Maharashtra Political Headlines, Winter Session Of Maharashtra Assembly Nagpur Day 2: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. दोन्ही बाजूंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी करून आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे आज दिवसभरात कामकाज वादळी होणार हे दिवसाच्या सुरुवातीलाच स्पष्ट झालं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today, Winter Session Of Maharashtra Assembly Live: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सर्व अपडेट्स
मला दु:ख झालंय. जेव्हा भुजबळांनी एनआयटी जमिनीविषयीचा मुद्दा मांडला, तेव्हा योगेश सागर यांनी समोरून दोन वेळा भुजबळांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हटलं. आम्ही त्यांना विचारलं की वय झालं म्हणून तुम्ही असं कुणालाही काहीही म्हणू शकता का? तेव्हा सगळा सत्ताधारी बेंच आमच्या अंगावर आला. मी फक्त एवढंच म्हणत होतो की त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. कुणीही सदस्य असो, राजकारण कुठल्या पातळीपर्यंत खाली न्यायचं, हे ठरलं पाहिजे. मला त्यांचं बोलणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी तिथे आवाज उठवला. सत्ताधारी पक्षातून योगेश सागर यांची बाजू घेतली गेली याचं मला दु:ख वाटलं. एवढं घाणेरडं वैयक्तिक राजकारण कधीही झालं नव्हतं.
“छगन भुजबळांनी वरच्या सभागृहाचा उल्लेख केला, तिथे पूर्णपणे मी खुलासा केला आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांवर चुकीचे आरोप लावणे योग्य नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. यानिमित्ताने भुजबळसाहेब मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, ८३ कोटी वगैरे आस्मानी आकडे पूर्णपणे चुकीचे आहेत. मी वरच्या सभागृहात उत्तर दिलंय, येथेही देतो. आम्ही भूखंडाचे श्रीखंड खाणारे नाहीत,” – देवेंद्र फडणवीस
“राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ८३ कोटी रुपयांचा भूखंड केवळ २ कोटी रुपयांना दिला. म्हणून वरिष्ठ सभागृहातही गदारोळ सुरू आहे. आपलं सभागृहही सर्वात मोठं आहे. येथे लोकप्रतिनिधी सर्वात जास्त आहेत. त्यामुळे ८३ कोटींचा भूखंड अवघ्या दोन कोटींत कसा दिला? हा भ्रष्टाचार नाही का? की यांनीही रेवड्या वाटल्या” – छगन भुजबळ
आफताब पूनावालाला फाशीचीच शिक्षा द्यावी लागेल. आपल्याकडे जर असा काही कायदा असता की त्यानं श्रद्धाचे ३५ तुकडे केले, तसे याचेही ३५ तुकडे केले पाहिजेत.. ३५ ऐवजी ७० तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल असा हा नालायक माणूस निघाला आहे. त्यासंदर्भात सरकारने गृहमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निकाल लागेल आणि त्याला कडक शासन होईल याबाबत आपण कार्यवाही करणार का? – अजित पवार
नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. या मुद्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने मंगळवारी विधानपरिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. या मुद्यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.
काही राज्यांनी लव्ह जिहादच्या बाबत कायदे केले आहेत. मी जाणीवपूर्वक सभागृहाला सांगतो, की लव्ह जिहाद हा विषय सर्वात आधी केरळमध्ये बाहेर आला. हे नाव केरळच्या सरकारने त्याला दिलं आहे. हे कुठल्या धर्माच्या विरोधात कार्यवाही आहे असं नाहीये. पण अशा घटना घडतायत. म्हणून वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत जी भूमिका किंवा कायदे केले आहेत, त्यांचा अभ्यास करून आपल्याकडे यासंदर्भात प्रभावी कायदा करण्याची गरज असेल, तर तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. षडयंत्राचा भाग म्हणून कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आवश्यकता असेल, तर राज्य सरकार नक्कीच तसा प्रयत्न करेल.
यावर पुढचा उपाय म्हणून आपण सांगितलंय की अशा परिस्थितीत एखाद्या महिलेची तक्रार आल्यावर त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ४० मोठे मोर्चे निघाले. यात लव्ह जिहादबाबत कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली गेली. इंटरफेथ मॅरेजला सरकारचा कोणताही विरोध नाही. मात्र, गेल्या काही काळात जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये असे विवाह केले जात आहेत. वर्ष-दीड वर्षात त्या मुलीला त्रास दिला जातो. अशा घटना मोठ्या प्रमाणावर बाहेर येताना दिसत आहेत.
आत्तापर्यंतच्या तपासात या प्रकरणात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. मात्र, तिने तक्रार परत का घेतली, याची चौकशी आपण करत आहोत. त्याचसोबत तिने तक्रार करणं आणि ती परत घेणं यात एका महिन्याचा कालावधी गेला. २३ तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला तक्रार परत घेतली. यादरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? तेव्हा जर तपास केला असता, तर हा प्रकार टाळता आला असता. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आपण याची माहिती घेत आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही?
श्रद्धा वालकर प्रकरण मानवतेला काळिमा फासणारं आहे. एखादा व्यक्ती इतका क्रूर कसा होऊ शकतो की तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्याच फ्रीजमधून कोल्ड्रींक काढून प्यायचं. – देवेंद्र फडणवीस
त्याचबरोबर ज्याला लव्ह जिहाद म्हटलं जातं, अशी प्रकरणं राज्यात काही जिल्ह्यांत समोर आली आहेत. त्यामुळे लव्ह जिहादला विरोध करणारा एखादा कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे का? – अतुल भातखळकर
ही घटना ज्या काळात घडली, त्या काळात अमरावतीला कोल्हेंची हत्या झाली. आज चार्जशीटमध्ये तबलिगी जमातीचं नाव आलं. त्यावर लोकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी हा तपास हाती घेतल्यानंतर हा अँगल हाती आला. याकूब मेमनची तर यांनी अडीच वर्षांत कबरच सजवली. त्यामुळे श्रद्धाचा तक्रार अर्ज मागे घेण्यामध्ये त्यावेळच्या सरकारमधल्या शीर्षस्थ नेतृत्वाचा पोलिसांवर दबाव होता का? या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जातील का? – अतुल भातखळकर
श्रद्धा वालकरची फक्त हत्याच केली गेली नाही, तर तिच्या देहाचे ३५ तुकडे केले गेले. ते तुकडे आफताबनं स्वत:च्या घरात फ्रीजमध्ये ठेवले आणि हळूहलू त्यांची विल्हेवाट लावली. असं म्हटलं गेलं की वसईत राहत असताना तिने २०२०मध्ये पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. पण नंतर तिने तो अर्ज मागे घेतला. मुळात तिच्या वडिलांनी हे जाहीरपणे सांगितलंय की त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. आफताबच्या घरच्यांनीही तिच्यावर दबाव आणला होता. त्यामुळे हा अर्ज कदाचित मागे घेतला गेला असेल. पण पोलिसांनी कारवाई केली नाही, यामागे काही राजकीय दबाव होता का? – अतुल भातखळकर
दोन्ही सभागृहाच्या कामाच्या तासांची प्रसिद्धी कमी होते, पण काम बंद पडलं, तर प्रसिद्धी जास्त होते. फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मेस्सीनं कमाल केली. पण मेस्सी एका दिवसात घडलेला नाही. अर्जेंटिनाचा जगज्जेता संघ उभा करण्यात जिद्द, चिकाटी, मेहनत अशा सगळ्याच गोष्टी आहेत. अशी उदाहरणं अनेक आहेत. कोणत्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी आपण टाळू नयेत – एकनाथ शिंदे
आपल्याला कुणालाही टार्गेट करायचं नाहीये. पण यासंदर्भात जी काही चौकशी आवश्यक असेल, ती केली जाईल – देवेंद्र फडणवीस
२२ हजार कोटींचं डांबर कुणी खाल्लं, याची माहिती आहे. त्याची चौकशी करायची असेल, तर ती व्हायला हवी. गेल्या २५ वर्षांत डांबराचे जेवढे रस्ते झाले, त्यात किती पैसे खाल्ले, त्याची चौकशी व्हायला हवी – आशिष शेलार
पुणे : पुण्याच्या मावळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे. नऊ ग्रामपंचायतीसाठी झालेली निवडणुकीचा निकाल आज हाती आला असून राष्ट्रवादी पक्षाला ६ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर, भाजपला ३ ठिकाणी विजय मिळाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरून भोयरे आणि निगडे येथे प्रचार केला होता. पैकी, निगडे येथे त्यांना हार पत्करावी लागली तर भोयरे येथे आब राखण्यात भाजपाला यश आले आहे. बातमी वाचा सविस्तर
सभागृहातलं वातावरण व्यवस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला. पण त्यावर उत्तर देण्याऐवजी अजून काहीतरी मुद्दे उपस्थित केले गेले. शंभूराज देसाई, आपण ज्येष्ठ आहात. काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सभागृह चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाती आहे – अजित पवार
सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. जे काही थोडे शिल्लक सेनेमध्ये आहेत. त्यांना त्या रस्त्याचा वापर करावा लागू नये, एवढी तरी काळजी त्यांनी आता घेतली पाहिजे – शंभूराज देसाई यांचा टोला
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊ आणि या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा येथे करण्याबाबत राज्य शासन गंभीर आहे. लवकरच त्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या अडीच वर्षांत खड्डे का बुजवले गेले नाहीत, याचीही चौकशी केली जाईल – शंभूराज देसाई
समृद्धी महामार्गाच्या एक्झिट पॉइंटवर पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी परिवहन विभागाला अधिकची वाहनं लागली, तर तीही उपलब्ध करून दिली जातील – शंभूराज देसाई
समृद्धी महामार्गाच्या सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून ताशी १५० किलोमीटर इतकी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती पण आता तिथे १२० किमी वेगमर्यादा आपण घालून दिली आहे. यावर वेग जाऊ नये, यासाठी स्पीडगनची व्यवस्था करण्यात आली आहे. जेव्हा असा वेग वाढेल, तेव्हा पुढच्या टोलनाक्याला त्या वाहनाला थांबवलं जाईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर यासंदर्भात प्रयोग करण्यात आला आहे. – शंभूराज देसाई
आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुक कारणावरून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटात वादावादी आणि मारामारी झाली. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादाबाबत तक्रार देण्यासाठी सोमवारी सकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली. बातमी वाचा सविस्तर
गेल्या अडीच वर्षांत खड्डे का पडले, खड्डे पडल्यानंतर ते का बुजवले गेले नाहीत, रस्ते बनवल्यानंतर लगेच त्याला खड्डे पडले का याची माहिती घेतली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे दुरुस्त करण्यासाठी कार्यवाही केली जाईल – शंभूराज देसाई
समृद्धी महामार्गासाठी रस्ते सुरक्षेचे नियम काय असणार आहेत, याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. शिवाय, महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे जे अपघात होत आहेत, त्याबाबत सरकारची काय भूमिका आहे, यावर उत्तर द्यावं – नाना पटोले
विधापरिषद कामकाज – प्रश्वोत्तराचा तास सुरु झाला असतांना नागपूर जमीन घोटाळ्याचा मुद्दा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी काढला, त्यावर गोंधळ होत कामकाज १५ मिनीटा करता तहकूब करण्यात आलं होतं.
सीमाप्रश्नी पहिल्यांदाच इतक्या वर्षांनंतर केंद्रानं आणि गृहमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आहे. आपलं सभागृह त्याच्या पाठिशी एकमताने आहोत. ज्या लोकांना अटक केली होती, त्यांना तातडीने सोडण्यात आलं. जयंतराव, तुमच्या सांगलीतला जत तालुक्यासाठी २ हजार कोटींचा म्हैसाळ प्रकल्प मंजूर केला आहे. आपण सरकार म्हणून त्यांच्या पाठिशी उभे आहोत.
माझी सरकारला विनंती आहे, की हे कुठल्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. पोलीस दलाच्या आपण मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. तो तुमचा अधिकार आहे. पण त्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे कोयता गँगचे प्रकार होता कामा नयेत, असे आदेश द्यावेत. हवं तर त्यांना मोक्का लावा, तडीपार करा, जी कुठली कठोर कारवाई करायची असेल ती करा. हे कुठल्या पक्षाशी संबंधित नसतात. त्यामुळे यांना पक्ष वगैरे काही नाही. फक्त दहशत निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त केला गेलाच पाहिजे. कृपया याची नोंद सरकारने घ्यावी.
राज्याच्या विविध भागांत अशा काही घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग निर्माण झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिलं देत नाहीत.मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होतंय. जी मुलं पकडली जातात, ती कॉलेजची मुलं आहेत. कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी बघतात, चित्रपट बघतात आणि असा गोंधळ घालतात.
ग्रामपंचायत निवडणुकीतील कामगिरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला आनंद आहे आणि हा आकडा वाढवत जाऊ,” असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.