Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 14 December 2023 : जुनी पेन्शन लागू करा, यामागणीसाठी आजपासून (१४ डिसेंबर) राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. याबद्दलचे पडसाद आज विधीमंडळ अधिवेशनात उमटण्याचे चिन्ह आहेत. तसेच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात, साखर-इथेनॉल आणि दूध प्रश्न उद्भवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल (१३ डिसेंबर) मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेलो असताना केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर हा प्रश्न घातला आहे. त्यासंदर्भात उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच काल संसदेत झालेल्या घुसखोरीमध्ये महाराष्ट्रातील एक तरुण सामील होता, याचेही पडसाद विधीमंडळात उमटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates | राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

19:04 (IST) 14 Dec 2023
नाशिक : संपाचा रुग्णालयांमधील कामकाजावर परिणाम, प्रशिक्षणार्थी परिचारिकांकडून आरोग्य सेवा

संपाविषयी माहिती नसल्याने बाहेरगावांहून आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.

सविस्तर वाचा…

18:48 (IST) 14 Dec 2023
दीड वर्षांपासून ७८८ सहाय्यक पोलिस निरिक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, निवृत्ती जवळ आल्याने स्वप्न भंगण्याची चिन्हे

विशेष म्हणजे मॅटच्या आदेशानंतर महिनाभराचा काळ लोटला तरी पदोन्नती देण्यात आलेली नाही.

सविस्तर वाचा…

18:14 (IST) 14 Dec 2023
गडचिरोली : पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार, मृतांमध्ये जांभूळखेडा स्फोटातील सूत्रधार

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील बोधीटोलाजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.

सविस्तर वाचा…

17:42 (IST) 14 Dec 2023
अंधेरीतील जलवाहिनी प्रकरण : नोटीस बजावल्यानंतरही कंत्राटदाराकडून प्रतिसाद नाही

मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराला १ कोटीहून अधिक रुपये दंड ठोठावला होता. याबाबत मेट्रो प्राधिकरणालाही पालिकेने नोटीस बजावली होती.

सविस्तर वाचा…

17:34 (IST) 14 Dec 2023
एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी

मुंबई : २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागता होता. ही बाब लक्षात घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि पहिली परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

17:24 (IST) 14 Dec 2023
जेएनपीए सेझच्या भूखंड लिलावांना उत्तम प्रतिसाद, १०४ एकर भूखंडांचे वाटप

११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली.

सविस्तर वाचा…

17:09 (IST) 14 Dec 2023
इंडियन ऑईलमध्ये दीड हजाराहून अधिक पदांसाठी भरती; सविस्तर माहितीसाठी…

वर्धा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खुशखबर आहे. या कंपनीत १ हजार ८२० शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. १६ डिसेंबरपासून नोंदणी सुरू होणार. अंतिम तारीख ५ जानेवारी २०२४ ही आहे.

सविस्तर वाचा…

17:04 (IST) 14 Dec 2023
ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा बैठकांचा सपाटा, प्रत्येक बूथवर मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दिला कार्यक्रम

ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेने याठिकाणी दुसरा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली.

सविस्तर वाचा…

16:47 (IST) 14 Dec 2023
मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेक प्रकरणी ऋषीकेश बेद्रेला जामीन

छत्रपती संभाजीनगर : ऋषीकेश बेद्रेला खंडपीठात जामीन. एक लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर व तीन महिने बीडसह जालना जिल्ह्यात प्रवेश न करण्याच्या अटीवर न्या. चपळगावकर यांनी जामीन मंजूर केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सकपाळ यांनी दिली.

वाचा सविस्तर…

16:47 (IST) 14 Dec 2023
चंद्रपूर : ओबीसींच्या १० पैकी ८ मागण्या मान्य, चिमूर येथे सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग उपोषण मागे

चंद्रपूर : राज्य सरकारने १० पैकी ८ मागण्या मान्य केल्याने चिमूर येथे सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे व राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले.

सविस्तर वाचा…

16:42 (IST) 14 Dec 2023
“शरद पवार हे कालही आणि आजही श्रद्धेय आहेत पण…”, शरद पवारांचा फोटो काढण्यावरून आनंद परांजपे यांचे स्पष्टीकरण

शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्याजागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

16:37 (IST) 14 Dec 2023
जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संपावर; जळगाव जिल्ह्यातील कार्यालये रिकामी

जळगाव : शासकीय सेवेत २००५ पासून नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रलंबित मागणीसाठी विविध संघटनांच्या नेतृत्वात कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यात सरकारी कामकाजावर परिणाम झाला आहे. कर्मचार्‍यांअभावी कार्यालये रिकामी दिसत आहेत.

राज्य शासनाकडून सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात गुरुवारपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळपासूनच कर्मचार्‍यांनी संपात सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. सकाळी दहापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी दाखल झाले. घोषणा देत सरकारी कर्मचार्‍यांनी रोष व्यक्त केला. एकच मिशन जुनी पेन्शन असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

16:32 (IST) 14 Dec 2023
कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे, भाजप आमदारांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

नाशिक : बागलाण तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा आणि निर्यात खुली करावी, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

वाचा सविस्तर…

16:29 (IST) 14 Dec 2023
धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.

सविस्तर वाचा…

16:19 (IST) 14 Dec 2023
कल्याणमधील ज्येष्ठ गायक गिरीश जोशी यांच्या दुचाकीची चोरी

सोमवारी सकाळी बाहेर जाण्यासाठी गायक जोशी दुचाकी जवळ आले. त्यावेळी त्यांना दुचाकी जागेवर नसल्याचे दिसले.

सविस्तर वाचा…

16:06 (IST) 14 Dec 2023
नयना महंत हत्याप्रकरणी ६२२ पानांचे दोषारोपपत्र, मोहरीचे रोप आणि बादलीतील पाणी महत्वाचा पुरावा

नयना महंत या तरुणीच्या हत्या प्रकरणात नायगाव पोलिसांनी वसई सत्र न्यायालयात ६२२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तिचा प्रियकर मनोहर शुक्ला आणि त्याची पत्नी पूर्णिमा या प्रकरणातील आरोपी आहेत. या दोषारोपपत्रात २५ जणांचे जबाब असून मृतदेहाजवळली मोहरीचे रोप आणि ज्या बादलीत तिला बुडवले ते पाणी महत्वाचे पुरावे आहेत.

वाचा सविस्तर…

15:55 (IST) 14 Dec 2023
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी केलेल्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार केलेला आहे. दि. ३१ मे २००५ पूर्वी जाहीरात दिलेल्या व अधिसूचित केलेल्या पदांना आणि नियुक्तांना निवृत्ती वेतन देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील २६ हजार अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर ८० वर्षांवरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्रीय योजनेप्रमाणे निवृत्ती वेतन अदा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सर सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती, याचा विचार करण्यासाठी सरकारने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून सदर समितीमध्ये सुधीर श्रीवास्तव आणि केपी बक्षी सदस्य आहेत. या समितीने आपला अहवाल मागच्याच आठवड्यात सादर केला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त आणि अतिरिक्त मुख्य सचिव, सेवा विभाग यांना या अहवालाचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करून आपले मत सरकारला कळवतील. आगामी अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेण्यात येईल. सरकारची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्म असून कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

15:38 (IST) 14 Dec 2023
मराठा आंदोलकांनी हाती काठी घेतली तर, मंत्री हाती तलवार घेणार का? शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

“मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून मराठा आंदोलकांकडून राज्यभरात शांततेत आंदोलन सुरू आहे. पण मंत्रिमंडळातील एक मंत्री जाणूनबुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलक गरीब आहेत, त्यांचे शिक्षण नाही, ते भावनेच्या भरात जर काही आक्रमक भूमिका मांडत असतील तर मंत्र्यांनी त्यावर सयंम बाळगला पाहीजे. ते हातात काठी घेतात, म्हणून मंत्र्यांनी हातात तलवार घेण्याची गरज नाही. या मंत्र्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांनी सर्व समाजामध्ये समन्वय राहिल, अशी भूमिका घेतली पाहीजे”, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

15:36 (IST) 14 Dec 2023
ठाण्यात आता निसर्ग वाचनालयांची उभारणी, ठाणे महापालिकेचा उपक्रम

ठाणे : महापालिका शाळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापाठोपाठ आता शहरातील उद्यानात वाचनालय सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नौपाड्यातील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान,वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान येथे प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

15:20 (IST) 14 Dec 2023
‘कसब्या’च्या निकालाचा भाजपला धसका?…लोकसभा पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ

पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही टीका केली.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 14 Dec 2023
जुन्या पेन्शनसाठी धुळ्यात मोर्चा

धुळे : जुनी पेन्शन लागू करण्यास राज्य शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करुन सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे धुळे येथे कल्याण भवनजवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जुनी पेन्शन लागू करण्यासह शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण थांबवावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, शिक्षकांची दोन लाख ८० हजार रिक्त पदे भरावीत,यापुढे कंत्राटीकरण करू नये, चतुर्थ श्रेणी किंवा चालकांची पदे पुनर्जीवित करावीत, रिक्त पदे भरावीत, आठव्या वेतन आयोगाची समिती जाहीर करावी, अशा प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

15:03 (IST) 14 Dec 2023
उरणच्या पाणथळीवर पक्षी, खाद्याच्या शोधात पक्ष्यांची भ्रमंती वाढली

समुद्र व खाडी किनाऱ्यावर पक्षी आपल्या खाद्याच्या शोधात हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात.

सविस्तर वाचा…

15:02 (IST) 14 Dec 2023
लसणाचे दर कडाडले, गृहिणींचे किचन बजेट गडबडले! गोंदियात किरकोळ बाजारात ३२० ते ३५० रुपये दर

गोंदिया : टोमॅटो, कांद्यानंतर आता लसणाचे भावही गगनाला भिडले आहे. दररोजच्या जेवणातील भाजीत किंचित पण महत्त्वाचा घटक असलेल्या लासणाला वर्षभर मागणी असतेच. मात्र, अलीकडे लसणाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने गृहिणींचे किचन बजेट गडबडले आहे.

सविस्तर वाचा..

14:51 (IST) 14 Dec 2023
पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील मृतांची संख्या ११; उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू

कंपनीतील स्फोटातील जखमींपैकी एका मुलीसह दोघींचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ११ झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:37 (IST) 14 Dec 2023
पुण्यात होणार चार विश्वविक्रम

युनेस्कोच्या निकषांनुसार जागतिक पुस्तकांची राजधानी बनण्याची क्षमता पुणे शहरात आहे.

सविस्तर वाचा…

14:26 (IST) 14 Dec 2023
‘सरकारी काम सहा महिने थांब’ म्हणणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना वकिलांचा दणका; जाणून घ्या नेमके प्रकरण

जिल्ह्यात सर्वत्र या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांसोबत असेच झाले पाहिजे, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 14 Dec 2023
शरद पवार आज अमित शहा यांची भेट घेणार..

शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्यात मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्न पेटला असताना शरद पवार नेमक्या कोणत्या मुद्द्यावर अमित शहा यांची भेट घेणार आहेत. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही भेट राजकीय आहे का? हेही गुलदस्त्यात आहे.

14:08 (IST) 14 Dec 2023
थंडीमुळे सांधे जास्त दुखताहेत? साध्या सोप्या उपायांनी मिळवा आराम

हिवाळ्यामध्ये सांधेदुखी कमी करण्यासाठी अनेक सोपे उपाय करता येतात.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 14 Dec 2023
कोकण भवन मधील कामकाज ठप्प: जुनी पेन्शन योजना मागणीसाठी कर्मचारी संपावर, अधिकारी सामूहिक रजेवर

एकट्या कोकण भवन मधील सुमारे एक हजाराच्या आसपास कर्मचारी संपावर तर या संपाला पाठिंबा म्हणून दोनशे पेक्षा जास्त अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 14 Dec 2023
आमदारांच्या सामूहिक छायाचित्रावरून नाराजी, वेळ ठरवूनही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री….

नागपूर: विधानसभेच्या सर्वच पक्षांतील आमदार छायाचित्र घेण्यासाठी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता विधानसभेच्या पायरीजवळ हजर झाले. परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री छायाचित्रणासाठी येथे पोहोचले नाही. त्यानंतर हा कार्यक्रम स्थगित झाल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली. परंतु दुपारी १२ वाजता अखेर छायाचित्र काढले गेले.

सविस्तर वाचा…

सरकारसोबत चर्चा निष्फळ, आजपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर

जुनी पेन्शन लागू करा, यामागणीसाठी १४ डिसेंबरपासून संपावरजाण्याचा इशारा देणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी बुधवारी सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने गुरूवारपासून संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला आहे.. जुनी पेन्शन योजना लागू करावी यामागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मार्च २०२३ मध्ये संपावर गेले होते. सरकारने यावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. मात्र सरकारने जुन्या पेन्शनबाबत निर्णय न घेतल्याने संघटनांच्या समन्वय समितीने १४ डिसेंबरपासून पुन्हा राज्यव्यापी संप करण्याची घोषणा केली होती.