Winter Session Of Maharashtra Assembly Updates, 27 December 2022 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतली असताना आठवडाभर सावध भूमिका घेणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारने अखेर सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी केलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर, सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात आज (मंगळवार) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी ठराव मांडणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ठराव मांडण्यात आल्यानंतर तो एकमताने मंजूर झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याशिवाय, गायरान जमिनीचे वाटप आणि सिल्लोड महोत्सवावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करीत विरोधकांनी सोमवारी दोन्ही सभागृहांचे काम बंद पाडले. या प्रकरणांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची चूक असेल तर त्यांना पाठिशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आज सत्तार काय भूमिका मांडणार याकडेही सर्वांचे लक्ष्य आहे.
विधिमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील सर्वच ठिकाणच्या महत्त्वपूर्ण घडामोडी वाचा फक्त एकाच क्लिकवर
27 December 2022 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना खडसावलं. विधानपरिषदेत अमोल मिटकरी यांनी भाजपा नेते सुब्रहण्यम स्वामी यांचं ट्विट वाचून दाखवलं. यामध्ये नरेंद्र मोदींचा ‘रावण’ असा उल्लेख होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे अत्यंत चुकीचं आहे सांगत संताप व्यक्त केला. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी नरेंद्र मोदींबाबत केलेलं विधान पटलावरुन काढून टाकण्यात आलं.
कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपुर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला.
चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या मंत्री, आमदार तथा सचिव व अन्य अधिकाऱ्यांनी ताडोबात व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, असे सलग तीन दिवस नाताळची सुटी आणि अतिविशिष्ट अतिथींच्या आगमनामुळे ताडोबा ‘हाऊसफुल्ल’ होते. बातमी वाचा सविस्तर
गायरान जमिनीचं वाटप आणि सिल्लोड महोत्सवावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करीत विरोधकांनी सोमवारी दोन्ही सभागृहांचे काम बंद पाडलं. या प्रकरणांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची चूक असेल तर त्यांना पाठिशी घालणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन आजही सभागृहात विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना यासंबंधी भाष्य केलं.
नागपूर: महाविकास आघाडीतर्फे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाच्या पायरीवर अनोखे अभंग आंदोलन केले गेले. या प्रसंगी टाळ वादन वदिंडी आंदोलन करीत सरकारचा धिक्कार केला. भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या.., कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा.. असे अभंग गात सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आवळला. बातमी वाचा सविस्तर
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण बॉम्ब फोडू, असे जाहीर करून राजकीय वातावरण तापवणारे सेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी दिवसभरात कोणताही बॉम्ब फोडलाच नाही. बातमी वाचा सविस्तर
नागपूर: विरोधकांनी कितीही आरोप केलेत तरीही उपयोग नाही. आमच्याकडेही माल मसाला तयार आहे. विरोधकांनी एक केस केली की आम्ही दोन केस करणार,हे ठरलेले आहे, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. बातमी वाचा सविस्तर
नागपूर: हिवाळी अधिवेशन सुरू असताना मंगळवारी भाजप आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर नेते मंत्री उपस्थित होते. बातमी वाचा सविस्तर
विधिमंडळ अधिवेशनच्या आजच्या आठव्या दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर टाळ वाजवून आंदोलन सुरू केलं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, नाना पटोले आदींसह विरोध पक्षाचे सर्वच आमदार सहभागी झाले आहेत.
सीमाप्रश्नी राज्य सरकारने कणखर आणि कठोर भूमिका घ्यायला हवी. सभागृहात ठराव करायचा असेल तर या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित केला पाहिजे. असं काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेत बोलताना म्हणाले होते. यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, आपली भूमिका स्पष्ट केली. वाचा सविस्तर बातमी…
विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सीमाप्रश्नावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला आणि सूचक इशाऱ्या प्रत्युत्तर दिले. वाचा सविस्तर बातमी…
“या प्रकरणात शेवाळे यांच्यासोबत इतर खासदारांचीही नावे येऊ शकतात व संबंधित महिला चौकशीत अन्य धक्कादायक खुलासे करण्याची भीती वाटते. असे खुलासे झाले तर महाराष्ट्रातील सरकारच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटेलच फुटेल. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार अनैतिकतेच्या कुबडय़ांवर उभे आहेच, पण ते व्यभिचार व देशद्रोहय़ांच्या पायावरही टिकले आहे.” अशी टीकाही शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतली असताना आठवडाभर सावध भूमिका घेणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारने अखेर सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी केलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर, सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात मंगळवारी ठराव मांडणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.