Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 18 December 2023 : राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा आठवा दिवस आहे. आजपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. आजपासून महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कांदा निर्यात प्रश्न, इथेनॉल प्रश्न, अवकाळी पाऊस, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवर सध्या सभागृहात जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येतील. तर, दुसरीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाकडे गेल्याने हा मुद्दाही सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे. तसंच, राज्यात हवामानात सातत्याने घट होताना दिसतेय. मुंबईसह अनेक भागांत हुडहुडी जाणवत आहे. यांसह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

13:42 (IST) 18 Dec 2023
स्वस्तात डॉलर मिळतात म्हणून बायकोचे दागिने गहाण ठेवले… आणि हाती आली कागदाची पुडके

नवी मुंबई: अमेकरिन चलन असलेले डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून २ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार रविवारी नवी मुंबईतील घणसोली येथे घडला. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 18 Dec 2023
अमळनेरमधील मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलनाचा समावेश

संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 18 Dec 2023
‘महाराष्ट्र सेफ्टी’ पुरस्कारप्राप्त कंपनीतच कामगार असुरक्षित; निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

सर्वाधिक कालावधीसाठी दुर्घटनामुक्त विस्फोटक कंपनीचा पुरस्कार सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला मिळाला होता.

सविस्तर वाचा…

13:21 (IST) 18 Dec 2023
जे. जे. रुग्णालयामधील त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टर आजपासून सामुहिक सुट्टीवर; विभागप्रमुखांविरोधात डॉक्टर आक्रमक

मुंबई: जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागाच्या प्रमुखांकडून होत असलेला छळ आणि देण्यात येणाऱ्या धमक्यांविराेधात निवासी डॉक्टरांनी आजपासून सामुहिक सुट्टी आंदोलन सुरू केले आहे.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 18 Dec 2023
सरकारी कांदा खरेदी, कृषी माल साठवणुकीसाठी गोदाम उभारणीत शेतकरी संस्थांना बळ; राज्यस्तरीय संस्थांच्या मक्तेदारीला आळा

आजवर कांदा खरेदी करणाऱ्या विशिष्ट फेडरेशन व राज्यस्तरीय संस्थांची मक्तेदारी संपुष्टात येण्यास हातभार लागणार आहे.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 18 Dec 2023
सलीम कुत्ताप्रकरणी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटही आक्रमक; मंत्री भुसे म्हणाले, “हे तर देशद्रोह्यांचे उदात्तीकरण…”

“उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता… सलीम कुत्ता…” अशी नारेबाजी करत आमदारांनी परिसर दणाणून सोडला.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 18 Dec 2023
वर्ध्याची स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भावली; म्हणाले, “माझ्या स्ट्रॉबेरीपेक्षा उत्तम…”

समुद्रपुर तालुक्यातील पाथरी येथील पाटील कुटुंब पूर्णतः शेतीत रमणारे. नव्या पिढीनेही हा वारसा आता चालविला आहे.

सविस्तर वाचा…

12:26 (IST) 18 Dec 2023
प्रदूषण तपासणी केंद्रच चुकीच्या ठिकाणी; केंद्रांच्या जागेमुळे चुकीची आकडेवारी मिळत असल्याचा पालिकांचा दावा

बदलापूरः गेल्या काही दिवसात हवेचा दर्जा खालावत असल्याची ओरड होत असतानाच बदलापूर आणि उल्हासनगर यासारख्या शहरांचा ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खराब हवेच्या यादीत समावेश होतो आहे. मात्र शहरातील प्रदुषणापेक्षा केंद्राच्या आसपास असलेल्या परिस्थितीमुळे हवेचा निर्देशांक वाढत असल्याची ओरड होते आहे.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 18 Dec 2023
“महाराष्ट्र सरकार गुजरातच्या दावणीला बांधलंय”, रोहित पवार यांचा आरोप; म्हणाले…

सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 18 Dec 2023
एनआयएची अचलपुरात छापेमारी, युवकाची चौकशी; कारवाईबाबत कमालीची गुप्तता…

‘एनआयए’च्‍या पथकाने सोमवारी पहाटे ही कारवाई केली. यावेळी स्‍थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 18 Dec 2023
दोन वर्षांत नायर दंत रुग्णालयात पदवीच्या २५ जागा वाढणार

मुंबई: केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (इडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आरक्षणामुळे नियमित विद्यार्थ्यांकरीता जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ही बाब विचारात घेऊन नायर रुग्णालय दंत महाविद्यालय प्रशासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी २५ जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. मात्र हे आरक्षण नियमित जागांमधूनच देण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जागांवर परिणात होत आहे. नायर रुग्णालय दंत महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात. नायर दंत महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या ७५ जागांसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस लागते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र कोटा उपलब्ध करून देण्यासाठी नायर दंत महाविद्यालयाने जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

नायर दंत महाविद्यालयाची १०० जागांची क्षमता असून, सध्या ७५ जागा आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये २५ जागा वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालयातील २५ जागा वाढविण्यासाठी भारतीय दंत परिषदेकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास जागा वाढविण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी दिली.

12:03 (IST) 18 Dec 2023
“सेटलमेंट झाली नाही म्हणून…”, राज ठाकरेंचा धारावी मुद्द्यावरून मविआला टोला

मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो मुळात परस्पर अदाणींना का दिला इथपासून सुरुवात होते. अदाणींकडे असं काय आहे, ज्यात विमानतळ, कोळसा वगैरे तेच हाताळू शकतात. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला टेंडर्स मागवायला पाहिजे होतं. तिथं काय होणार आहे हे कळायला पाहिजे होतं. अदाणी ग्रुपची डिझाइन दाखवा असं म्हटलं होतं. महाविकास आघाडीला आज का जाग आली. सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? टाऊन प्लानिंग नावाची गोष्ट सांगावी लागते. एक भाग घ्यायचा आणि सांगायचं हा भाग अदाणींना द्यायचा असं नसतं. ८-१० महिन्यांनी महाविकास आघाडीला जाग आली. मोर्चाचा दबाव आणून सेटलमेंट करायची आहे – राज ठाकरे

11:56 (IST) 18 Dec 2023
“दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या”, आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा; म्हणाले, ‘‘गृहमंत्र्यांनी आता…’’

सलिम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 18 Dec 2023
“उडता महाराष्ट्र! सरकारचे ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण”, विरोधकांचा आरोप; विधानभवन परिसरात आंदोलन

सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी केला.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 18 Dec 2023
राज्यातील निम्मे जिनिंग उद्योग बंद, विदेशातून कमी मागणीसह कापूस उत्पादन घटल्याचा परिणाम

भारतासह जागतिक उत्पादन, वापर आणि व्यापाराचा अंदाज महिन्याच्या शेवटी येणार असला, तरी सध्या कापसाचा पुरवठा कमी आहे.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 18 Dec 2023
महाराष्ट्रात ‘आयुष्यमान भारत’चे नऊ लाख लाभार्थी; लाभार्थी राज्यांमध्ये महाराष्ट्र १२ व्या स्थानावर

मुंबई: आरोग्य सेवा नागरिकांच्या आवाक्यात यावी, तसेच त्यांच्यावर स्वस्तात उपचार व्हावेत यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून नावारुपाला आली असून या योजनेंतर्गत मागील चार वर्षांमध्ये तब्बल चार कोटी ९८ लाख २ हजार ९५९ नागरिकांनी लाभ घेतला आहे. सविस्तर वाचा…

11:24 (IST) 18 Dec 2023
“शिवसेनेमुळेच भाजपा आज दिल्लीच्या तख्तावर”, आमदार भास्कर जाधव यांचा दावा; म्हणाले…

शिवसैनिक नसता तर राज्यात भाजपाची अवस्था बिकट होती, अशी टीका शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांनी केली.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 18 Dec 2023

11:02 (IST) 18 Dec 2023
वाशीम : सरपंच, ग्रामसेवक संपावर, ग्रामपंचायती कुलूबपंद; कामकाज ठप्प!

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक व इतर कमर्चाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 18 Dec 2023
महानगरपालिकेने सुरू केलेली स्वच्छता मोहीम महाराष्ट्रभर राबविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ मुंबईकरांच्या उत्तम, निरोगी आरोग्यवर्धनासाठी उपयुक्त असून त्याचे दुरोगामी परिणाम नजीकच्या काळात पाहायला मिळतील. केवळ महानगरपालिकीचे कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासनापुरतीच स्वच्छतेची महिमा मर्यादित नसून येत्या काळात मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.

मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात ३ डिसेंबरपासून दर आठवड्यातून एक दिवस संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या ‘एन’, ‘एम पश्चिम’ आणि ‘एफ उत्तर’ आदी विभागात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिंदे यांनी सहभाग नोंदवत संबंधित भागातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक परिमंडळातील मनुष्यबळ स्वच्छतेसाठी एकाच विभागात एकत्र आणून सर्व रस्ते झाडूने स्वच्छ करणे, ब्रशिंग करणे, उच्च दाबाने पाणी फवारणी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. रस्ते स्वच्छतेकामी महानगरपालिका अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच राबवित आहे. केवळ रस्तेच नव्हे तर पदपथ, रस्त्यांलगतची गटारे, गल्ली बोळातील रस्ते, नाले आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे एकाच वेळी स्वच्छ केले जात आहेत. मानवी परिश्रमाला शक्य तितक्या तांत्रिक यंत्रांची जोड देण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून स्वच्छतेचे काम अधिक प्रभावी होईल. मुंबई महानगरपालिकेची सर्वच रुग्णालये अद्ययावत करण्याचे, सुपरस्पेशालिटी सुविधा पुरवण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहेत. अद्ययावतीकरणच नव्हे तर रुग्णालय स्वच्छतेवरही लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. रूग्णालयाच्या आजूबाजूचा परिसर, रूग्णालय इमारत स्वच्छ असली पाहिजे. काही डागडूजी करायची असेल तर तातडीने ती करावयास हवी. जानेवारी महिन्यापासून महानगरपालिकेच्या प्रत्येक रूग्णालयात ‘झिरो प्रिस्क्रीप्शन’ उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले असून रुग्णांसाठी बाहेरून औषध घ्यायची गरज पडणार नाही, असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

घाटकोपर पश्चिमेकडील अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दौऱ्याचा सुरुवात करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, आमदार कालिदास कोळंबकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे, उपआयुक्त हर्षद काळे, उपआयुक्त रमाकांत बिरादार, उपआयुक्त संजोग कबरे, उपआयुक्त संजय कुऱ्हाडे, ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, टी विभागाचे सहायक आयुक्त अजय पाटणे, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आदी विविध अधिकारी उपस्थित होते.

10:59 (IST) 18 Dec 2023
पोलिसांवर गोळीबार करुन पसार झालेला दरोडेखोर जेरबंद; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे

पुणे: पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारा दरोडेखोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखाेराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते.

सविस्तर वाचा…

10:45 (IST) 18 Dec 2023
नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ ट्रकची वाहनांना धडक; आठ जणांचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा…

10:44 (IST) 18 Dec 2023
मायक्रोस्कोप चोरीप्रकरणाचा तपास संथगतीने; भांडारपाल निलंबित पण चोर सापडेना

२२ पैकी चार नग आरोग्य संस्थांना वितरित केले होते तर १८ नग भांडार विभागात ठेवले होते.

सविस्तर वाचा…

10:26 (IST) 18 Dec 2023
महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झाला आहे, राऊतांची टीका

देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे. एका कर्तबगार नेत्याला त्यांच्या दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावं लागतंय, ही अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांना विस्मरण होतंय. दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झाला आहे. महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालं आहे – संजय राऊत</p>

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा