Maharashtra Election Results 2019 Telecast: विधानसभा निवडणुकाचं चित्र आता स्पष्ट होत चाललं आहे. हाती आलेल्या कलांनुसार भाजपाचं स्वबळाचं स्वप्न भंगलं आहे. भाजपाला जरी सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना स्वबळावर सत्ता मिळवता येणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकीकडे ही निवडणूक एकतर्फी होणार असं वाटतं होतं. परंतु ही निवडणूक एकतर्फी झाली नसल्याचं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
Live Blog
Maharashtra Election Results Live: 2019 Vidhan Sabha Election Results Maharashtra Live Updates
Highlights
मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता अखेरीस संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेडगे यांचा पराभव केला आहे. सुनील शेळके यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं असून मोठ्या जल्लोषात ते हा विजय साजरा करत आहेत.
महायुतीला जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे. महायुतीचं सरकार येणार यात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रात चांगला निकाल मिळाला. ही विश्लेषण करण्याची वेळ नाही. गेल्या निवडणुकीत २०७ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळालं आहे. यावेळी मतांची टक्केवारीही वाढली आहे. जनतेचं मोठं समर्थन मिळालं. राज्यातील सर्व भागांमध्ये कामगिरी उत्तम राहिली आहे. साताऱ्याचा लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. तसंच परळीचा निकालही धक्कादायक आहे. काही मंत्रीही पराभूत झाले. त्याचं नक्कीच विश्लेषण करू. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली. त्याचा फटका आम्हाला बसला. १५ जणांचा संपर्क झाला. ते महायुतीसोबत येणार आहेत, अशी माहिती मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महायुतीला सरकार स्थापन करता येईल इतक्या जागा आमच्या आल्या आहेत. जागावाटपावेळी जी तडजोज करण्यात आली होती. त्यावेळी जी तडजोड केली ती यावेळी करण्यात येणार नाही. विधानसभेचा निकाल हा सर्वांचे डोळे उघडायला लावणारा आहे. फॉर्म्युलावर निर्णय झाल्यास सत्ता स्थापनेचा दावा करणार, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं होती. यावेली त्यांनी शिवतारे यांना धमकी दिली होती.
सविस्तर वाचा
अजित पवारांनी ‘करून दाखवलं;’ त्यांची ‘ती’ धमकी ठरली खरी https://t.co/iMJfJbWO4z
— LoksattaLive (@LoksattaLive) October 24, 2019
पवारच ठरले राजकारणातले तेल लावलेले पैलवान; अनेक ठिकाणी ‘राष्ट्रवादी पुन्हा’
सविस्तर वाचा
पवारच ठरले राजकारणातले तेल लावलेले पैलवान; अनेक ठिकाणी ‘राष्ट्रवादी पुन्हा’https://t.co/81ioszdXbC@NCPspeaks @MumbaiNCP @PawarSpeaks
— LoksattaLive (@LoksattaLive) October 24, 2019
या निवडणुकीत मतदार आमच्या सोबत होते. परंतु आम्ही कमी पडलो असं मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे.
सविस्तर वाचा
… पण आम्हीच कमी पडलो; काँग्रेसने दिली कबुली https://t.co/vuZq7lOcGu
— LoksattaLive (@LoksattaLive) October 24, 2019
ठाण्यात शिवसेनेने आपला गड राखला असून ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ८ हजार ३९८ मतांनी आघाडीवर आहेत.
#MaharashtraElections2019: CM Devendra Fadnavis contesting from Nagpur South-West Constituency is leading by a margin of 8398 votes (file pic) pic.twitter.com/JTo8Vs4B4R
— ANI (@ANI) October 24, 2019
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. दहाव्या फेरी अखेरीस हितेंद्र ठाकूर १६ हजार ८२० मतांनी आघाडीवर आहेत. तर चौथ्या फेरी अखेरीस क्षितीज ठाकूर हे ९ हजार १४९ मतांनी आघाडीवर आहेत.
Highlights
लातूरमध्ये देशमुख बंधूंचा विजय. अमित देशमुख लातूरमधून तर धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीणमधून विजय झाला आहे. अमित देशमुख यांनी १ लाख १९ हजार मतांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला.
मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता अखेरीस संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेडगे यांचा पराभव केला आहे. सुनील शेळके यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं असून मोठ्या जल्लोषात ते हा विजय साजरा करत आहेत.
महायुतीला जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे. महायुतीचं सरकार येणार यात कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रात चांगला निकाल मिळाला. ही विश्लेषण करण्याची वेळ नाही. गेल्या निवडणुकीत २०७ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीपेक्षा चांगलं यश मिळालं आहे. यावेळी मतांची टक्केवारीही वाढली आहे. जनतेचं मोठं समर्थन मिळालं. राज्यातील सर्व भागांमध्ये कामगिरी उत्तम राहिली आहे. साताऱ्याचा लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. तसंच परळीचा निकालही धक्कादायक आहे. काही मंत्रीही पराभूत झाले. त्याचं नक्कीच विश्लेषण करू. दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली. त्याचा फटका आम्हाला बसला. १५ जणांचा संपर्क झाला. ते महायुतीसोबत येणार आहेत, अशी माहिती मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महायुतीला सरकार स्थापन करता येईल इतक्या जागा आमच्या आल्या आहेत. जागावाटपावेळी जी तडजोज करण्यात आली होती. त्यावेळी जी तडजोड केली ती यावेळी करण्यात येणार नाही. विधानसभेचा निकाल हा सर्वांचे डोळे उघडायला लावणारा आहे. फॉर्म्युलावर निर्णय झाल्यास सत्ता स्थापनेचा दावा करणार, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं होती. यावेली त्यांनी शिवतारे यांना धमकी दिली होती.
सविस्तर वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा पराभव. नांदगाव मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याकडून पराभव
पवारच ठरले राजकारणातले तेल लावलेले पैलवान; अनेक ठिकाणी ‘राष्ट्रवादी पुन्हा’
सविस्तर वाचा
या निवडणुकीत मतदार आमच्या सोबत होते. परंतु आम्ही कमी पडलो असं मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केलं आहे.
सविस्तर वाचा
मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयानं मनसेचं खातं उघडलं आहे.
मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत, एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे
सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत. अटीतटीच्या लढतीत दिलीप माने यांचा पराभव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
वरळी मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला.
बार्शीमध्ये दिलीप सोपल यांचा पराभव. सोपल यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे विजयी झाले आहेत. त्यांनी ६१ हजार ५०० मतांनी विजय मिळवला आहे.
रत्नागिरीत शिवसेनेचे राजन साळवी (राजापूर), उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (गुहागर) आणि योगेश कदम (दापोली) यांची विजयी आघाडी. चिपळूणमधून शेखर निकम (राष्ट्रवादी) विजयी
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नव्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल, असं ते म्हणाले.
परळीत पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यान, मी पराभव स्वीकारत असून आपल्या वडिलांनी पराभव कसा खांद्यावर घ्यायचा हे शिकवलं असल्याचं त्या म्हणाल्या.
मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांनी महाडेश्वर यांचा पराभव केला आहे. त्यांच्या समोर अपक्ष उभ्या असलेल्या तृप्ती सावंत यांचा फटका महाडेश्वरांना बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी अणुशक्ती नगरमधून विजय मिळवला आहे.
सिल्लोडमध्ये शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार विजयी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.
बोरीवलीमध्ये नोटाला १० हजारांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर लातुरमध्येही अनेक मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. लातुरमध्येही नोटाला १६ हजार मतं मिळाली आहेत.
पळूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांचा १ लाख ५५ हजार मतांनी विजय झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ म्हटलेल्या पडळकरांचं डिपॉझिट जप्त. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी निर्णायक आघाडी घेतल्यानं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
फोटो : अमित चक्रवर्ती
पुण्यातील भाजपाच्या उमेदवार आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहे. गिरीष बापट यांना खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या जागी कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली होती.
फोटो : सागर कासार
ठाण्यात शिवसेनेने आपला गड राखला असून ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती.
सिंदखेडमधून भाजपचे उमेदवार आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल विजयी झाले आहेत.
कोल्हापूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले आहेत.
पालघरमध्ये शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला आहे. श्रीनिवास वनगा हे भाजपाचे दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र आहे. शिवसेनेने लोकसभेऐवजी त्यांना विधानसभेला उमेदवारी जाहीर केली होती.
मावळमध्ये भाजपाच्या बाळा भेगडे यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी तब्बल १ लाख १६ हजार मतांनी पराभव केला.
मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात १४ व्या फेरीच्या अखेरीस समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ५३ हजार ६००, तर शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांना १४ हजार ७७२ आणि अपक्ष उमेदवार मोहम्मद सिराज यांना ९ हजार २७९ मतं मिळाली आहेत.
परळी विधानसभा मतदारसंघातील निकाल इतिहास घडवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील निकाल इतिहास घडवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ८ हजार ३९८ मतांनी आघाडीवर आहेत.
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. दहाव्या फेरी अखेरीस हितेंद्र ठाकूर १६ हजार ८२० मतांनी आघाडीवर आहेत. तर चौथ्या फेरी अखेरीस क्षितीज ठाकूर हे ९ हजार १४९ मतांनी आघाडीवर आहेत.
कल्याण ग्रामीणमध्ये नवव्या फेरी अखेरीस पुन्हा एकदा कडवी झुंज पहायला मिळत आहे. मनसेच्या राजू पाटील यांना २९ हजार ३०३ तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे २९ हजार १२६ मत मिळाली आहेत. पाटील यांनी १७७ मतांची आघाडी घेतली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी ३ हजार ९१० मतांनी आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीअखेरीस देशमुख यांना १९ हजार ९४६ मतं मिळाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दुपारी दी़ड वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते या पत्रकार परिषदेत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सांगली : तासगाव – कवठेमहांकाळ – राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई आर.आर. पाटील आघाडीवर, ४२ हजार ११४ मतांची विक्रमी आघाडी