Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 12 December 2023: ३१ डिसेंबरपूर्वी शिवसेनेतील आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. त्यामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात चालू असतानाही ही सुनावणी घेतली जात आहे. दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
नाशिक: पंचायत समितीकडून आलेले सर्व घरकुल प्रस्ताव तत्काळ मंजूर करून घरकुलांचे बांधकाम करण्याचे लेखी आदेश द्यावेत, यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला.
मुंबई: गेली अनेक वर्षे दुरावस्थेत असलेले आरे वसाहतीमधील रुग्णालय चालविण्यासाठी अखेर वैद्यकिय संस्थेची निवड करण्यात आली आहे. आरे वसाहतीमधील रुग्णालय चालविण्याची जबाबदारी कुर्ला येथील आर्यन मेडिकल ॲण्ड एज्युकेशन संस्थेवर सोपविण्यात येणार आहे.
डहाणू: डहाणू तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक देण्यास टाळाटाळ करणे, अधिक पैशाची मागणी करणे आणि बळजबरी आपल्या दुकानातून मुद्रंकावर मजकूर छापून घेण्याची सक्ती केली जात असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.
पुणे: ऑनलाइन गेमिंगविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी रम्मी, तीन पत्ती हे खेळ खेळण्यात आले. असा प्रकार यापूर्वी कधीच न पाहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि कामानिमित्त आलेले नागरिक या सर्वांचेच लक्ष वेधले.
यांच्या ऑफिसला आम्ही पत्र पाठवलंय. इथे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत दुपारी १२ वाजताच सरकारपर्यंत आमच्या मागण्या पोहोचवल्या आहेत. आमचं मत होतं की आम्हाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे. शेतकऱ्यांचे, मुलांचे, बेरोजगारांचे, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तरुणांचे सगळे मुद्दे घेऊन आलो होतो - रोहित पवार
हे कसलं सरकार आहे? गरिबाच्या मुलांवर लाठीचार्ज करताय. ही कसली दडपशाही आहे? पोलिसांना वरून आदेश येतात. त्यानुसार हे कारवाई करतात. आमचं म्हणणं एवढंच आहे, की आम्ही घेतलेले मुद्दे ऐकून घ्या. आम्ही पत्र दिलंय, चर्चा झालीये. तुम्ही संविधानिक पद्धतीने बोलू शकता ना? आम्ही अधिकाऱ्यांना म्हणालो की तुम्ही मंत्र्यांशी बोला. चर्चा करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही म्हणता शहर अध्यक्षांशी बोलायचं. आमदारानं शहर अध्यक्षांशी बोलायचं का? एका आमदाराची ही स्थिती असेल तर गरिबाची काय आहे? आम्ही गरीबांचे प्रश्न घेऊन चाललो होतो. पण आमदाराचं ऐकत नसतील, तर गरीब लोकांचं कधी ऐकणार हे सरकार? - रोहित पवार
डोंबिवली: ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यावर मंगळवारी सकाळी वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या एका महिला वाहतूक हवालदाराने भरधाव असलेल्या एका दुचाकी स्वाराला रोखले.
कल्याण: दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील शहाड भागात रात्रीच्या वेळेत अंबरनाथ येथील एका विद्यार्थ्याचे चार जणांनी अपहरण करून त्याला म्हारळ येथील टेकडी भागात नेले होते.
डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे कठोर आदेश पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
हे एक फुल दोन हाफ नाहीयेत. हे एक फुल आणि दोन डाऊटफुल आहेत. यांच्यात फुल कुणीच नाही. यांच्यात कुणी फुल असेल, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. अनिल देशमुख बसले आहेत. हे आमचे जेलमधले मित्र आहेत. जेलमधली मैत्री पक्की असते. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि पवारांचा चेला आहे. याला म्हणतात डबल इंजिन - संजय राऊत</p>
डोंबिवली: कल्याण पूर्वेतील एका नोकरदाराला पाच जणांच्या टोळक्याने विदेशी चलन देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रूपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला.
बुलढाणा: नुकतेच मान्यता मिळालेल्या परंतु प्रशासकीय अडचणीमुळे कार्यान्वित होण्यात विलंब होत असलेल्या बुलढाण्यासह राज्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची राज्यस्तरीय आढावा बैठक आज मंगळवारी पार पडली.
कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील विस्तारीकरणात जाणवणाऱ्या सर्व त्रुटी दूर करू, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
अलिबाग- निर्यात बंदीवरून राज्यात वातावरण तापले असतांनाच रायगड जिल्ह्यातील भाजप नेते दिलीप भोईर यांनी ग्राहकांना दहा रुपये दराने कांदा वाटपाची योजना राबविली आहे. अलिबाग तालुक्यात प्रतीग्राहक पाच किलो या प्रमाणे त्यांनी सात टन कांद्याचे वितरण केले आहे.
चंद्रपूर: ओबीसींच्या न्यायिक मागण्यांसाठी ७ डिसेंबरपासून चिमूर क्रांती भूमीत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात अक्षय लांजेवार व अजित सूकारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले.
नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस आहे. ते रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पवार आज नागपूरमध्ये आले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेसुद्धा नागपूरमध्ये आहेत. ठाकरेसुद्धा संघर्ष यात्रेला उपस्थित राहणार आहेत.
नागपूर : सरकारने जुनी पेन्शन लागू न केल्यास १४ डिसेंबरपासून सरकारी- निमसरकारी कर्मचारी कामबंद करतील, असा इशारा आमदार किरण सरनाईक यांनी दिला. नागपुरातील विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते.
पिंपरी: महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूचे प्रकरण अधिवेशनात गाजले. या प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिकेला दिले आहेत.
अकोला : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने विजयवाडा ते जयपूर अशी एकेरी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १४ डिसेंबर रोजी विजयवाडा येथून ०७५९७ विजयवाडा - जयपूर एकेरी विशेष रेल्वे १४.०५ वाजता सुटेल व १६ डिसेंबर रोजी जयपूरला ०५.२५ वाजता पोहचेल. मार्गात ही विशेष गाडी गुंटूर, सत्तेनापल्ली, पिदुगुरल्ला, नाडीकुडे, मिर्यालागुडा, नलगोंडा, सिकंदराबाद, कामरेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौड़गड, भिलवाडा, बिजाईनगर, अजमेर, किशनगड आणि फुलेरा स्थानकावर थांबेल. विजयवाडा ते जयपूर या विशेष रेल्वेचे सिकंदराबाद ते जयपूर पर्यंतचे वेळापत्रक हैदराबाद - जयपुर प्रमाणे आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
गोंदिया : सोमवारी (दि. ११) संध्याकाळी भोपाळ येथे भाजपा विधिमंडळ बैठकीत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी उज्जैन येथील मोहन यादव यांची निवड करण्यात आली अन् शिवराजसिंह यांच्या सासरवाडीत निराशा पसरली.
नागपूर: विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगळाच प्रयोग केला. त्यामुळे कृषी मंत्री संतापले, परब यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.
चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्रदूषण नियंण मंडळाच्या माध्यमातून २०१९ पासून ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अर्थात राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षण सुरू केले आहे.
अकोला: जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठीच्या पाणीटंचाई आराखड्यानुसार आठ गावांमध्ये १९ लाख ६२ हजार रुपये निधीतून १२ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
ठाणे: सिद्धेश्वर जलकुंभाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हाॅल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असून यामुळे गुरुवार सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे भरवस्तीत मंगळवारी सकाळी बिबट्या शिरल्याने एकच धावपळ उडाली. शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर मानल्या जाणाऱ्या डोंगरगाव रोडवरील पटेल रेसिडेन्सीमागे असणाऱ्या आदित्या हॉस्पिटलमध्ये बिबट्या शिरल्याचे आढळून आल्याने रुग्णालयातील कर्मचारी भयभीत झाले.
३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी "३१ डिसेंबरला दिल्लीवरून जो आदेश येईल, त्यानुसार ते निकाल देतील", अशा शब्दांत टीकास्र सोडलं.
सकाळी झालेल्या सुनावणीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दल काढलेले उद्गार संतापजनक होते. बाळासाहेबांनी लोकशाहीची कोणतीही तत्व पाळली नाहीत, ते मनमानी करत होते, त्यांनी निवडणुका घेतल्या नाहीत असे आरोप त्यांनी केले आहेत. बाळासाहेबांशी त्यांचा कधीच संबंध आला नाही. पण ते बंड करताना आम्हाला बाळासाहेबांबद्दल शिकवत होते - अनिल परब
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी का राजीनामा दिला, याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमायला हवी. त्यांच्यावर कोणत्या दोन मंत्र्यांचा दबाव होता, त्याची चौकशी व्हायला हवी. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता असं मला समजलं. ते इतके दिवस का लपवून ठेवलं, त्याची चौकशी करा - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आम्हाला आदर आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल विधानं केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईल का? या देशात लोकशाही आहे आणि अनेक राजकीय नेते विधानं करत असतात. जर हे लोक त्यांच्याविरोधात अशा प्रकारे गुन्हे दाखल करायला लागले, तर त्यांना हे म्हणायचा अधिकार नाही की त्यांनी आणीबाणीविरोधात लढा दिला - संजय राऊत</p>
ठाणे: महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी काही महिन्यांपुर्वी केलेल्या घोषणेनंतरही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तास शवविच्छेदन सुरू होऊ शकलेले नाही.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचे अपडेट्स