Winter Session Of Maharashtra Assembly, 28 December 2022 : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. शिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही राजकारण तापलं असताना आता अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Assembly Winter Session 2022 Live Updates, 28 December 2022 : विधिमंडळ अधिवेशनातील महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर

18:07 (IST) 28 Dec 2022
नागपूर : गद्दारांचे घोटाळे, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके – आदित्य ठाकरे

राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. सरकारमध्ये गद्दार नेते बनले आहेत. गद्दारांचे घोटाळे बघता स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे चित्र राज्यात दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. विधान भवन परिसरात आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील गद्दार मंत्र्यांवर केवळ भ्रष्टाचाराचे आरोपच नव्हे तर पुरावे सुद्धा आहे. सर्व कागदपत्र जनतेसमोर आहे. सविस्तर वाचा…

17:00 (IST) 28 Dec 2022
..त्या दिवशी तुम्हाला बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार राहिला नाही – मुख्यमंत्री

तुम्ही निवडून आलात, तेव्हा यांचीच मदत लागली तुम्हाला. ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात, त्या दिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>

16:58 (IST) 28 Dec 2022
फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की… – अनिल परब

आपण कर्तृत्वावान आहात. आपण ५० लोक घेऊन गेलात आणि सरकार स्थापन केलं. त्यातला एक जरी पडला, तरी राजीनामा देईन, हे तुमचं वाक्य आहे. आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही. याच्यातले किती लोक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही तुमच्या जिवावर आम्हाला हरवलंत, तर आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. पण भाजपाच्या मदतीने आम्हाला हरवणार, याचं आम्हाला वाईट वाटेल – अनिल परब

16:52 (IST) 28 Dec 2022
..तरी हा एकनाथ शिंदे फिल्डवर उतरला – मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गाला कुणी-कुणी विरोध केला हे सगळ्यांना माहिती आहे. तरी एकनाथ शिंदे फिल्डवर उतरला. शेतकऱ्यांना समजावलं. पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालं. त्याला योगायोग, शुद्ध इच्छा, पुण्याई असं सगळंच लागतं – एकनाथ शिंदे

16:51 (IST) 28 Dec 2022
आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून कारभार करतोय – एकनाथ शिंदे

आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करत आहोत. एकेक निर्णय घेत आहोत. लोकांच्या मनातले निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आमच्या पाठिशी आहेत. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही पाठिंबा आहे.

16:43 (IST) 28 Dec 2022
सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी योजनांची मुख्यमंत्र्यांची घोषणा

स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणेच दरमहा १० हजार रुपये मिळत होते, ते आम्ही २० हजार केले. त्यानंतर १३ लाभार्थ्यांना आपण निवृत्तीवेतनही देत आहोत. सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाप्रमाणे १५ वर्षं जे महाराष्ट्रात राहतात, तसं तिथे १५ वर्षं वास्तव्याचा दाखला असणाऱ्यांनाही या योजना लागू आहेत. गृहनिर्माण मंडळातर्फे गाळे वाटपासाठीचा अर्ज करताना सीमाभागातील १५ वर्षं वास्तव्य हे महाराष्ट्रातील १५ वर्षं वास्तव्य असल्याचं ग्राह्य धरण्यात येईल. – एकनाथ शिंदे

16:39 (IST) 28 Dec 2022
एक इंचही जागा सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एक इंचही जागा आम्ही सोडणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करू. आमच्या मराठी भाषिक लोकांवर अन्याय होता कामा नये, यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू – एकनाथ शिंदे

16:37 (IST) 28 Dec 2022
आम्ही बोलत नाही, करून दाखवतो – एकनाथ शिंदे

आमचा संयम म्हणजे आमची हतबलता नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बोलत नाही, करून दाखवतो – एकनाथ शिंदे

16:34 (IST) 28 Dec 2022
कोण काय काय बोललं, हेही आम्हाला माहिती आहे – एकनाथ शिंदे

या एकनाथ शिंदेनं संघटनेसाठी आयुष्य घालवलं. तेव्हा कुठे होते हे? सीमाप्रश्न, पूर, कोविड, संकट अशा सर्व वेळी पूर्ण राज्यानं पाहिलंय ते. त्यामुळे बोलताना विचार करून बोला. आम्हीही बोलू शकतो. कोण काय काय बोललं, हेही आम्हाला माहिती आहे. पण ते आम्ही आता बोलत नाही. जेव्हा काही लोक सीमा ओलांडतात, तेव्हा मलाही थोडं बोलायला लागतं – एकनाथ शिंदे

16:33 (IST) 28 Dec 2022
जो शीशे के घर में रहता हे, वो… – मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत शायरी

वाट्टेल ते बोललं जातंय. एक सहनशक्ती असते. पण आम्ही वेडंवाकडं काही सहन करणार नाही. मंत्री जेलमध्ये गेले तरी त्यांचे राजीनामे घेतले नव्हते तुम्ही. जो शीशे के घर में रहता हे, वो दुसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. शीशे में रहने वालों को कपडे बदलने की आवश्यकता नही होती, फिर भी बदलते है वो – एकनाथ शिंदेंचा टोला

16:31 (IST) 28 Dec 2022
काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि… – एकनाथ शिंदे

काही लोक येऊन नवीन नवीन काहीतरी सांगतायत. काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि सुरू होतायत. काही लोक सकाळी साडेनऊपर्यंत टीव्ही लावत नाहीत. कंटाळलेत लोक. वाट्टेल ते बोलणं चाललंय. निर्लज्ज सरकार आहे वगैरे. अरे निर्लज्जपणाचा कळस तर तुम्ही गाठला. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात. बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचा फोटो लावून मतं मागितली. मग सरकार कुणासोबत यायला हवं होतं? मग चुकलं कोण? निर्लज्जपणा कुणी केला? आम्ही तर उघडपणे केलं सगळं. काही लपवलं नाही. – एकनाथ शिंदे

16:28 (IST) 28 Dec 2022
‘उद्धव ठाकरेंची अडकलेली कॅसेट…’ – प्रसाद लाड

उद्धव ठाकरेंनी मुंबईला काय दिलं?; प्रसाद लाड यांचा सवाल

पाहा व्हिडीओ

16:27 (IST) 28 Dec 2022
‘सत्तारांच्या मुलीला नोकरी मिळालेली नाही’ – देवेंद्र फडणवीस

टीईटी घोटाळ्याच्या मुद्द्यावर फडणवीस आक्रमक, विधानसभेत अब्दुल सत्तारांचं केलं समर्थन

पाहा व्हिडीओ

16:22 (IST) 28 Dec 2022
नागपूर : नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुरजागड प्रकल्प सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे मला धमक्या देखील आल्या. नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी सुरजागड प्रकल्प सुरू केला. आता या प्रकल्पामुळे या भागातील नक्षलवाद कमी झाला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदे केला. सविस्तर वाचा…

16:21 (IST) 28 Dec 2022
महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवातच कमकुवत झाली – एकनाथ शिंदे

सीमावाद प्रकरणी महाराष्ट्राच्या लढ्याची सुरुवात कमकुवक मानसिकतेतून झाली. त्यावेळी झालेल्या ठरावावरून हे स्पष्ट होतंय. तेव्हापासून ५० वर्ष कुणाचं सरकार होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. १०७ हुतात्मांवर गोळीबाल झाला, तेव्हा त्यांच्याच पक्षातल्या सी. डी. देशमुखांनी टीका केली होती – एकनाथ शिंदे

16:16 (IST) 28 Dec 2022

सीमाभागात जेवढी गावं आहेत, त्यातली एक इंचही जमीन त्यांना मिळणार नाही, ही गावंही तिकडे जाणार नाहीत याची सगळी जबाबदारी आमची आहे – एकनाथ शिंदे

16:15 (IST) 28 Dec 2022
मला दु:ख एवढंच आहे की… – एकनाथ शिंदे

दु:ख एवढंच आहे की आपल्या राज्यातल्या माणसांना कर्नाटकमध्ये जाण्यासाठी फितवलं जात आहे. त्यांना प्रोव्होक केलं जातंय. त्याच्या पाठिशी कोण आहे, हे माहिती आहे आम्हाला. मला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये. पण हे वाईट आहे. आपल्या राज्याबद्दल प्रत्येकाला प्रेम असायला हवं – एकनाथ शिंदे

16:14 (IST) 28 Dec 2022

जतमधल्या ४८ गावांचा पाण्याचा प्रश्न होता. त्यासाठी २ हजार कोटी देऊन त्या प्रकल्पाला मान्यता दिली. त्या भागातले लोक उठाव करतात, ठराव करतात. त्याचा सगळा रिपोर्ट आमच्याकडे आहे. कोण त्याच्या पाठिशी आहे. आपल्या राज्याबद्दल प्रत्येकाला प्रेम असायला हवं. आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं ही वृत्ती कशाचं द्योतक आहे? – एकनाथ शिंदे

16:13 (IST) 28 Dec 2022
जयंत पाटलांना कुणी थांबवलं होतं? – एकनाथ शिंदे

जयंत पाटील म्हणतात, मी ११ अर्थसंकल्प मांडले. जत तालुका त्यांचाच आहे. सांगली त्यांचा जिल्हा आहे. मग त्यांना या तालुक्यातल्या गावांचा विकास करण्यापासून कुणी थांबवलं होतं? – एकनाथ शिंदे

16:12 (IST) 28 Dec 2022
फळं असणाऱ्या झाडाला लोक दगडं मारतात – एकनाथ शिंदे

काही लोक टीका करत होते. ठीक आहे. आरोप-प्रत्यारोप होत असतात. ज्या झाडाला फळं असतात, त्या झाडाला लोक दगडं मारत असतात. कामाने आम्ही उत्तर देऊ – एकनाथ शिंदे

16:11 (IST) 28 Dec 2022
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

घराबाहेर न पडणारे आज रस्त्यावर आले. रस्त्यावरून पायरीवर आले. यातच आमचा विजय आहे – एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला!

16:11 (IST) 28 Dec 2022
आजही मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे – एकनाथ शिंदे

जे लोक आमच्या आंदोलनावर संशय घेण्याचं काम करत आहेत. काहीजण म्हणतात लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा आमच्याकडे होते. आजही मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे. मी एक शिवसैनिक आहे. आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री नाही – एकनाथ शिंदे

16:10 (IST) 28 Dec 2022

तुम्ही जो विश्वास दाखवताय, त्याचं आम्हाला समाधान आहे. निवडणुकीवेळी राजकारण करू. पण आता अजिबात राजकारण करायचं नाही. खऱ्या अर्थाने आपण आमच्या क्षमतेवर एक प्रकारे विश्वास दाखवला त्याचा आम्हाला आनंद आहे. ऐतिहासिक चुका दुरुस्त करण्याची संधी आपल्याला आली आहे – एकनाथ शिंदे

16:09 (IST) 28 Dec 2022

आम्हीही सीमाभागात संघर्ष केला. बेल्लारीच्या जेलमध्ये आम्हाला तुरुंगवासही झाला. अनेकांनी त्यावेळी आंदोलनं केली. काहींना तुरुंगवासही भोगावा लागला. तेव्हापासून आपण पाहातोय की ६६ वर्षांत सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. पण ६६ वर्षांचा हा प्रश्न ६ महिन्यांत आम्ही सोडवावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल तर आमची काही हरकत नाही – एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

16:07 (IST) 28 Dec 2022
सीमाभाग आपला अविभाज्य भाग – एकनाथ शिंदे

आपल्या हक्काची ती ८६५ गावं आहेत. बेळगाव, कारवार, निराणी, भालकी, बिदर या शहरांसह ही सगळी गावं आपली आहेत. सीमाभाग हा महाराष्ट्राचाच अविभाज्य घटक आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. आत्तापर्यंतचा संघर्ष आहेच, पण दुर्दैवाने काही चुकाही आहेत – एकनाथ शिंदे

16:06 (IST) 28 Dec 2022

आज सगळेच जण सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. आपल्या एकजुटीमुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना आधार मिळणार आहे – एकनाथ शिंदे

16:05 (IST) 28 Dec 2022
सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन

कर्नाटक सरकारची मराठी माणसाविरुद्ध कारवाई सुरू झाली, तेव्हा मुंबईतले कानडी लोक मला भेटले. आम्ही इथे राहतो, आम्ही अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन करणार नाही असं ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या नागरिकांना तिथे त्रास सहन करावा लागतो, हे असं होता कामा नये – मुख्यमंत्री

15:44 (IST) 28 Dec 2022
सत्ताधारी-विरोधकांनी सोबत या विषयावर काम करायला हवं – गोपीचंद पडळकर

सरकार आणि विरोधी पक्षांनी हातात हात घालून हा विषय पुढे घेऊन गेलं पाहिजे. शिंदे सरकार आल्यापासून सीमावाद निर्माण झालाय, असं वातावरण तयार केलं जातंय. ते योग्य नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत, याकडे न बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय ताकदीने बाजू मांडतायत हे बघायला हवं – गोपीचंद पडळकर

15:43 (IST) 28 Dec 2022

एखाद्या भूभागावरचा हक्का रेटून नेणं, व्यक्तीगत भूमिका विस्तारवादाची असेल, तर काळ बदलूनही ती भूमिका गेलेली नाही. जेव्हा मैसूर राज्याची भाषिक आधारावर निर्मिती झाली, तेव्हा सीमाभागातील मराठी भाषिकांचा जबरदस्तीने मैसूर भागात समावेश केला. तेव्हापासून आत्तापर्यंत सीमाप्रश्न वारंवार चर्चेला येतो – गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन नागपूर लाईव्ह