Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Live Updates, 15 December 2023 : महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे चालू आहे. अधिवेशनाचा आजचा (१५ डिसेंबर) सातवा दिवस असून दिवशभरात कांदा निर्यात, साखर-इथेनॉल आणि दूध प्रश्नावर चर्चा होऊ शकते. तसेच मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. यावरही अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. संसदेत दोन तरुणांनी राडा केल्यानंतर सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधी पक्षांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे विरोधी पक्षांमधील १४ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्याचेही महाराष्ट्राच्या विधानसभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच संसदेतल्या घटनेनंतर विधीमंडळाची सुरक्षाव्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर आमदारांना दिल्या जाणाऱ्या पासेसची मर्यादा कमी करण्यात आली आहे.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : विधीमंडळ अधिवेशनासह राज्यभरातील बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर
पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून तिला तिच्या राहत्या घराजवळून आरोपीने पळवून नेऊन पुणे येथे ठेवले.
मिरज नगरपरिषेदपासून महापालिकेपर्यंत त्यांनी आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत असताना महापौरपदही भूषविले होते.
२०२३ साल मावळण्यापूर्वी प्राथमिक बाजारात अनेक नवीन कंपन्यांची ‘आयपीओ’ प्रस्तावांसह गजबजही वाढली आहे.
ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुर्ला यांचा एका पार्टीतला फोटो दाखवत भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. या आरोपांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या पार्टीत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, असे सगळे लोक दिसत आहेत. कोणाच्या तरी हळदीची की लग्नाची पार्टी होती. त्यामधील आमच्या पदाधिकाऱ्याचा फोटो दाखवून नितेश राणे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, राणे यांना माहिती नसावं की हा फोटो दाखवल्यामुळे ते किती जोरात तोंडघशी पडतील. त्या पार्टीत हे सगळे भाजपा नेते काय करत आहेत.
घणसोली येथील उड्डाणपुलाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या शहरातील नित्यानंद मार्गालगत गटाराचे काम करण्याचा ठेका पनवेल महापालिकेने ठेकेदाराला दिला आहे
पिंपरी: पवना धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यात कपात झाल्यामुळे आजपासून १५ मिनिटांनी पाणी कपात होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे.
नागपूर: विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन म्हटले की, सर्वात प्रथम डोळ्यापुढे येतात ते यानिमित्ताने निघणारे मोर्चे. बेरोजगारांना नोकरी हवी असते, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम व्हायचे असते व सेवेत असणाऱ्यांना पगावरवाढ हवी असते, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव हवा असतो. अशा कितीतरी विविध मागण्यांसाठी रोज अनेक मोर्चे विधानभवनावर धडकत असतात. शुक्रवारी शेतकरी पुत्रांनी काढलेल्या मोर्चाची मागणी मात्र आगळीवेगळी होती.
नाशिक: सिन्नर येथे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर शिवशाहीच्या चाकाखाली सापडून युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.
बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे.
मालेगाव: महानगरपालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी कोकण विभागाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांची पदस्थापना करण्यात आली आहे.
पुणे: एनडीए रस्त्यावर कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने मारहाण केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तिघांना अटक केली.
पुणे: हडपसर भागातील मांजरीत एका भंगारमालाच्या गोदामास शुक्रवारी दुपारी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
नाशिक: जलवाहिनी जोडणी, गळती थांबविणे, पाणी पुरवठा वितरण प्रणालीतील दुरुस्ती कामे आणि विशिष्ट वीज उपकेंद्रातील कामासाठी बंद राहणारा वीज पुरवठा या कारणास्तव शनिवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात. मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे.
सध्या बाजारात पुरवठा केला जाणारा अंमली पदार्थ परदेशातून येत नसून त्याची निर्मिती येथेच केली जात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी अजून तीन जणांना बदलापूर, ठाणे व खालापूर येथून अटक केली.
बुलढाणा: रात्रीच्या प्रवासात धोकादायकरित्या मोबाईल पाहत एसटी महामंडळाची बस चालवितानाचा चालकाचा ‘व्हिडीओ’ समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाला आहे. यामुळे एसटी विभागासह प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव: शेतीत गाळ टाकण्यासाठी मन्याड प्रकल्पातून गाळ वाहतुकीची परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार ३०० रुपये स्वीकारताना चाळीसगाव येथील पाटबंधारे विभागाचा लिपिक शुक्रवारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या सापळ्यात अडकला.
शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत.
धुळे – बनावट स्वाक्षरी आणि अंगठ्याचा वापर करून धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चिमठाणे (ता. शिंदखेडा) शाखेतून तत्कालीन शाखाधिकारी तथा रोखपाल यांनी ५३ लाख ९० हजार ५५८ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यांमधील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असा ३२ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात २० डिसेंबरपर्यंत आगरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
जवळील धारदार तलवारीसारखे शस्त्र घेऊन ते इक्बालच्या अंगावर मारण्यासाठी धाऊन आले. इक्बाल यांनी धावत जाऊन घरात आसरा घेतला.
बुलढाणा : मेहकर तालुक्यातील सोनाटी येथे शेतीच्या वादातून दोघा बापलेकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दोघा आरोपींना मेहकर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी दोघा आरोपींना कठोर शिक्षा सुनावली असून तीघांची पुराव्याभावी सुटका करण्याचे आदेश दिले आहे.
पुणे: मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालक तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली होती.
गप्पा संपल्या नंतर जेव्हा मारोती रिक्षा घेऊन जाण्यास आले त्यावेळी रिक्षा आढळून आलीच नाही.
बिद्री साखर कारखाना गेली काही वर्ष ऊसाला राज्यात सर्वाधिक दर देत आहे . सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी या कारखान्याची ओळख झाली आहे.
पुणे: थंडी सुरू झाल्यानंतर बाजारात हुरडा दाखल झाला आहे. खवय्यांकडून हुरड्याला चांगली मागणी आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात छत्रपती संभाजीनगर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हुरडा विक्रीस पाठविला आहे. थंडी सुरू झाल्यानंतर हुरड्याची आवक सुरू होते.
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून निवडणूक लढवावी. अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे, असे थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
पुणे: महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी निघालेल्या तरुणीला ऑनलाइन हाॅटेल बुकिंग करणे महागात पडले. सायबर चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.
“संसदेतील या हल्ल्यामागेही पंडित नेहरू…”, ठाकरे गटाचं मोदी-शाहांवर शरसंधान; म्हणे, “खासदार मुस्लीम असता तर…”
लोकसभेत बुधवारी दोन तरुणांनी घुसखोरी केली आणि दिल्लीसह आख्ख्या देशाला धक्का बसला. हे तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत असताना अवघ्या देशाच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, या तरुणांनी बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा अशा प्रश्नांवर घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर हा मुद्दा नागरिकांच्या समस्यांशी निगडित असल्याचं स्पष्ट होऊ लागलं. या पार्श्वभूमीवर आता या घुसखोरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटानं यासंदर्भात भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं आहे.
लोकसभेतील घुसखोरीनंतर संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नागरिकांना पासेस देण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. मात्र, यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या गोंधळात असभ्य वर्तनाचा शेरा मारत विरोधी पक्षाच्या तब्बल १४ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणावर सामना अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे.