Nagpur Hiwali Adhiveshan 2023 Updates, 20 December 2023: एकीकडे राज्यात विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असताना विरोधी पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. शिंदे गटाच्या बाजूने आज जेठमलानी आपला युक्तिवाद सादर करतील. या दोन महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
पुणे महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाची ९१० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षे आणि तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. सविस्तर वाचा

पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. सविस्तर वाचा
येथील स्टार कॉलनीतील एका जवाहिऱ्याने ऑक्टोबरमध्ये आपल्या दुकानातील १९१९ गॅम सोन्याचे एक कोटी पाच लाख ५४ हजार रूपये किमतीचे दागिने ठाण्यातील एका सराफाला सफाई आणि कलाकुसरीसाठी ऑक्टोबरमध्ये दिले होते. या सराफाने हे दागिने मूळ मालकाला अंधारात ठेऊन परस्पर दुसऱ्या जवाहिऱ्याकडे गहाण ठेऊन त्या बदल्यात ५० लाख रूपये घेतले. सविस्तर वाचा
महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाचशे खाटांची क्षमता वाढविण्याबरोबरच तिथे पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यावर प्रशासनाने भर देण्यास सुरूवात केली आहे. सविस्तर वाचा
कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील शक्तिधाम इमारतीमध्ये प्रसूतीगृह सुरू करण्याचा प्रस्ताव अजूनही प्रशासनाच्या लालफीतीच्या कारभारात अडकला आहे. चार माळ्याची ही वास्तू रिकामी असल्याने रात्रीच्या वेळेत परिसरातील तरूणांची टोळकी येथील सुरक्षा रक्षकाला दमदाटी करून इमारती मधील रिकाम्या खोल्यांमध्ये बसून मद्याच्या मेजवान्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. सविस्तर वाचा
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्याला अबू आझमी आणि रईस शेख उपस्थित होते.
शाळेत पोषण आहाराचे काम करणाऱ्या स्वयंपाकी तसेच मदतनीस यांची कामे शासनाने निश्चित केली आहेत.
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आणि तरुणांसह कुणाच्याही हाती काही आले नसल्याचा आरोप करत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रेशीमबागला आले आणि डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
तिचा पती खासगी नोकरी करीत असून तो वारंवार बाहेरगावी मुक्कामी असतो. याच संधीचा फायदा घेऊन घरमालक महेश घोगरेने तिच्याशी संबंध वाढवले.
महादेव जानकर यांनी छोटी राज्ये विकासाला पूरक असतात, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी शेजारच्या तेलंगणा राज्याचे उदाहरण दिले.
मुख्यमंत्री सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम करत आहेत. त्यामुळे कुणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पण संजय राऊतांना वेडंवाकडं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. मुख्यमंत्र्यांबाबत एक तरी टीका केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही – भरत गोगावले, शिंदे गटाचे आमदार
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिद्दुर गावात मध्यरात्री नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ केली.
पुणे महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडीपर्यंतच्या मार्गाच्या विस्तारीकरणाची ९१० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. विस्तारित मार्गाचे काम तीन वर्षे आणि तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. सविस्तर वाचा…
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर झालेल्या महिला मृत्यू प्रकरणी विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी केंद्रीय मानवाधिकार संघटना आणि पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदिवासी जनतेच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. अशात ८ डिसेंबरला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात मृत साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री साधनाची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्चात दोन लहान मुले पोरकी झाली आहे.
आई ओबीसी समाजाची असल्यास तसे जात प्रमाणपत्र मुलांना दिले जावे, अशी नवी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी नाही तर त्यांनी केलेला जोक आहे. असले जोक आता ते अधिकच करायला लागले आहेत, असा टोला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूकर यांनी केला आहे. जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीच्या अनुषंगाने राजूरकर म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी आई हा निकष मान्य केल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गासाठी कुठला नियम लावला जाईल. या प्रवर्गातील आई असल्यास त्यांच्या मुलांनाही हे आरक्षण मिळणार काय, असा सवालही त्यांनी केला आहे.
तीन राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचा उन्माद तुम्हाला चढला असून त्या नशेत तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघालेला आहात. पण तुम्ही आग लावली, तरी या देशाची १४० कोटी जनता सती जाणार नाही. ती लढत राहील – संजय राऊत</p>
पुणे : महिलांच्या स्वयंउद्योजकतेला पाठबळ देण्यासाठी ‘शी लिड्स १००’ उपक्रमाची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे. महिलांना संकेतस्थळ, मार्गदर्शन, नेटवर्किंग, बाजारपेठ आणि प्रशिक्षण या पाच मुद्यांच्या आधारे सक्षम करीत त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देण्यात येणार आहे.
ऑटोमेशन कोच आणि डिजिटल मार्केटिंग सल्लागार निकिता व्होरा यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लिडरशीप इन लिपस्टिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिजी वर्गिस यांच्या कार्यशाळेने झाली. ‘शी लिड्स १००’च्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विक्री व्यवस्थापन, डिजिटल विपणन व्यवस्थापन योजनांसह प्रत्यक्षात प्रशिक्षण, सरकारी योजनांसाठी मार्गदर्शन केले जाते.
उपक्रमाच्या संयोजक निकिता व्होरा म्हणाल्या, ‘शी लिड्स १००’चे यश महिलांमधील सहकार्य, शिक्षण आणि सक्षमीकरणाची इच्छा दर्शवत आहे. आम्ही एक मंच तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यातून महिलांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते. त्याला मिळणारा प्रतिसाद उत्साही आहे.
जुन्या वैमनस्यातून आरोपीने घरासमोर बसलेल्या एका कुटुंबातील सहा जणांना चार चाकी वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना दर्यापूर तालुक्यातील नाचोना येथे मंगळवारी रात्री उशिरा घडली. गावातीलच अवैध दारू विक्रेत्याने हा हल्ला केल्याची माहिती आहे.
बल्लारपूर वेकोली अंतर्गत पवनी सब एरीया कार्यालयाने २०१६ पासून साखरी ग्रामपंचायतचा १४ कोटी ८८ लाख गृहकर्ज थकीत केल्यामुळे मुख्य कार्यालयास कुलूप ठोकले. ही कारवाई पंचायत समिती राजुरा आणि साखरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
वसई : रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. यंदाच्या वर्षात वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एक हजार ९८ गुन्हे घडले आहेत. त्यातील ९८० गुन्हे हे मोबाइल चोरीचे आहेत. सविस्तर वाचा
विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यु-डायस प्लस प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या रक्तगटाची माहिती भरण्याची तरतूद करण्यात आली असून पहिली ते १२ वी पर्यंतच्या जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासणीसाठी शालेय स्तरावर सुनियोजित कार्यक्रम हाती घेण्याचे शिक्षण तसेच आरोग्य विभागाने आखणी केली आहे.
मुंबई : महादेव बुक बेटिंग अॅपप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खानसह चौघांना समन्स पाठवले होते. त्यावर साहिलने पोलिसांशी संपर्क साधून परदेशात असल्यामुळे चौकशीला उपस्थित राहण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे.
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांसाठी गोव्याहून बेकायदा पाठवण्यात आलेला मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने खेड शिवापूरजवळ पकडला. या कारवाईमध्ये ८२ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
मुंबई : शिवाजी पार्क येथील प्रसिद्ध महाविद्यालयातील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. परीक्षेत नक्कल (कॉपी) करताना त्याला पर्यवेक्षकांनी पकडले होते.
पुणे : कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत (ईएसआयसी) महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. याचबरोबर पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा निर्णय केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने घेतला आहे. सविस्तर वाचा

मुंबई : घरी सोडण्याच्या बहाण्याने ६४ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर एकाने बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे घडली आहे. आरोपीने महिलेला जबर मारहाण देखील केली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकाजवळल चार मार्गिका असलेल्या उड्डाणपुलाच्या तुळया (गर्डर) उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामानिमित्त खडवली ते टिटवाळादरम्यान बुधवार ते शनिवार मध्यरात्री १२ ते रात्री २ वाजेपर्यंत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी दोन लोकल फेऱ्या अंशत: रद्द केल्या आहेत. रात्री ११.५१ ची सीएसएमटी ते टिटवाळा लोकल ठाण्यापर्यंत धावेल. तर, पहाटे ३.५६ ची टिटवाळा ते सीएसएमटी लोकल ठाण्यावरून सुटेल. रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात अन्य कोणताही बदल केलेला नाही.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा