Maharashtra Political Headlines, Winter Session Of Maharashtra Assembly Nagpur Day 2: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून दिवसाची सुरुवातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीने झाली. दोन्ही बाजूंनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी करून आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे आज दिवसभरात कामकाज वादळी होणार हे दिवसाच्या सुरुवातीलाच स्पष्ट झालं होतं.
Maharashtra News Today, Winter Session Of Maharashtra Assembly Live: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सर्व अपडेट्स
विकासकामे स्थगितीच्या मुद्द्यावर अधिवेशन संपण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांची संयुक्त बैठक होणार – मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षाने ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्याला लगेच सत्ताधारी पक्षानेही '५० आमदार एकदम ओके, घरी बसलेले माजले बोके' म्हणत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर विरोधी पक्षाने विधान भवन परिसरातील काँग्रेस कार्यालयातून विधान सभेच्या पायरीवर मोर्चा काढला.
विधानसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात…
लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना तसा अजून दीड-पावणे दोन वर्षांचा अवधी आहे. परंतु देशपातळीवर आणि राज्यातीलही राजकीय वातावरण आताच तापू लागले आहे. खरे म्हणजे महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर आश्चर्यकारक व धक्कादायक अशा राजकीय उलथापालथी झाल्या. बातमी वाचा सविस्तर
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका. बातमी वाचा सविस्तर
बुलढाण्यातून खासगी बस (ट्रव्हल्स)मध्ये झोपेत असलेल्या १७ वर्षीय तरुणीवर बसच्या कंडक्टरने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागे झालेल्या तरुणीने आरडाओरड करीत प्रतिकार केला. त्यानंतर बसमधील अन्य प्रवाशांनी कंडक्टरला चोप दिला. बस थेट सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आली व याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज राजेंद्र सावंत (३०, रा. खामगाव, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर
अमेरिकेतील ‘एफटीएक्स’ या क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन विनिमय केंद्राचे दिवाळे वाजले. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवर बंदी घालावी तसेच ही केंद्रे प्रतिबंधित करावीत यासारखी टोकाची भूमिका घेण्यात आली. तथापि, अशा आर्थिक घोटाळ्यामुळे संपूर्ण क्रिप्टोकरन्सी उद्योगावरच बंदी घालावी ही मागणी रास्त आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. बातमी वाचा सविस्तर
सोलापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी कथित अडथळा ठरलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडावी म्हणून सोलापुरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून त्याविरोधात सिध्देश्वर कारखाना बचाव कृती समितीनेही प्रतिआंदोलन सुरू केले आहे. विमानसेवेसाठी सोलापूर विकास मंचने सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु सिध्देश्वर बचाव कृती समितीच्या आक्रमक प्रतिआंदोलनामुळे वातावरण तापत गेले आहे. बातमी वाचा सविस्तर
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधान भवन परिसरातील शिवसेना कार्यालयातून विधानसभेच्या दिशेने निघाले. दरम्यान, गर्दीत मुख्यमंत्र्यांसह त्यांच्यासोबत चालणारे चोपदार खाली पडले. एकनाथ शिंदेने लगेच हात देऊन त्यांना उचलून विचारणा केली. त्यानंतर चोपदाराचा हात पकडून ते कार्यालयाच्या बाहेर आले. बातमी वाचा सविस्तर
विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे तरतुदी जास्त आहेत, तिथल्या स्थगित्या कायम ठेवल्या आहेत. लवकरच त्यासंदर्भातही योग्य निर्णय आम्ही घेऊ. आवश्यक असेल, तिथे सत्तारुढ पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गरज असेल, तर मी तुम्हालाही त्याची माहिती पाठवतो. कुणावरही अन्याय करण्याचं कारणच नाही.
माझ्या स्वत:च्या मतदारसंघातली, सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं तुम्ही रोखली होती. अडीच वर्ष भाजपाच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही. ज्या काही स्थगित्या दिल्या होत्या. त्यातल्या ७० टक्के स्थगित्या आम्ही उचलल्या आहेत. ३० टक्के स्थगित्या यासाठी कायम ठेवल्या आहेत, की शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे २ हजार कोटींची तरतूद आहे. तिथे ६ – ६ हजार कोटी रुपये वाटले आहेत. त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. हे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या अशी अवस्था असेल, तर तशा प्रकारे हा निधी मंजूर होईल.
तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं.
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी सभागृहात गदारोळ झाला.
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी. महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका!