Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 13 December 2023 : राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांपाठोपाठ अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी काल (१२ डिसेंबर) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड ठरली. दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही बाब सरकारने सांगायला हवी होती, असाही मुद्दा विरोधकांनी लावून धरला. आज (१३ डिसेंबर) विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर आज चर्चा होणार आहे. तसंच, राज्यातील इतर घडामोडी, हवामान अपडेट्सविषयी जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
कल्याण – बाजारपेठा खरेदीसाठी गजबजलेल्या असतानाच मंगळवारी दुपारी एका उधळलेल्या रेड्याने भर कल्याण मधील बाजारपेठेत धुमाकूळ घातला. चौखुर उधळत हा रेडा दुचाकी, चारचाकी, पादचाऱ्यांना धडक देत सुसाट धावत सुटला होता. बेभान झालेल्या या रेड्याला अखेर एका सोसायटीच्या आवारात कोंडण्यात आले.
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘ पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत ‘ या वादग्रस्त विधानावर विद्यार्थ्यांनी काय दिवे लावायचे आहेत ते २०२४ निवडणुकीत लावतील,अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकाद्वारे नोंदवली आहे.
नागपूर: राज्याच्या उत्तरेकडील भागात थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातही किमान तापमानाचा पारा खाली घसरत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता हिवाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाला केली आहे. मात्र राज्यपालांची सूचना योग्य असली तरी तिची अमंलबजावणी व्यवहार्य नाही असे मत शिक्षण संस्थाचालकांनी व्यक्त केले.
नागपूर: शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते व आमदार भरातसेठ गोगावले यांनी मंगळवारी आमदार अपात्रता सुनावणीत छत्रपती शिवाजी महाराज सुरातला गेले होते, म्हणून आम्ही गेलो असे म्हटले होते.
मुंबई : कचरा टाकून, तसेच पान खाऊन ठिकठिकाणी थूंकणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईमध्ये ७२० क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पिंपरी : शहराचा लाेकसंख्या वाढीचा दर आणि सन २०४१ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडे केली आहे.
नागपूर: ‘धारावी बचाव, अदाणी हटाव’ अशा घोषणा देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बुधवारी निदर्शने केली. आमदारांनी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढून आंदोलन केले.
राज्यातील आरोग्य प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. याप्रकरणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे. या मागणीसाठी विरोधकांनी आज सभात्याग केला.
नागपूर: राज्यात अनुसूचित जातींसाठी असलेले १३ टक्के आरक्षण अ, ब, क, ड (व्हीजेएनटी प्रमाणे) अशा चार वर्गात विभागून द्यावे, अशी मागणी हिंदू दलित महासंघ व मातंग समाजाच्या संघटनांकडून केली जात होती. आता याबाबत शासन निर्णय काढून सरकारने त्यादिशेने पाऊल उचलले आहे.
वर्धा: कोविड-१९ महामारी अगोदर विविध मेल/एक्सप्रेस गाडयांचे थांबे सिंदी रेल्वे, तुळजापूर, सेवाग्राम, हिंगणघाट, वर्धा, पुलगांव, धामणगांव, चांदूर, वरुड (ऑंरेज सिटी), मोर्शी या रेल्वे स्थानकावर सुरु होते, परंतु कोविड-19 महामारी मुळे सर्व थांबे रद्द करण्यात आलेले होते. रद्द झालेले थांबे पुर्ववत करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते.
येथे क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=qMKc8Of7Y2U
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते ते ब्रिटिश आणि इस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिथे गेलात. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते – संजय राऊत</p>
नागपूर: राज्यातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी राज्य महिला आयोगाने ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून गुरूवारी १४ डिसेंबरला वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाची सुरूवात होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे सत्तेत येतात. पण मग सत्तेत आल्यानंतर महाराजांचा पदोपदी अपमान करायला हे विसरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज सूरतमधील अत्याचारी व्यवस्थेला सबक देऊन तेथील खजाना आणायला गेले होते. हा इतिहास त्यांना माहीत नसेल. परंतु, हे लोक गुजरातच्या गुलामगिरीमध्ये गेले होते. गुजरातच्या गुलामीत तुम्हाला कसं ठेवलं होतं, कसं वागवलं गेलं होतं. शिवाजी महाराजांची तुलना यांनी केली, एवढी त्यांची लायकी नाही. यांचे अनेक मंत्री, तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचा अपमान केला. यांच्या प्रवक्त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. आमच्या महापुरुष आणि देवतांचा अपमान करण्याचा सपाटा लावला आहे – नाना पटोले