Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 11 December 2023 : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा (११ डिसेंबर) तिसरा दिवस आहे. विधीमंडळात आजही राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. तसेच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्यावरील प्राप्तीकर विभागाच्या धाडींनंतर काँग्रेसवर देशभरातून टीका होत आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळू शकतात. कारण राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आंदोलनं करत आहेत. यासह अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही चर्चा होऊ शकते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सांगलीतल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत आहे. याबाबतचे अपडेट्सही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील आणि राज्यभरातील वेगवेगळ्या बातम्यांचा आढावा घेतला जाईल.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : हिवाळी अधिवेशनासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
‘कोण आहे अमोल मिटकरी. काय आहे त्यांचा संघर्ष, अशा लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे नसतात’ म्हणत आव्हाडांनी मिटकरींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.
मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख बनलेल्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन खात्यातील ताफ्यात स्वमालकीच्या केवळ ११८९ बसगाड्या उरल्या असून त्या तुलनेत कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर घेतलेल्या खासगी बसगाड्यांची संख्या अधिक आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी वाडेघर मधील संतप्त ग्रामस्थांनी दुर्गाडी ते वाडेघर वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
नवी मुंबई: आशियातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आवारातील शौचालय घोटाळा समोर आल्यानंतर आता पर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेले दोघे कंत्राटदार होते तर आता स्वच्छता अधिकारी असणाऱ्या सिद्राम नागोराव कटकधोंड याला अटक करण्यात आली आहे.
पनवेल: आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल परिसराचे भविष्याचे विकास नियोजन योग्यपद्धतीने होण्यासाठी तसेच विकास होत असताना स्थानिक शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारमध्ये पनवेलचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय जनता पक्षाचे आ. प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरणामुळे भूमिपुत्रांचे होणारे फायदे याविषयी सभा घेण्याचे रविवारी जाहीर केले.
तत्कालीन महिला व बाल कल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादची १ लाख ९ प्रकरणे असल्याची माहिती सभागृहात दिली होती.
पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी भटके विमुक्त समाजाची इंदापूर येथे शनिवारी (९ डिसेंबर) भव्य सभा झाली. भुजबळांनी या सभेमधून गावबंदी कायद्याला धरून नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच सर्वपक्षाच्या नेत्यांना गावबंदी आहे, तर आमदार रोहित पवार यांच्या युवा यात्रेचे स्वागत कसे होते?, असा सवालही त्यांनी सभेत केला होता.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत असून त्याचा प्रवाशांना फटका बसला आहे.
ओबीसी व्हीजीएनटी परिषदेचे प्रदेश सरचिटणीस संग्राम माने यांच्या नेतृत्वाखाली विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शने करण्यात आली.
पनवेल: सिडको महामंडळामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रीयेला चालना मिळाली आहे. ९ डिसेंबरपासून सिडको मंडळातील २३ लेखा लिपीक पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून या भरती प्रक्रियेत ८ जानेवारीपर्यंत फक्त उमेदवार ऑनलाईनपद्धतीने अर्ज करु शकतील.
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली.
पुणे : प्रसूतीनंतर महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. आता एका नव्या संशोधनातून एक तृतीयांश महिलांना प्रसूतीनंतर दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब उघड झाली आहे. जगभरात दरवर्षी सुमारे चार कोटी महिलांना हा त्रास सुरू होत असल्याची धक्कादायकही आकडेवारीही संशोधनातून समोर आली आहे.
पुणे: पुण्यातील मालमत्ता क्षेत्रात मागील महिन्यात तेजीचे वारे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत सात टक्के वाढ नोंदविण्यात आली. एकूण घरांच्या विक्रीत ५० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचा वाटा ५५ टक्के आहे.
शरद पवार गटाला संपविण्यासाठी राजकारणातील हा ‘ओरी’ सक्षम आहे, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.
पुणे: शाळा सुरू करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : तापमान बदलामुळे जगभरात ऋतुचक्रात अनेक बदल घडत आहेत. तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमान यातील मोठ्या चढउतारांमुळे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होऊन हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत.
सोनाली यांनी अजय खर्चे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे.
संपूर्ण राज्यभर सुरू असलेली ही यात्रा रविवारी उपराजधानीत दाखल झाली. येथे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला तर संपूर्ण काश्मीरमध्ये निवडणुका घेता येतील. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम आपला भाग राहील.
अधिवेशन काळात काही घातपात घडविण्याचा कट होता का? असा संशय निर्माण झाला आहे.
एक पोहता पोहता पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला.
राज्यातील या प्रकल्पाला मिळालेल्या यशामुळे इतर राज्यांतही अशाप्रकारचा प्रकल्प राबवला जात आहे.
खंबाडा ते मुराडगाव रस्त्याच्या कडेला वाहणाऱ्या वायगाव नाल्याजवळ रविवारी वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
कार्यक्रमाआधी परिसरातील वृक्ष विनापरवानगी कापून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका छोट्या गावात दोन किलोमीटर लांबीच्या गर्दीची अंत्ययात्रा एका शिक्षकासाठी निघण्याची बाब आश्चर्याचीच म्हणावी लागेल.
डॉ. बंग अध्यक्ष असलेल्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत जवळ येत आहे. दुसरीकडे जरांगे या प्रश्नावर अधिक आक्रमक होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत आहे.
किशोर जगताप यांच्या विरोधात संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने लैंगिक छळ केल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.
पंचनामे झाल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्मयंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
“तेलंगणात भाजपाने ओवेसी योजना अंमलात आणली, पण…”,
भाजपाच्या तेलंगणातील पराभवावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपा नेतृत्वाला टोला लगावला आहे. ठाकरे गटाने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटलं आहे की, “तेलंगणात मोदी-शहांच्या भाजपाची धूळधाण उडाली. मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे राज्यांत जे मोदी-शहा होते तेच तेलंगणात होते व ‘जमकर’ प्रचार करीत होते. योजनांच्या घोषणा व नेहमीचे तांडव करीत होते. मुसलमानांची मते काँग्रेसकडे जाऊ नयेत यासाठी ‘ओवेसी’ योजनाही अमलात आणली. तरीही काँग्रेसचा विजय झाला”, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.