Winter Session Of Maharashtra Assembly, 28 December 2022 : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. शिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही राजकारण तापलं असताना आता अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
Assembly Winter Session 2022 Live Updates, 28 December 2022 : विधिमंडळ अधिवेशनातील महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर
हे सरकार घटनाबाह्य आहे. गद्दारच इथे नेत बनल्यानंतर त्यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवता येणार नाही. स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके असं सगळं सुरू आहे. या ४० गद्दारांची हकालपट्टी व्हायला हवी होती. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी मुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. – आदित्य ठाकरे
देशात शांततेचं पालन व्हावं, कायदा-सुव्यवस्था नांदावी यावरच आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आत्ताच का आक्रमक भूमिका घेतली जातेय? कारण तिथे निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठीच हे सुरू आहे – आदित्य ठाकरे
नागपूर : हिवाळी अधिवेशनात सभागृहामध्ये एसआयटी, खोके, बोके यावर चर्चा होत असताना विदर्भाच्या प्रश्नावर मात्र कुठलीही चर्चा नाही. कुठल्याही राजकीय पक्षातील नेत्यांना विदर्भाविषयी काही देणे घेणे नाही. बातमी वाचा सविस्तर
एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार नागपूरहून मुंबईला जाणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासाठी खास शासकीय विमानाची सोय करणार आहेत. याविषयी खुद्द अजित पवार यांनीच माहिती दिली असून त्यांनी मुंबईला जाण्याचेही कारण सांगितले आहे. ते आज (२८ डिसेंबर) नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. वाचा सविस्तर
नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. “दिल मांगे मोअर, सत्तार आहे चोर”, “नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री” अशा घोषणा करत भूखंड घोटाळा आणि कृषी प्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना पैसा गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे.
विधिमंडळ अधिवेशन अद्याप नागपुरात सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते मुंबईला जाणार असल्याचं वृत्त आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्त्वाच्या बैठकीसाठी अजित पवार मुंबईला जाणाराअसल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या दोन दिवसांत संपणार असून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक असल्याचं सांगत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.