Nagpur Hiwali Adhiveshan 2023 Updates, 20 December 2023: एकीकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असताना विरोधी पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाच्या बाजूने आज जेठमलानी आपला युक्तिवाद सादर करतील. या दोन महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
विरोधक म्हणून आम्ही सरकारला २९३वर बोलायला भाग पाडलं. पण उत्तर मात्र दुर्दैवाने प्रस्तावाच्या पलीकडचं उत्तर त्यांना देता आलं नाही. मुख्यमंत्री मुंबईच्या आसपासच फिरत राहिले. त्यांचा फोकस मुंबईच्या आसपासच्या राजकारणावर राहिला. उपमुख्यमंत्र्यांची आकडेवारी ही नेहमीप्रमाणेच तुमच्या काळात-आमच्या काळात एवढ्यापुरती राहिली. राज्यातील जनतेची बोळवण करण्याचं काम सरकारने केलं. तीन राज्यांत सत्ता मिळाल्यामुळे हे सरकार मस्तीत आणि गुर्मीत वागत होतं - विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं असून पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. हे शिंदे सरकारचं शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल.
गुन्हा नोंद झाला आहे, आरोपी वाँटेड आहे आणि तो एसपींबरोबर आरोग्य शिबिराचं उद्घाटन करतोय. एक आमदार गणपतीत फायरिंग करतोय पोलीस स्टेशनमध्ये. बॅलेस्टिकचा रिपोर्ट येतोय की ती त्याचीच रिवॉल्व्हर आहे. मग ज्याच्या नावावर लायसन्स आहे, त्याच्यावर काहीतरी कारवाई होणार की नाही? कुणालातरी जबाबदार धरणार की नाही? की मग हे कायदे फक्त आम्हालाच? १२.१०ला रात्री आमच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि सकाळी पाच वाजता शासन आपल्या दारी आम्हाला न्यायला. शासन आपल्या दारी फक्त आम्हाला उचलायला येणार का? आजकाल आम्हाला असं वाटायला लागलंय की शासन आपल्या दारी म्हटल्यावर येणार आम्हाला उचलायला. लोकप्रतिनिधी सुसाट सुटलेत. कुणीही विचारत नाहीये - अनिल परब

अनिल परब म्हणतात, “प्रविण दरेकर, तुम्ही किती चांगले कार्यक्रम घेतले. आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती. आम्ही रस्त्यावर उभं राहून…!”
विरोधी पक्षांचे मगरमछ के आँसू आहेत. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विदर्भाचा मुद्दा मांडण्याची त्यांना संधी होती. पण ती त्यांना साधता आली नाही. यावरून विरोधकांचं विदर्भावरचं बेगडी प्रेम दिसून येत आहे. सरकारने विदर्भासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत - एकनाथ शिंदे

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ४१६ लाभार्थी शेतकरी वंचित आहे.
३३ रुपयात ३०० ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट पालिकेनं दिलं. पण त्या कंत्राटदारानं सबकॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यात १०० ग्रॅम खिचडी १६ रुपयांत देण्याचा व्यवहार झाला. उरलेले पैसे कुणाच्या खात्यात गेले हे मी इथे सांगत नाही. ते हळूहळू बाहेर येईलच - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री म्हणतात, “आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं हा रोमिन छेडा आहे!”
त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी योग्य जागा वर्धा जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी, असा निर्णय झाला.
आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं हा रोमिन छेडा आहे. या कंपनीच्या सुरस कथांची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली. रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं. कोण आहे हा? कशासाठी दिलं? गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्यांचं दुकान होतं. कंत्राट मिळताच दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे सगळे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले. पैशांच्या खेळांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा? - एकनाथ शिंदे

मागच्या सरकारच्या काळात मी उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणूनही पडद्याआडून प्रयत्न झाले. मी मराठा समाजासाठी काम करेन ही भीती तेव्हा अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हाही म्हटलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतायत, तर होऊ द्या. जे काही साटंलोटं केलं, डावललं हा विषय झालंगेलं गंगेला मिळालं - एकनाथ शिंदे

अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. त्यात प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पहिल्या दिवशीही मी ते म्हणालो होतो. ओ जयंतराव.. बसा ना.. मजा नाही येणार. कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरीष्ठ नेते दिल्लीत जागावाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा प्रकरणात काही सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे, याचा विचार विरोधी पक्षांनी केला पाहिजे - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
जयंतराव, मी हात जोडून सांगतो.. वैनगंगा-नळगंगाच्या सर्व प्रक्रिया मी मुख्यमंत्री होतो तेव्हाच पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर आपण काही काळ मंत्री होतात. तुमची मनापासून इच्छा असेल. पण त्या काळात दुर्दैवाने तो प्रकल्प मंत्रिमंडळापर्यंत येऊ शकला नाही. काय अडचणी होत्या, त्या तुमच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर मलाही अवगत झाल्या आहेत. शेवटी मी मुख्यमंत्री राहिलो आहे, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री आहे. त्यांचे अधिकार त्यांचे असतात. मंत्र्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार असतात. नवीन सरकार आल्यानंतर आपण त्या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्याचं लवकरच आपण टेंडर काढू. जो प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतो, तो प्रकल्प २०२४ मध्येच सुरू झाला पाहिजे, असा प्रयत्न आमचा असणार आहे - देवेंद्र फडणवीस

थकबाकीदारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे योजनेचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील चालकास मागितलेल्या १५ हजारांपैकी आठ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती बुधवारी सकाळी दिली. सविस्तर वाचा
कोकणात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर आनंद कुट्या उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोकणातील ८ किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार होता. सविस्तर वाचा
तुळजाभवानी देवीचे प्राचीन मौल्यवान दागिने चोरी पकरणात अखेर सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महंत हमरोजीबुवा , गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरु तुकोजी बुवा व महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा या चार महंतासह मृत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी या सात जणांवर गुन्हा नोंद झाला. सविस्तर वाचा
मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे ५ ते १२ चे वर्ग भरतात. मात्र येथे शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तत्काळ शिक्षक देण्यात यावे, या मागणीसाठी पालकांनी ऐन कडाक्याच्या थंडीत अर्धनग्न ठिय्या आंदोलन पुकारले आहे. सविस्तर वाचा
मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या नागपूरमध्ये झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लोरकर यांनी यापूर्वीच गोखले इन्स्टिट्यूटकडे काम देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव होता, असा आरोप केला होता हे येथे उल्लेखनीय.
लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सराफा बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे. सोन्यातील गुंतवणुकीकडे देखील ग्राहकांचा कल दिसून येतो.
उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचे डोहाळे तर लागले नाहीत ना? असा टोलाही राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांची निवड करुन शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती उद्योग यशस्वी करण्याची सूचना मित्तल यांनी केली होती.
वर्धा-नागपूर रेल्वे मार्गावरील तुळजापूर येथील रहिवासी गेल्या पाच वर्षांपासून विविध समस्यांसाठी आंदोलन करीत आहे.
सचिन बहादूरे या शेतकऱ्याने मंगळवारी विधानभवन परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
मंत्री लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या, असं अंबादास दानवे म्हणाले.
अकादमीच्या संचालिका प्रेषिता पंडित आणि त्यांच्या शिष्या हा कार्यक्रम सादर करणार आहेत. महाकवी कालिदास कला मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना निलंबित करणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा खून करत आहे, असे पटोले म्हणाले.
अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं भाषण
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1737372023868060015
सिंहगड रस्ता भागात वडगाव परिसरात एका हॉटेलमधील वेटरचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. वेटरचा खून वादातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. सुनीलकुमार राम आसरे (वय २५, रा. चमका बनी, हरदोई, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. सविस्तर वाचा
महापालिकेच्या शहरातील सुसज्ज रुग्णालयांतील पायाभूत आणि आरोग्य सुविधा सक्षम आहेत. या सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य कृती आराखडा तयार केल्या जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. सविस्तर वाचा
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा