Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 14 December 2023 : जुनी पेन्शन लागू करा, यामागणीसाठी आजपासून (१४ डिसेंबर) राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. याबद्दलचे पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनात उमटण्याचे चिन्ह आहेत. तसेच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात, साखर-इथेनॉल आणि दूध प्रश्न उद्भवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल (१३ डिसेंबर) मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेलो असताना केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर हा प्रश्न घातला आहे. त्यासंदर्भात उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच काल संसदेत झालेल्या घुसखोरीमध्ये महाराष्ट्रातील एक तरुण सामील होता, याचेही पडसाद विधीमंडळात उमटण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates | राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा
वाशिम : हल्ली दीर्घायुष्य लाभणे कठीण झाले आहे. सर्वसाधारणपणे ७० ते ८० वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जात आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील आमखेडा येथील सुंदरबाई नामदेव ताजने यांनी याला फाटा दिला. आज, १४ डिसेंबर रोजी त्यांनी १२५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या दीर्घ आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे.
नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी वाय पाटील मैदानात १४ ते १७ डिसेंबर दरम्यान महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने मैदान प्रवेशद्वारासमोरील सेवा रस्त्यावर अन्य वाहतूक आणि पार्किंगसाठी प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. यातून अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सदर प्रवेश बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ याठिकाणी आयडीएफसी फर्स्ट बँक भारत विरूद्ध इंग्लंड हा महीला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना खेळविला जाणार आहेत.
पनवेल : नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र म्हणजे ‘नैना’ प्राधिकरणाविरोधात मागील आठ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत. बुधवारी दुपारी आंदोलकांचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधींनी सिडको भवनामध्ये जाऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गिकर यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने सरकारी प्रशासनाबरोबरची पहिलीच बैठक निष्फळ ठरली. यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. पनवेलजवळील तुरमाळे गावालगत गोवा मुंबई महामार्गावर नैनाबाधित शेतकरी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील काँक्रीट रस्ते कामांमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भुयारी मलवाहिन्या, रस्त्या लगतची गटारे नादुरूस्त झाली आहेत. भुयारी गटारांमध्ये पाच ते सात फूट खोल मातीचे भराव पडले आहेत. अनेक ठिकाणी गटारे तुंबली आहेत.
अपेक्षित वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहराअंतर्गत केवळ रात्री ११ ते पहाटे पाच आणि दुपारी दोन ते चार याच वेळेस वाहतूक परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रूग्णालयातील परिचारक आणि परिचारका देखील या बेमुदत संपात सहभागी झाले आहे.तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
वसई: वसई पूर्वेच्या भागातील शिरवली आणि मेढे येथे मंगळवार पासून भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रात ऑनलाइन पध्दतीने नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत २१६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
वसईतील भात कापणीची कामे मार्गी लागल्यानंतर झोडणीची कामे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे भात खरेदी केंद्रावर शेतकरी आपले भात विक्रीसाठी घेऊन जातात. वसईतील शिरवली व मेढे या दोन ठिकाणच्या केंद्रावर हे भात नेले जाते. भाताचे हे आलेले पीक शासन खरेदी करत असल्याने भात खरेदी केव्हा सुरू होते याची शेतकरी वाट पाहत होते
तर लवकर खरेदी सुरू करा असा आग्रहही धरत होते . अखेर मंगळवार पासून भात खरेदीकेंद्र सुरू करण्यात आले आहे.
दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे.
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील नव्या-जुन्या सर्व प्रकल्पातील इमारतींवर लोखंडी शिडी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोखंडी जाळ्यांच्या उद्वाहनाऐवजी स्टीलचे बंद दरवाजे असलेली उद्वाहने बसविणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
माथाडी कायदा बचावासाठी गुरुवारी मार्केटयार्ड बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे.
पुणे : खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. महापालिकेने पाण्याचा दैनंदिन वापर मर्यादित ठेवावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्राद्वारे केली आहे.
सूचना देण्यात आल्यानंतर घड्याळ सुरू झाले अन् जवळपास पाच मिनिटे मैदानावर शांततेत वाचन सुरू झाले.
नागपूर : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?”, असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले. पीएचडी करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत, तर काहींनी अजित पावारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी १३ डिसेंबर रोजी विधानसभेत बोलत असताना मला गोळी घातली जाऊ शकते, असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. सरकारने त्यांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील भुजबळ फार्मबाहेर आता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून शाळा, तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचबरोबर यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्या स्कूल बसवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी बुधवारी दिले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत कुमार बोलत होते. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
रिक्षामध्ये लहान विद्यार्थी जास्त बसविले जातात. शाळा प्रशासनाने आणि पालकांनी त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात स्कूल बस विद्यार्थी वाहतूक समितीचे काम सुलभपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी https://schoolbussafetypune.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात १० हजार २७० हजार स्कूल बस असून, पाच हजार ९२१ शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व शाळांनी त्यावर नोंदणी करावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, अशी माहिती भोर यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
नियमंभग करणाऱ्या वाहनांना १ कोटीचा दंड
शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ जानेवारी ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान दोन हजार २१४ स्कूल बस, तसेच एक हजार ४७८ इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये ५७१ स्कूल बस आणि ३७९ इतर वाहने दोषी आढळली. याचबरोबर ४७ वाहने ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल एक कोटी एक लाख दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई : क्रेडिटकार्डवर दंडाची भीती दाखवून ४६ वर्षीय व्यावसायिकाची सुमारे एक लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. याबाबत तात्काळ तक्रार केल्यानंतर दहिसर पोलिसांनी सर्व रक्कम परत मिळवून दिली. आरोपीने क्रेडिटकार्डच्या साह्याने ॲमेझॉनवरून वस्तू खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये वंशाचा दिवा म्हणजे मुलगा होत नसल्याने दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी देऊन जीव घेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर : राज्यातील पहिला आणि एकमेव हत्ती कॅम्प नकोसा झाल्याचे पुन्हा एकदा वनखात्याने दाखवून दिले आहे. दोन वर्षांपूर्वी या हत्ती कॅम्पमधील हत्ती परराज्यात पाठवण्याचा घाट खात्याने घातला होता. स्थानिकांच्या एकजुटीने हा डाव मोडीत निघाला. मात्र, आता पुन्हा एका व्याघ्रप्रकल्पात नव्याने होऊ घातलेल्या हत्ती कॅम्पमध्ये हत्ती हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर: कर्जत- जमखेडमध्ये एमआयडीसी होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर दबाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (शरद पवार गट) यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धिमध्यमांशी बोलताना दिली. रोहित पवार यांनी एमआयडीसीबाबत घातलेले जॅकेट याप्रसंगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यावर काही मजकूरही होता.
मुंबई : मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या बोरिवली विरार दरम्यान रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने मंजुरी दिली असून या प्रकल्पामुळे तेथील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसान भरपाई म्हणून गडचिरोलीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : दुकाने व आस्थानपनांवर मराठी भाषेत नामफलक लावण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे पालिका प्रशासनाने २८ नोव्हेंबरपासून मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापनांची झाडाझडती सुरु असून गेल्या पंधरा दिवसात पालिकेने ३६ हजारांहून अधिक दुकाने व आस्थापनांची तपासणी केली आहे.
ठाणे : मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा मुंबई-नाशीक महामार्ग पुढील पावसाळ्यापर्यत खड्डेमुक्त व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वेगाने कामे केली जात आहेत. या महामार्गावरील माजिवडा ते वडपे भागाच्या रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आला असून ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई : महापालिकेतील घनकचरा विभागाच्या उपायुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांना पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्याकडे शिक्षण विभाग सोपवण्यात आला आहे. उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे घनकचरा विभागाची सूत्रे देण्यात आली आहेत.
लोणावळा : निसर्गरम्य लोणावळ्यापासून १५ किलोमीटरवर असलेल्या टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट या दरम्यानच्या चार हजार फूट खोल दरीतून अलगद चालण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. यासह भुशी धरण ते लायन्स पॉईंट रस्ता रुंदीकरण, १२० मीटर लांब आणि सहा मीटर रुंद स्कायवॉक, लायन्स आणि टायगर पॉईंटला जोडणाऱ्या दरीवरील पूल, झिप लाईन, बंजी जम्पिंग, वॉल क्लायबिंगसारखे साहसी खेळ, एक हजार नागरिकांसाठी ॲम्फी थिएटर, फूड पार्क, वाहनतळ, प्रकाश आणि साउंड शो तसेच पर्यटकांसाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकास आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक प्रकल्पाला राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता अखेर मिळाली. यासाठी सुमारे ३३३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
बदलापूर रेल्वे स्थानकातील गर्दीचे विभाजन करणारा बहुप्रतिक्षित होम फलाट ऑक्टोबर अखेरीस प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी या फलाटाचे काम पूर्णत्वास गेलेले नाहीये.
पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात फर्निचर गोदामात गुरुवारी सकाळी आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
सरकारसोबत चर्चा निष्फळ, आजपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर
जुनी पेन्शन लागू करा, यामागणीसाठी १४ डिसेंबरपासून संपावरजाण्याचा इशारा देणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी बुधवारी सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने गुरूवारपासून संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.. जुनी पेन्शन योजना लागू करावी यामागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च २०२३ मध्ये संपावर गेले होते. सरकारने यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. मात्र सरकारने जुन्या पेन्शनबाबत निर्णय न घेतल्याने संघटनांच्या समन्वय समितीने १४ डिसेंबरपासून पुन्हा राज्यव्यापी संप करण्याची घोषणा केली होती.