Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 12 December 2023: ३१ डिसेंबरपूर्वी शिवसेनेतील आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. त्यामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात चालू असतानाही ही सुनावणी घेतली जात आहे. दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

13:37 (IST) 12 Dec 2023
“…तर नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा,” संजय राऊत यांची मागणी

नागपूर : मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नक्कीच करा, सोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा. शिवाय नगर विकास विभागाच्या गेल्या दीड वर्षांतील कारभाराचे आणि व्यवहाराचेही ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 12 Dec 2023
“मंत्री खातात तुपाशी, रुग्ण मारतो उपाशी!” विरोधकांचा आरोग्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल; मास्क, टेथेस्कोप अन् स्ट्रेचर घेऊन….

नागपूर : राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णमृत्यू वाढले आहेत. औषध खरेदी थांबलेली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात आंदोलन केले. विरोधकांनी तोंडाला मास्क, गळ्यात टेथेस्कोप घालून आणि स्ट्रेचर आणून आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप केला.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 12 Dec 2023
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी २४ हजार अर्जदार पात्र

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३११ घरांच्या सोडतीतील २९७० घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेतील घरे वगळून) करण्यात आलेल्या अर्जांची अंतिम यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम यादीनुसार अनामत रक्कमेसह प्राप्त २४ हजार ३०३ अर्जांपैकी ३०३ अर्ज अपात्र ठरले असून २४ हजार अर्ज पात्र ठरले आहेत.

वाचा सविस्तर…

13:23 (IST) 12 Dec 2023
दोन शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या.. तर शिक्षिकेची विद्यार्थीनीला जबर मारहाण; गुन्हा दाखल

नवी मुंबई: दोन शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मानसिक तणाव त्यातून आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल या एकाच दिवशी दोन घटना घडल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 12 Dec 2023
विद्युत वाहनांसाठी शहाड येथे चार्जिंग हब; कल्याण-डोंबिवली परिसरात ६४ चार्जिंग केंद्र उभारण्याच्या हालचाली

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने शहराच्या विविध भागात एकूण ६४ विद्युत चार्जिंग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, शहाड येथे खासगी वाहनांसाठी प्रशस्त चार्जिंग हब उभे करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 12 Dec 2023
बेकायदा जाहिरातबाजी केल्यास होणार गुन्हे दाखल; महापालिका क्षेत्रात दर बुधवारी फलक सफाई मोहीम

ठाणे: शहरातील मेट्रोच्या खांबांवर तसेच वाहतूक बेटांवर बेकायदा जाहिरातबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 12 Dec 2023
अजितदादांचा आमदार असलेल्या पिंपरीवर भाजपचा डोळा? घेतला ‘हा’ निर्णय

पिंपरी : महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरीतून कमळाच्या चिन्हावर आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपने केला असून, त्यासाठी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांची पिंपरीच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 12 Dec 2023
Maharashtra News Live Today: शरद पवारांच्या वाढदिवशी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट!

आधी लढाई जनहिताची !!! प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती. मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत. कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! – सुप्रिया सुळे</p>

12:12 (IST) 12 Dec 2023
Maharashtra News Live Today: “भाजपा अजित पवारांना कधीच मुख्यमंत्री करणार नाही”

भाजपानं प्रत्येकाचा वापर करून घेतला. २५ वर्षं शिवसेनेचा वापर करून घेतला. उद्धव ठाकरेंनी तो पुढे करू दिला नाही म्हणून आमची युती तुटली. अजित पवारांचा भाजपाने राष्ट्रवादी फोडण्यासाठी वापर करून घेतला. त्यांना भाजपा कधीच मुख्यमंत्री करणार नाहीत. कारण लोकांमध्ये असणारा नेता भाजपाला परवडत नाही, आवडत नाही. भाजपाला फक्त आपल्या ताटाखालचे मांजर हवे असतात – वैभव नाईक

11:51 (IST) 12 Dec 2023
एटीएसच्या कार्यालयातून पळालेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक

मुंबई : काळाचौकी येथील राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयातील शौचालयाच्या भिंतीवरून उडी मारून पळालेल्या बांगलादेशी नागरिकाला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. भारतात बेकायदेशिररित्या राहत असल्याप्रकरणी आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.

वाचा सविस्तर…

11:50 (IST) 12 Dec 2023
मुंबईकरांना अनुभवता येणार गुलाबी थंडी; रात्री गारवा, दिवसा मात्र उष्णता

मुंबई : राज्यात अनेक भागातील तापमानात घट होऊ लागली असून थंडी पडायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील रात्रीचे तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री गुलाबी थंडी अनुभवता येईल.

वाचा सविस्तर…

11:47 (IST) 12 Dec 2023

11:12 (IST) 12 Dec 2023
Maharashtra News Live Today: विरोधकांनी केला जस्टिस लोया आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित…

नागपुरात न्यायमूर्ती लोयांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचीही एसआयटी चौकशी व्हायला हवी. त्यांच्या नातेवाईकांची तक्रार नाही असं सांगितलं जाईल. पण मग तशी दिशा सालियानच्याही कुटुंबीयांची काहीही तक्रार नाहीये – अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते

महाराष्ट्र न्यूज अपडेट

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचे अपडेट्स