Nagpur Hiwali Adhiveshan 2023 Updates, 19 December 2023: राज्याची उपराजधानी नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीने मराठा आरक्षणाबाबतचा दुसरा अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे आज यावर अधिवेशनात काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षांच्या ९२ खासदारांना निलंबित केल्यानंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे. यासंह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी
छगन भुजबळ हे ओबीसींचा आवाज असून त्यांना पद्धतशीरपणे टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची एकी दाखवण्याची ही वेळ आहे. - मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक प्रा. लक्ष्मण हाके
सोलापूर : कांद्याची दररोज होणारी कांद्याची उच्चांकी आवक घटली आणि दररोज लिलाव होऊनही कांद्याचा दर वाढण्याऐवजी घसरतच असल्याचे चित्र सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येते. त्यामुळे शेतक-यांनी परवड कायमच आहे.
काल सोमवारी ८८ हजार ८१३ क्विंटल कांदा दाखल झाला असता दर मात्र एक हजार ते १४०० रूपयांपर्यंतच मिळाला. तर मंगळवारी तुलनेने कमी म्हणजे ३८ हजार ८५८ क्विंटल कांदा दाखल झाला. परंतु दरात सुधारणा होण्याऐवजी त्यातील घसरण थांबत नसल्याचे पाहायला मिळाले. गेल्या पंधरा दिवसांत निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणावर दर कोसळले आहेत.
एमएमआरडीए वर्सोवा – विरार दरम्यान ४२.७५ किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचे काम हाती घेणार आहे. मच्छीमारांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडल्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष,ढोल ताशांचा निरंतर गजर, तुताऱ्या आणि झांजांचा आवाज, हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवप्रेमींच्या उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरियन ब्लॉगर तरुणी सोबत गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पिंपरी- चिंचवडमधील असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने त्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून वृध्द व्ययतीचे सोन्याचे दागिने लुटणार्या तरूणास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शंभर फुटी रस्त्यावर अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मंगळवारी दिली.
आरग येथील आण्णासो सिताराम गायकवाड या वृध्द व्यक्तीला पुढे पोलीस असल्याची बतावणी करीत गळ्यातील सोनसाखळी व अंगठी रूमालात बांधून ठेवण्याचा बहाणा करीत हातचलाखी करून लंपास केली होती. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज सकाळी विशेष पथकातील सागर लवटे यांना शंभर फुटी रस्त्यावर अबुतालीफ मुसा ईराणी (वय 28 रा. किर्लोस्करवाडी) हा संशयास्पद आढळला. त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे लुटीतील सोनसाखळी व अंगठी असा एक लाखाचा ऐवज मिळाला. त्याला अटक करून अधिक तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
लोणावळा: लोणावळ्यातील लायन्स पाॅइंट परिसरात बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असे साहित्य जप्त केले.
नाशिक : यशंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत सोहळा बुधवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. दीक्षांत सोहळ्यास उपस्थित राहणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विद्यापीठाकडून नाशिकरोड तसेच मध्यवर्ती बस स्थानक (सीबीएस) येथून बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
आजच्या आधुनिक काळात नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे भविष्यात आणखी काय परिस्थिती निर्माण होईल काही सांगता येत नाही.
राज्याची उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर करारानुसार भरवले जाते. येथे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन या भागातील प्रश्न सुटणे अपेक्षित आहे.
देशात एच. डी. देवेगौडा यांच्याकडे केवळ ८ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो, असे बच्चू कडू म्हणाले.
नवी मुंबई: शहरात ज्या ज्या ठिकाणी पाळीव श्वानांना फिरवले जाते अशा ठिकाणी मनपाने सुसज्ज ‘पेट कॉर्नर’ तयार केलेले असूनही याबाबत श्वानप्रेमी नागरिक जागरूक नसल्याचे दिसून येते.
नवी मुंबई: शिंदे गटात १०७ नाही केवळ ३/४ पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि त्यांनीही आर्थिक हितसंबंधातून हा प्रवेश केला आहे. असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बेलापूर अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यांनी विधानभवनावर शुक्रवारी मोर्चाही काढला.
मागण्या मान्य करण्यास महापालिका आयुक्तांनी असमर्थता दर्शविल्याने गेल्या गुरुवारपासून सुरू असलेला महापलिका कर्मचाऱ्यांचा संप सुटू शकला नाही.
उरण: जेएनपीए मध्ये २०१४ पासून देशातील बंदरावर आधारित पहिला सेझ प्रकल्प उभारला जात आहे. मागील दहा वर्षांपासून हा सेझ प्रस्तावित आहे. रोजगार निर्मिती हा मुख्य उद्देश ठेवून उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पात ६० हजार कोटींची गुंतवणूक करून त्यातून दीड लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
आजारी असतानाही काम करण्याची सक्ती करण्यात येत होती. महिलांना तर साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करण्याची सक्ती केल्या जात होती.
दोन वर्षांपूर्वी उमरखेड येथे क्षुल्लक कारणावरून ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
सरपंच, सचिव यांनी संगनमत करून अंदाजे २५ लाख ९० हजार ७४ रुपये संशयास्पद खर्च केले. झालेला खर्च रोकडबुकमध्ये नोंदविला नाही.
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका हद्दीतील गावठाण आणि झोपडपट्टी भागात कचरा गोळा करण्यासाठी सद्या:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या घंटागाडी पद्धतीस पुरेशा प्रमाणात यश मिळत नसल्याने येत्या काळात या भागातील कचरा वाहतुकीची यंत्रणा प्रभावी पद्धतीने राबवली जावी यासाठी महापालिका प्रशासनाने नवी रचना उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पांढरकवडा येथे भरधाव दुचाकी टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकल्याने एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
भारतीय नौदलाने नौदल नागरी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू केली असून १८ डिसेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहे.
मुंबई : अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आज मध्यरात्री १.१० पासून ते उद्या (बुधवारी) पहाटे ४.४० पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे.
पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रात ५१ शाळा रायगड जिल्हा परिषदेच्या असून महापालिका स्थापन झाल्यापासून या शाळांचा हस्तांतरणाचा प्रश्न प्रशासकीय कात्रीत अडकला होता. मात्र, आता तो लवकरच मार्गी लागणार आहे.
आ. प्रशांत ठाकूर यांनी याबाबत नागपूर अधिवेशनात ग्रामविकास मंत्र्यांकडे विचारणा केल्यानंतर याप्रश्नी रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महापालिका अधिकाऱ्यांबरोबर ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी बैठक घेऊन संबंधित शाळा विनामोबदला हस्तांतरण करण्याचे आदेश दिले. तसेच सध्या ५१ जि. प. च्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना महापालिकेत व जिल्हा परिषदेत सेवा समायोजित करण्याचा विकल्प दिला आहे.
सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या जीर्णावस्थेमधील शाळांच्या इमारतीमध्ये १२ हजार विद्यार्थी शिकतात. महापालिकेच्या शिक्षण सेवा या विद्यार्थ्यांना मिळत नाही. पालिका मालमत्ताधारकांकडून शिक्षण कर वसूल करते. पालकांना हजारो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्राथमिक शिक्षण द्यावे लागते. हाच प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठवड्यात नागपूर येथे झालेल्या या बैठकीत आ. ठाकूर, अपक्ष आ. महेश बालदी, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पालिकेचे उपायुक्त गणेश शेट्ये, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मागील सात वर्षांपासून पालिका क्षेत्रातील पालकवर्ग महापालिका कधी शिक्षण देणार याकडे लक्ष लावून आहेत. जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळांच्या इमारतींमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकतात. पालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. पालिका मालमत्ता करासोबत विशेष आणि महाराष्ट्र राज्याचा शिक्षण कर आकारते. मात्र याबदल्यात नागरिकांना स्वखर्चाने लाखो रुपये खर्च करून पाल्यांना शिकवावे लागते. सध्या पालिकेच्या १० शाळांमध्ये १२०० विद्यार्थ्यांना डीजीटल वर्गात मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळते.
महापालिकेने शिक्षण सेवा सिडको वसाहतींमध्ये सुरू केल्यास पालकांचे लाखो रुपये वाचणार आहेत. सध्या खासगी शाळांमधील इंग्रजी माध्यमातील बालवाडी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशशुल्क आणि विकासशुल्क म्हणून ३० ते ४० हजार रुपये आकारले जातात.
पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी यापूर्वीसुद्धा पालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा हस्तांतरण झाल्यास नव्या इमारती व मराठीसोबत इंग्रजी माध्यमांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ असे स्पष्ट केले. परंतु ज्या जागेवर जि. परिषदेच्या शाळांच्या इमारती आहेत त्या जागांची मालकी रायगड जिल्हा परिषदेकडे नसल्याने या शाळांचे हस्तांतरण प्रक्रिया अडकली होती. ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे शाळेंच्या हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळेल अशी माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.
तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन महापालिकेच्या शाळेत झाल्यास त्यांना यापूर्वीच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात असावे की पनवेल पालिका यांच्याकडे सेवा समायोजन करावे असा विकल्प निवडावा लागणार आहे.
५१ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२ हजार विद्यार्थी
रायगड जिल्ह्यात पाच लाख मुले पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतात. त्यापैकी पनवेल तालुक्यामध्ये २ लाख ४ हजार मुले पहिली ते बारावीपर्यंत शिकतात. यापैकी पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गांमध्ये २२ हजार मुले शिकतात. तसेच पनवेल पालिका क्षेत्रातील ५१ जि.प.च्या शाळांमध्ये १२ हजारांहून अधिक मुले शिकतात
याप्रकरणी एकूण ५ वेळा पत्रव्यवहार केला होता तरी कारवाई केलेली नाही, असे या पत्रात म्हटले आहे.
उरण: नवी मुंबई विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांतील भूमिपुत्रांमध्ये संघर्षाचे वातावरण असताना नेरुळ-उरण या बहुचर्चित रेल्वे मार्गावरील स्थानकांचा नामविस्तार करत या भागातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने सिडको प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कचराभूमीवर प्रस्तावीत असलेल्या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहराच्या संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.
ठाणे: ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या भागांमधील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने आखलेल्या पाणी वितरण व्यवस्था सुधारण प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आसमानी संकटावर सभागृहात चर्चा झाली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेत नागपूरच्या विधानभवनात घुसणार असल्याची घोषणा केली आहे.