Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 11 December 2023 : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा (११ डिसेंबर) तिसरा दिवस आहे. विधीमंडळात आजही राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. तसेच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्यावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींनंतर काँग्रेसवर देशभरातून टीका होत आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळू शकतात. कारण राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आंदोलनं करत आहेत. यासह अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सांगलीतल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. याबाबतचे अपडेट्सही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील आणि राज्यभरातील वेगवेगळ्या बातम्यांचा आढावा घेतला जाईल.

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : हिवाळी अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

21:06 (IST) 11 Dec 2023
कांदा लिलाव पूर्ववत; निर्यात बंदीनंतर दीड हजाराची घसरण

नाशिक: कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर तीन दिवसांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले. पण, उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली.

सविस्तर वाचा...

21:03 (IST) 11 Dec 2023
भुजबळ आणि पुतण्याविरोधातील याचिका ईडीकडून मागे; मुलगा पंकजविरोधातील याचिका मात्र कायम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच उच्च न्यायालयात सांगितले.

सविस्तर वाचा...

20:46 (IST) 11 Dec 2023
सांगली बाजारात गुळाला ५ हजार १०० रुपयांचा उच्चांकी दर

सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या गूळ सौद्यात चिक्की गुळास क्विंटलला ५ हजार १०० रुपये उच्चांकी दर मिळाला. सांगली चेंबर्सचे अध्यक्ष अडत दुकानदार अमरसिंह देसाई यांच्या श्री पंचलिंगेश्वर या दुकानांमधील गूळ सौद्यामध्ये शेतकरी सुरेश मारुती पुणेकर (रा. निडगुंदी, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांच्या अर्धा किलो पॅकिंग मधील चिक्की गुळास ५ हजार १०० रुपये प्रती क्वि़टल इतका उच्चांकी दर मिळाला.

सविस्तर वाचा...

20:32 (IST) 11 Dec 2023
सरोगसीसाठी सरकार देणार आर्थिक मदत? महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार

मुंबई: वंधत्वामुळे हैराण असलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ किंवा सरोगसीमुळे दिलासा मिळाला असला तरी त्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे आजही अनेकांची अपत्यप्राप्तीची इच्छा अपूर्णच राहत आहे.

सविस्तर वाचा...

20:25 (IST) 11 Dec 2023
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा शेजाऱ्यांचा आरोप; सावकाराचा आरोप व्यक्तिद्वेशातून – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: शिंदे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे पुन्हा एकदा वादामध्ये गुरफटले आहेत. क्षीरसागर व त्यांच्या मुलाने बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या शेजाऱ्यांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

20:07 (IST) 11 Dec 2023
कोट्यावधींचा निधी आणल्याचे सांगणाऱ्या पालकमंत्री खाडेंनी पदयात्रा रस्त्याची अवस्था पाहवी – वनमोरे

सांगली: कोट्यावधीचा निधी आणल्याचा दावा करणार्‍या पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतील रस्त्यांची अवस्था काय आहे हे पदयात्रा करून पाहावे. केवळ मीच विरोधी उमेदवार निश्‍चित करतो असे सांगत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे उद्योग बंद करावेत असे आव्हान जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब वनमोरे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.

सविस्तर वाचा....

19:53 (IST) 11 Dec 2023
ललित पाटील प्रकरणात सत्य लवकरच बाहेर; सुषमा अंधारे यांचा दावा

नाशिक: अमली पदार्थ माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे येथील ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची सखोल चौकशी व्हावी. या प्रकरणात लवकरच सत्य बाहेर येईल.

सविस्तर वाचा...

19:42 (IST) 11 Dec 2023
सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

सोलापूर: कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अलिकडे कांद्याची वाढती आवक आणि दर घसरणीसह लिलाव रद्द होण्याचे प्रकार घडत असताना सोमवारी उच्चांकी म्हणजे एक लाख ३० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा दाखल झाला.

सविस्तर वाचा...

19:29 (IST) 11 Dec 2023
एसटीमध्ये आता प्रवाशांना ‘डिजिटल’ तिकीट मिळणार; प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार; यूपीआय, क्युआर कोड सुविधा उपलब्ध

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होतात. परंतु, आता एसटी महामंडळाने ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 11 Dec 2023
गोवा मुंबई महामार्ग नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी १५ मिनिटांसाठी रोखला

पनवेल: आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटला तरी राज्य सरकार लक्ष देत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पोलीसांना साकडे घालून प्रतिघात्मक रास्तारोको १० मिनिटांसाठी करु देण्याचे आवाहन केले.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 11 Dec 2023
सांगली : तासगाव तालुक्यात भानामतीचा प्रकार

सूप, दुरडी, लिंबू, नारळ, लवंग, मिरे, काळे कापड आदी वस्तू भानामतीसाठी वापरण्यात आल्या होत्या. या वस्तूंवर हळदी-कुंकू टाकण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

17:31 (IST) 11 Dec 2023
संकल्प यात्रेच्या फलकांवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र; संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद, भिवंडी पंचायत समिती आणि काल्हेर ग्रामपंचायतीच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंचावरील फलकांवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

17:25 (IST) 11 Dec 2023
“एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील… “, संजय राऊतांची पवारांवर टीका

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कांदा प्रश्नावर शरद पवार आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वाचा...

17:18 (IST) 11 Dec 2023
जळगावात केळी पीकविम्यासाठी उत्पादक आक्रमक; न्यायालयात जाण्याची तयारी

जळगाव: हवामानावर आधारित फळ पीकविमा अर्थात केळी पीकविम्यातंर्गत संबंधित रक्कम मंजूर असूनही जिल्ह्यातील पात्र १० हजार ६१९ केळी उत्पादकांना विविध कारणे देत लाभापासून विमा कंपनीकडून हेतुपुरस्सरपणे वंचित ठेवले जात आहे.

सविस्तर वाचा...

17:15 (IST) 11 Dec 2023
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावर कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई

दागिने मोजताना अनेक वस्तू गहाळ झाल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये देवी चरणी अर्पण केलेल्या देवीचाही समावेश होता.

सविस्तर वाचा...

17:15 (IST) 11 Dec 2023
अपहृत तरुणाची ‘सुखरूप’ सुटका, दुचाकी दुरूस्तीसाठी रचला होता स्वत:च्या अपहरणाचा बनाव

वसईतील एका तरुणाने दुचाकी दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याने चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे.

सविस्तर वाचा...

17:13 (IST) 11 Dec 2023
तारापूर येथे कामगाराचा मृत्यू, प्रकरण संशयास्पद असल्याचा कुटबियांचा आरोप

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात रात्र पाळीवरील कामगार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून. मयत कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा सविस्तर...

16:55 (IST) 11 Dec 2023
जयभवानी रस्ता परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक: तालुक्यातील पिंपळगाव खांब येथे शाळकरी मुलावर हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटे नाशिकरोड भागात जय भवानी रस्ता परिसरात वन विभागाच्या जाळ्यात एक बिबट्या अडकला. अजूनही परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 11 Dec 2023
सातारा : कोयना जलाशयातील तराफा सेवा तांत्रिक अडचणीमुळे बंद

तराफा सेवा अचानक बंद झाल्याने अनेक स्थानिक वाहनचालक व पर्यटकांची गैरसोय झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:44 (IST) 11 Dec 2023
नातेवाईकाची तब्येत पाहण्यासाठी आलेल्या महिलेचे चार लाखांचे दोन मंगळसूत्र चोरले

पनवेल: पाच दिवसांपूर्वी कामोठे वसाहतीमधील सेक्टर १८ येथील रस्त्यावर सोनसाखळी चोराने फळे खरेदी करुन पतीच्या दुचाकीवर बसणा-या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. चोरीस गेलेल्या दोनही मंगळसूत्रांची किंमत चार लाख रुपयांची असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने नोंदविले आहे.

सविस्तर वाचा...

16:44 (IST) 11 Dec 2023
शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय… नेमके होणार काय?

पुणे : करोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत, पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याची भीती व्यक्त करत शालेय शिक्षण विभागाने शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर...

16:43 (IST) 11 Dec 2023
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून काँग्रेस खासदार धीरज साहूच्या विरोधात निषेध मोर्चा आंदोलन

नवी मुंबई: कॉंग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहूच्या धाडीत जवळपास ३०० करोडची संपत्ती आढळून आली असून ‘नेते मालामाल आणि जनता फटेहाल’ हे काँग्रेसचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धीरज साहू याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध आंदोलन केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने माधुरी सुतार यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले आहे.

16:41 (IST) 11 Dec 2023
साप चावला? घाबरू नका… सरकार आहे पाठीशी

नारायणगाव : सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आता आर्थिक मदत देण्यात येणार आहे. केंद्रीय वन विभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले आहेत.

वाचा सविस्तर...

16:27 (IST) 11 Dec 2023
गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे; कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू, कुटुंबाकडून कारवाईची मागणी

कुटुंबाने आरोग्य विभागावर शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा...

16:17 (IST) 11 Dec 2023
गडचिरोली जिल्ह्यात दारु निर्मिती कारखाना होणार नाही – फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यात मोहापासून दारुनिर्मिती करणारा कारखाना प्रस्तावित आहे. त्याला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी विरोध दर्शविला आहे.

सविस्तर वाचा...

16:13 (IST) 11 Dec 2023
घराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक

मुंबई: नवीन प्रकल्पातील घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन त्याची फसवणूक करणाऱ्या विकासकाला पंतनगर पोलिसांनी अटक केली. नीरज वेद (५४) असे या विकासकाचे नाव असून तो घाटकोपरमधील रहिवासी आहे.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 11 Dec 2023
वाशीम : चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीच चोरी ; २ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास!

चव्हाण यांच्या घरातून चोरट्यांनी सोने, दागिन्यांसह २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 11 Dec 2023
नागपूर : कोट्यवधींची संपत्ती जमविलेल्या काँग्रेस खासदार धीरज साहूंविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन

या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ६ विधानसभा मतदारसंघांत निषेध आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 11 Dec 2023
अजित पवार दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार, ठाकरे गटाचा मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा; म्हणाले, "३१ डिसेंबरला..."

उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लील जाणार असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाने गेला आहे. ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत म्हणाले, ३१ डिसेंबरला एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाईल. त्यामुळे अजित पवार दिल्ली दौरा करुन अमित शाह यांची भेट घेणार असतील. ही शक्यता नाकारता येत नाही

15:42 (IST) 11 Dec 2023
बोईसर : नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी; ग्रामस्थ संतप्त

कोलवडे येथील नैसर्गिक नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.

सविस्तर वाचा...

Uddhav Thackeray Asaduddin Owaisi

"तेलंगणात भाजपाने ओवेसी योजना अंमलात आणली, पण...",

भाजपाच्या तेलंगणातील पराभवावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपा नेतृत्वाला टोला लगावला आहे. ठाकरे गटाने 'सामना' या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटलं आहे की, “तेलंगणात मोदी-शहांच्या भाजपाची धूळधाण उडाली. मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे राज्यांत जे मोदी-शहा होते तेच तेलंगणात होते व ‘जमकर’ प्रचार करीत होते. योजनांच्या घोषणा व नेहमीचे तांडव करीत होते. मुसलमानांची मते काँग्रेसकडे जाऊ नयेत यासाठी ‘ओवेसी’ योजनाही अमलात आणली. तरीही काँग्रेसचा विजय झाला”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.

Story img Loader