुरमध्येही नोटाला १६ हजार मतं मिळाली आहेत.

12:40 (IST)24 Oct 2019
विश्वजित कदमांचा मोठा विजय

पळूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार  विश्वजीत कदम यांचा १ लाख ५५ हजार मतांनी विजय झाला आहे.

12:38 (IST)24 Oct 2019
पडळकरांचं डिपॉझिट जप्त

मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ म्हटलेल्या पडळकरांचं डिपॉझिट जप्त. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 

12:34 (IST)24 Oct 2019
वसई-विरारमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
फोटो : अमित चक्रवर्ती

12:30 (IST)24 Oct 2019
पुण्यात मुक्ता टिळक विजयी

पुण्यातील भाजपाच्या उमेदवार आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहे. गिरीष बापट यांना खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या जागी कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली होती.

फोटो : सागर कासार

12:25 (IST)24 Oct 2019
ठाण्याचा गड शिवसेनेने राखला

ठाण्यात शिवसेनेने आपला गड राखला असून ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती. 

12:21 (IST)24 Oct 2019
सिंदखेडमध्ये जयकुमार रावल विजयी

सिंदखेडमधून भाजपचे उमेदवार आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल विजयी झाले आहेत.

12:17 (IST)24 Oct 2019
कोल्हापूर शहर: चंद्रकांत जाधव विजयी

कोल्हापूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले आहेत.

12:14 (IST)24 Oct 2019
पालघरमधून श्रीनिवास वनगा विजयी

पालघरमध्ये शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला आहे. श्रीनिवास वनगा हे भाजपाचे दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र आहे. शिवसेनेने लोकसभेऐवजी त्यांना विधानसभेला उमेदवारी जाहीर केली होती.

12:13 (IST)24 Oct 2019
मावळमध्ये भाजपाच्या मोठ्या फरकानं पराभव

मावळमध्ये भाजपाच्या बाळा भेगडे यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी तब्बल १ लाख १६ हजार मतांनी पराभव केला.

12:08 (IST)24 Oct 2019
मानखुर्दमध्ये अबू आझमी आघाडीवर

मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात १४ व्या फेरीच्या अखेरीस समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ५३ हजार ६००, तर शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांना १४ हजार ७७२ आणि अपक्ष उमेदवार मोहम्मद सिराज यांना ९ हजार २७९ मतं मिळाली आहेत. 

12:03 (IST)24 Oct 2019
निकाल इतिहास घडवेल : धनंजय मुंडे

परळी विधानसभा मतदारसंघातील निकाल इतिहास घडवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

11:34 (IST)24 Oct 2019
निकाल इतिहास घडवेल - धनंजय मुंडे

परळी विधानसभा मतदारसंघातील निकाल इतिहास घडवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.

11:26 (IST)24 Oct 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ हजार मतांनी आघाडीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ८ हजार ३९८ मतांनी आघाडीवर आहेत.

11:23 (IST)24 Oct 2019
वसई-विरारमध्ये ठाकूर पिता पुत्र आघाडीवर

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. दहाव्या फेरी अखेरीस हितेंद्र ठाकूर १६ हजार ८२० मतांनी आघाडीवर आहेत. तर चौथ्या फेरी अखेरीस क्षितीज ठाकूर हे ९ हजार १४९ मतांनी आघाडीवर आहेत.

11:21 (IST)24 Oct 2019
कल्याण ग्रामीण: शिवसेना मनसेत कडवी झुंज

कल्याण ग्रामीणमध्ये नवव्या फेरी अखेरीस पुन्हा एकदा कडवी झुंज पहायला मिळत आहे. मनसेच्या राजू पाटील यांना  २९ हजार ३०३ तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे  २९ हजार १२६ मत मिळाली आहेत. पाटील यांनी १७७ मतांची आघाडी घेतली आहे.

11:02 (IST)24 Oct 2019
सोलापूर दक्षिण: सुभाष देशमुख आघाडीवर

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी ३ हजार ९१० मतांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीअखेरीस देशमुख यांना १९ हजार ९४६ मतं मिळाली आहेत.

10:53 (IST)24 Oct 2019
शरद पवार पत्रकार परिषद घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दुपारी दी़ड वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते या पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

10:44 (IST)24 Oct 2019
सुमनताई पाटील यांना विक्रमी आघाडी 

सांगली : तासगाव – कवठेमहांकाळ – राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आर.आर. पाटील आघाडीवर, ४२ हजार ११४ मतांची विक्रमी आघाडी

Story img Loader