Maharashtra Assembly Winter Session 2022 Updates, Day 5 : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांत हे अधिवेश शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, NIT जमीन घोटाळा, दिशा सालियान मृत्यू प्रकरण यासह विविध मुद्यांनी गाजले. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे बघालयला मिळालं. आज या मुद्द्यावरून पुन्हा विधानपरिषेदत गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Live Updates

Assembly Winter Session 2022 Live Updates, 23 December 2022 : जयंत पाटलांच्या निलंबनासह सीमावादावरून विधानपरिषदेत गदारोळ होण्याची शक्यता

12:57 (IST) 23 Dec 2022
Maharashtra Assembly Session: उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोन कॉलची चौकशी होणार? शंभूराज देसाई म्हणाले “गुप्तचर विभागाकडून…”

अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. यानंतर शंभूराज देसाई यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती विधनसभेत दिली आहे. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना चोरीच्या बाजूने तपास करा असा आदेश दिला होता आरोपही रवी राणा यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं.

सविस्तर बातमी

12:50 (IST) 23 Dec 2022
विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात

विधासभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून मुक्ता टिळक यांच्या निधनाबाबत शोक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुक्ता टिळक निधनाबाबत दुख: व्यक्त केले आहे.

11:54 (IST) 23 Dec 2022
विधानसभेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब

विधानसभेचे आजचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब करण्याचा निर्णय तालिका अध्यक्षांनी घेतला आहे.

11:53 (IST) 23 Dec 2022
जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधकांचे आंदोलन

जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी हाताला काळी फीत बांधून शिंदे सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात विरोधपक्ष नेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते.

11:17 (IST) 23 Dec 2022
थोड्याच वेळात विधानसभेच्या कामकाजाला होणार सुरूवात

थोड्याच वेळात विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. काल जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर महाविकास आघाडीने आज विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

11:13 (IST) 23 Dec 2022
शिंदे सरकारच्या विरोधात मविआचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून महाविकास आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांकडून विधानसभेच्या पायऱ्यावरून शिंदे सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. 'बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', अशी घोषणाबाजी आमदारांकडून केली जात आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. तसेच कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. दरम्यान, यावरून आज विधानपरिषेद गदारोळ होण्याची शक्यता आहे.