Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 13 December 2023 : राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांपाठोपाठ अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी काल (१२ डिसेंबर) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड ठरली. दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही बाब सरकारने सांगायला हवी होती, असाही मुद्दा विरोधकांनी लावून धरला. आज (१३ डिसेंबर) विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर आज चर्चा होणार आहे. तसंच, राज्यातील इतर घडामोडी, हवामान अपडेट्सविषयी जाणून घेऊयात.
Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
बुलढाणा : प्रलंबित नुकसान भरपाईच्या मागणीकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह पेनटाकळी सिंचन प्रकल्पात आज बुधवारी जलसमाधी आंदोलन केले. बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा २०२०-२१ मध्ये फुटला होता. यामुळे पेनटाकळी, दूधा, रायपुर, ब्रह्मपुरी, पाचला आदी गावांतील शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. या नुकसानीचा शेतकऱ्याना मोबादला मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाने नुकसानीचे पंचनामे तर केले, मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही.
शासनाने कागदोपत्री ९ कोटी ३९ लाख रुपये मंजूर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना याचा अद्याप पर्यंत लाभ मिळालेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबादला देण्यात यावा या मागणीसाठी आज १३ डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व सहा शेतकऱ्यांनी पेनटाकळी धरणात जलसमाधी आंदोलन केले.

यवतमाळ: स्पिरीट व ब्लिचिंग पावडरचा वापर करून घरीच बनावट देशीदारू विक्रीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांनी उजेडात आणला. अवधूतवाडी पोलिसांना सोबत घेवून स्थानिक तारपुरा येथे ही कारवाई करण्यात आली.
गोंदिया: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस कारवाई करतातच मात्र गोंदिया वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी अशी एक मोहीम सुरू केली आहे की, दुचाकी वाहनांवरील कंपनीचे सायलेन्सर काढून त्या जागी आधुनिक सायलेन्सर बसवून चालविणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे.
ज्यांना आरक्षण हवंय त्या प्रत्येकाला आरक्षण मिळायलाच हवं. त्यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळायला हवं - गौतमी पाटील
नागपूर: दिशा सालियान प्रकरणातील आरोपी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणे सरकारकडे करणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात बीव्हीजी कंपनीकडून नेमण्यात आलेल्या कामगाराने कॅश काऊंटर वर ६८ हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण उजेडात आलं आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवन शांताराम भांगले यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आदित्य अंकुश खंडागळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : विविध राजकीय पक्षांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) शंका घेण्यात येते. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतात. ईव्हीएम हॅक करता येते, मतदान एकाला केल्यानंतर प्रत्यक्ष मत दुसऱ्यालाच जाते असे एक ना अनेक दावे केले जातात. निवडणुका ईव्हीएमवर न घेता पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी राजकीय पक्षांच्या विविध नेत्यांनी आजवर केली आहे. ईव्हीएम हॅक करता येत नसल्याचे भारत निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. तसेच सामान्य नागरिकांचा केवळ मतदानाच्या दिवशीच ईव्हीएम यंत्राशी संबंध येतो. ईव्हीएमबाबत सर्व सामान्य नागरिकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, हे मशीन प्रत्यक्षात कसे काम करते, कोणती टेक्नॉलॉजी यात वापरण्यात आली आहे. याबद्दलची माहिती आणि ईव्हीएम प्रत्यक्ष हाताळण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणूक होणार आहे आणि त्यानंतर पाच-सहा महिन्यांत विधानसभेचा कालावधी संपत आहे. या दोन्ही निवडणुकांत ईव्हीएम मशीनचा वापर होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या उरणच्या द्रोणागिरी डोंगराच्या बेकायदा उत्खननाला चाप लावण्यासाठी महसूल विभागाने कर्मचाऱ्यांचा चोवीस तास जागता पहारा ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील आरक्षण केंद्र आणि विश्रामगृहात बुधवारी दुपारी भीषण आग लागली. स्थानकामधील उपहारगृहाचे काम सुरू असताना ही आग लागली. आग लागताच तात्काळ स्थानकातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. आग वाढत असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी सांगितले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तसेच, मध्य रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून एलटीटी स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकूण ३५ पदांपैकी केवळ १७ पदे भरली आहेत. तर २४ पैकी ११ विभाग कार्यालयांमध्ये सहायक आयुक्त नाहीत.
मुंबई : राज्यासह देशामध्ये कर्करोगाच्या संख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रामध्ये मागील १० वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दीडपटीने वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या १ लाख २१ हजार ७१७ कर्करोग रुग्ण असून, मागील १० वर्षांमध्ये राज्यामध्ये २३ हजार ९५८ रुग्णांनी वाढ झाली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी मंगळवारी अंधेरी स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविली.
अकोला: ‘यलो मोझॅक’ रोगाने सोयाबीन पिकांवर आक्रमण केल्याने त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. बाधित क्षेत्राचा सर्व्हे कृषी विभागाने केला असून जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आढळले.
बुलढाणा: लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील शेतामध्ये गांजाची झाडे लावली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. मंगळवारी रात्री सुरू झालेली ही कारवाई आज बुधवारी सकाळीदेखील सुरू असून गांजाची शेकडो झाडे आढळून आली आहे.
सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय ८०) यांचे आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास एका खासगी रूग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
विधान परिषदेतील गॅलरी पासेस बंद करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून काही लोकांनी उड्या घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाईंदर : मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळातील पाचशे सुरक्षारक्षकांना सहा महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शासनाच्या गृह विभागाकडून नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तालयाकडून यावर्षी पाहिल्यांदाच भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.त्यामुळे लवकरच प्रशिक्षण पूर्ण करून जवळपास ९५८ पोलीस कर्मचारी आयुक्तालयात समाविष्ट होणार आहेत. हे कर्मचारी दाखल होईपर्यंत सुरक्षा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याची मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाने शासनाच्या गृहविभागाकडे सादर केला होता.त्यानुसार सहा महिन्यासाठी सुरक्षा रक्षकांना मुदत वाढ देत असल्याचे आदेश गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण ढिकले यांनी जारी केले आहेत.तर यात पून्हा मुदतवाढ न देण्याची विशेष अट नमूद करण्यात आली आहे.
नागपूर: अजित पवार यांच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलतांना म्हणाले, अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं विधान चुकीचं आहे.
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप झाला.या यात्रेत रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले.
युवा संघर्ष यात्रेत बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर टीका करताना त्यांचे युवकांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. त्यानी फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्याला फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले. फडणवीस म्हणाले '' रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेकडे लोकांनी पाठ फिरवली.
गावातील लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले नाही त्यामुळे रोहित पवार नैराश्यातून आरोप करीत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांविरोधात २०२१ मध्ये बेनामी मालमत्तेप्रकरणी दाखल केलेली तक्रार उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली.
अमरावती: जिल्ह्यात अकरा महिन्यांत ५४४ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत रुग्णवाढ अधिक आहे. एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली.
अमरावती: जिल्ह्यात अकरा महिन्यांत ५४४ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत रुग्णवाढ अधिक आहे. एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली.
वर्धा: तब्बल एक वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर पळून आलेल्या एका विधवेची ही थरारक कथा. तिने हिंगणघाट पोलीसांकडे धाव घेत झालेला अत्याचार कथन केला.
ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानल्या जाणाऱ्या ढोकाळी ते कोलशेत या रस्त्याचे काम महापालिका आणि महावितरण कंपनीच्या वादामुळे रखडले आहे. या रस्त्याच्या कामात बाधित होणारे विद्युत खांब, वाहिन्या आणि रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी १२ कोटींचा निधी द्यावा अशी मागणी महावितरण कंपनीने महापालिकेकडे केली आहे.
भाईंदर : मीरा रोड येथे जलकुंभ उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र यासाठी तब्बल ६७ झाडांवर कुऱ्हाड फिरवली जाणार असल्यामुळे पर्यावरण प्रेमी कडून संतात व्यक्त केला जात आहे.
मीरा भाईंदर शहराला पालघरच्या सूर्या धरणातून २१८ दश लक्ष लीटर पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे.या पाण्याचे वितरण करण्यासाठी शासनाकडून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आखण्यात आली आहे.याच बरोबर स्थानिक महापालिकेला अंतर्गत जलवाहनी टाकायचे काम पूर्ण करायचे आहे.त्यामुळे या पाण्याची साठवणूक करण्यासाठी प्रशासनाने जल कुंभ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार मिरा रोड येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानात ( आरक्षण क्रमांक २०१) आणि आला हजरत मैदान ना जवळील मल नि:सारण भूखंडाची निवड करण्यात आली आहे.
कल्याण : डोंबिवलीतील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेसमोरील सुतिकागृहाच्या जागेवर १५० रुग्ण शय्येचे कर्करोग रुग्णालय आणि ५० खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. या सुतिकागृहाच्या जागेवर कर्करोग रूग्णालय उभारले जावे यासाठी वेगाने निवीदा प्रक्रिया राबवली जावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यंतरी आदेश दिले होते.
चंद्रपूर: अंबोरे कुटुंबाचा भंगार विक्रीचा व्यवसाय. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. अशात २२ वर्षीय मुलगा आजारी पडला. त्याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झालेत. सविस्तर वाचा...
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह
Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या