Nagpur Vidhan Sabha Winter Session 2023 Updates, 18 December 2023 : राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा आठवा दिवस आहे. आजपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. आजपासून महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कांदा निर्यात प्रश्न, इथेनॉल प्रश्न, अवकाळी पाऊस, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवर सध्या सभागृहात जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. याच मुद्द्यांवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येतील. तर, दुसरीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहाकडे गेल्याने हा मुद्दाही सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे. तसंच, राज्यात हवामानात सातत्याने घट होताना दिसतेय. मुंबईसह अनेक भागांत हुडहुडी जाणवत आहे. यांसह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
पुणे: पुस्तकांमुळे वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे.
धुळे : मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेली महानगर पालिका धुळेकरांकडून वाढीव मालमत्ता कर आकारणी करत असून तत्काळ हा कर रद्द करावा, या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
धुळेकरांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. रस्ते खड्डेमय झाले असून महापालिकेत वारंवार चकरा मारुनही नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. मनपाच्या बहुतांश शाळा बंद असताना भरमसाठ शैक्षणिक कर आकारला जात आहे. मनपाने वृक्ष लागवड केली नसताना वृक्ष कर आकारला जात आहे. मनपाच्या रुग्णालयात डॉक्टर आणि औषधांची वानवा आहे. तरीही महापालिका नागरिकांकडून आरोग्य कर घेते. शहरातील १० ते ४० वर्षे जुन्या बांधकामांनाही चार ते पाच पट कर आकारण्यात आला आहे. मुंबई, पुणे या शहरांपेक्षाही धुळे महापालिका अधिक कर घेत आहे. त्यामुळे अन्यायकारक वाढीव मालमत्ता कर त्वरीत रद्द करावा, अशी मागणी संविधान संरक्षण समितीने केली आहे.
सांगली : नगरपालिकेकडून होत असलेली शास्ती कराची आकारणी माफ करावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सोमवारी देयकांची होळी करण्यात आली. याचबरोबर नगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेला उपभोक्ता करही त्वरित मागे घेण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
गरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या संयुक्त बिलामध्ये शास्ती कर आकारणी आणि उपभोक्ता कर आकारणी करण्यात आली आहे. नगरपालिकेकडून अवाजवी कर वसुली करण्यात येत असून या तुलनेत शहरात नागरी सुविधा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य असून स्वच्छतेचा ठेका असलेल्या कंपनीवर कारवाई करावी, जंतूनाशक औषधांची फवारणी नित्याने करण्यात यावी, पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.
पिंपरी : पुनावळेत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था असून शाळा, महाविद्यालये झाली आहेत. लोकांचा प्रस्तावित कचरा भूमीला प्रचंड विरोध आहे. वाढलेली लोकवस्ती विचारात घेता पुनावळेत कचरा भूमी केली जाणार नसल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
पुणे: हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘कोई दिवाना कहता है कोई पागल समझता है’ अशा अनेक रचना लोकप्रिय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. कुमार विश्वास यांनी ‘कवी की कल्पना से’ या विषयावर संवाद साधला.
पुरोगामी लोकांनी या प्रकाराचा निषेध करायला हवा, असेही रुपराव वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पनवेल : सिडको महामंडळाने नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्रासाठी (नैना प्रकल्प) स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नेमले आहेत. मोहन निनावे यांच्यावर यापुढे प्रसारमाध्यमांना सिडको मंडळाच्या नैना प्रकल्पाची माहिती अधिकृतपणे मांडण्याच्या जबाबदारी असणार आहे.
नैना प्रकल्पाची अधिसूचना 2013 साली जाहीर झाला असला तरी अद्याप प्रकल्पग्रस्तांच्यावतीने अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जात आहे. शेतक-यांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर गावपातळीवर नैना प्रकल्पाची बाजू मांडण्यासाठी नैना प्राधिकरणाने दिवानजी पवार यांना नेमले आहे. 10 वर्षानंतरही नैना प्राधिकरणाने पहिल्या टप्यातील गावांमध्ये विकास केला नसून रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा न दिल्याने शेतकरी आंदोलनातून संपात व्यक्त करत आहेत. या दरम्यान सिडको मंडळाने शेतकरी व सिडको मंडळ यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी मोहन निनावे यांची जनसंपर्क अधिकारी पदावर नेमणूक केली आहे. निनावे यांना सिडको मंडळाचा जनसंपर्क विभाग अधिकारी पदाचा अनुभव असल्याने त्यांना ही जबाबदारी सोपविली आहे.
मुंबई: घरात घुसून मोबाइल चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलाच्या ताब्यातून पोलिसांनी काही मोबाइल हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुणे: पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्रात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी (२१ डिसेंबर) करण्यात येणार आहेत.
मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या सुशोभिकरण प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. पालकमंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच या कामाचे भूमिपपूजन करण्यात आले.
आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनेलने सर्व जागा जिंकून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभा घेऊनही काँग्रेसचा पराभव झाल्याची टीका करण्यात आली.
#नागपूर | राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे (निवृत्त) समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्या. शिंदे यांनी विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य… pic.twitter.com/D9IXPeXG5P
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2023
इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दिल्ली येथे जाणार आहे. बैठकीचा अजेंडा उद्या कळेल, असेही त्यांनी सांगितले.
डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना आणि कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा सरंचनेनुसार गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीची बैठक आज रामगिरी या निवासस्थानी पार पडली.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 18, 2023
या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल पिडीतांमुळे विस्थापित झालेल्या तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर… pic.twitter.com/J9Y58rKMOW
आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाॅम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.
नवी मुंबई: नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असून १०७ पदाधिकारी दोन माजी नगरसेवक, मनपातील एक माजी विरोधीपक्षनेता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
माझा शेतकरी जो मिर्ची पिकवतो ती ह्यांना महत्वाची नाही, दाऊदची मिर्ची महत्वाची आहे!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 18, 2023
बुलढाणा : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने आज, सोमवारी ( दि. १८) अर्धा दिवस सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडल्याने दैनंदिन कामकाज प्रभावित झाले.
आंदोलनात उपजिल्हाधिकारी राजेंद्रसिंह जाधव, सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, सदाशिव शेलार, तहसीलदार रुपेश खंडारे, नायब तहसीलदार विजय पाटील, सुनील आहेर, संजय बनगाळे, प्रकाश डब्बे, अमरसिंह पवार सहभागी झाले होते.
वर्धा: काँग्रेसच्या कोणत्याही उपक्रमापूर्वी किंवा नंतर पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाची माहिती देण्याची सूचना प्रदेश कार्यालयाकडून येते. तसे पत्रकच जाहीर होते. यास जिल्ह्यातील प्रमुखांनी संबोधित करावे, अशाही सूचना असतात.
मुंबई: नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ६८ व्या केंद्रीय रेल्वे सप्ताहामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० रेल्वे अधिकारी आणि ५० कर्मचाऱ्यांना केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित राईस मिल मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते.
मुंबई: म्हाडामधील १४०० कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे कवच लाभले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून जीवन विमा देण्यात आला आहे.
कला, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानाचे प्रयोग, खेळ अशा अंगभूत प्रतिभेला यानिमित्ताने बहर येतो.
मुंबई: केंद्र सरकारने फेरीवाल्यांना कर्ज देण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेचे उद्दीष्टय पूर्ण करताना मुंबई महानगरपालिका प्रशासनाची दमछाक होऊ लागली आहेत. मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी एक लाख फेरीवाल्यांचे उद्दीष्ट्य कसेबसे पूर्ण केले.
पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून शिवसैनिकांना नाहक त्रास देण्यासाठी ओढून ताणून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे बडगुजर यांनी म्हटले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा, गणेशनगर, राजूनगर, नवापाडा, गरीबाचापाडा या जुन्या वस्तीत नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. या वस्तीत कोणाचे निधन झाल्यास यापूर्वी पार्थिव कुंभारखाणपाडा भागातील पत्रे निवारा असलेल्या स्मशानभूमीत दहन केले जात होते. या स्मशानभूमीचा वापर करताना नागरिकांना अनेक अडथळे पार करावे लागते.
राष्ट्रीय हरित लवादाने तानसा वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीपासून १० किलोमीटर क्षेत्रात वीटभट्ट्या व्यवसायिक, खाणकाम दगड उत्खनन, कृषी युनिट्स तसेच प्रदूषणास कारणीभूत उद्योगांच्या स्थापनेला व घातक पदार्थांचे उत्पादनाला निर्बंध घातले आहेत. मात्र त्याच्या अमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाकडून दुर्लक्ष होत असून नवीन परवानग्या देण्याचा सपाटा सुरु आहे.
दाऊद इब्राहिमसंबंधित एका लग्नात सरकार पक्षातील एक मंत्री हजर राहिले होते. त्यांचे फोटोही समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले. या प्रकरणी संबंधित मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधन परिषदेत विरोधकांनी मागणी केली. २८९ अंतर्गत ही मागणी करण्यात आली होती. परंतु, २८९ ची नोटीस विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी फेटाळून लावली. दरम्यान, याप्रकरणी सभागृहात गोंधळ वाढल्याने विधान परिषदेचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.
नवी मुंबई: अमेकरिन चलन असलेले डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून २ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार रविवारी नवी मुंबईतील घणसोली येथे घडला.
Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा