Nagpur Hiwali Adhiveshan 2023 Updates, 19 December 2023: राज्याची उपराजधानी नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीने मराठा आरक्षणाबाबतचा दुसरा अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे आज यावर अधिवेशनात काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षांच्या ९२ खासदारांना निलंबित केल्यानंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे. यासंह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: हिवाळी अधिवेशनासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी
जनतेची कामे जलद गतीने व्हावी म्हणून नागपुरातील शासकीय निवासस्थान राजगड येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली असून ‘शून्य भंगार’ उपक्रमास गती मिळाली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती आमदार अभिजीत वंजारी यांच्यावर संतापल्या आहेत. अभिजीत वंजारी तुम्ही कशाबद्दल तावातावाने बोलताय? तुम्ही आधी खाली बसा. तुमचं सगळं बोलणं पटलावरून काढून टाकणार आहे. तुम्ही इथे काय मारामारी करायला आला आहात का? असा सवाल गोऱ्हे यांनी विचारला.
पालघर जिल्ह्यातील अनेक कामांच्या दर्जामुळे वादीत असेणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला काळया यादीत टाकत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत घोषणा केली. या ठेकेदाराविरुद्ध उच्चस्तरीय (एसआयटी) चौकशी करण्याचा प्रस्ताव त्यांनी विधिमंडळात मांडला असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांमार्फत होणाऱ्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अपूर्ण, निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांना यादी टाकण्यात यावे यासंदर्भात कुडूस नाका (वाडा) येथे आंदोलन सुरू असतानाच विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी संदर्भात प्रश्न उपस्थित केला. भिवंडी- वाडा रस्त्यावर कमी दरात काम घेऊन निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल माहिती देत अनेक अपघाती मृत्यूला हा रस्ता कारणीभूत असल्याचे त्यांनी विधिमंडळात मांडले. राजकीय वरदहस्थामुळे या कंपनीवर आजवर कारवाई झाली नसल्याचे सांगत या ठेकेदाराला काळया यादी टाकून उच्चस्तरीय चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती.
पिंपरी: पोलिसांनी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला असून शाळेत जाऊन सायबर गुन्हेगारी, समाजमाध्यम, व्यसनाधिनता, महिला सन्मान अशा विविध विषयांवर धडे दिले जात आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पुणे: मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलतीसाठी दोन लाख मिळकतधारकांनी अर्ज न केल्याने या मिळकतधारकांना वाढीव देयके पाठविण्यात येणार आहेत. त्यातून ५० कोटींचे उत्पन्न मिळेल, असा कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा अंदाज आहे.
७८ खासदारांच्या निलंबनासंदर्भात पटोले म्हणाले,‘भाजपला लोकशाही मान्य नाही.’
मी मंत्र स्वीकारणारा माणूस नाही, हा पारिवारिक संवाद होता, असे मिटकरी म्हणाले.
ठाणे: स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजनेतील दैनंदिन देखभाल, दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला पाणी पुरवठा होणार नसून यामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.
मुंबई : व्हिडीओकॉन- आयसीआयसीआय बँक कर्जघोटाळ्याप्रकरणी आपल्यावरील फौजदारी कारवाईसाठी बँकेच्या संचालक मंडळाने दिलेली मंजुरी प्रक्रियेनुसार नाही, असा दावा बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी केला आहे. तसेच, मंजुरीला याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
फौजदारी कारवाईसाठी मंजुरी देण्यासाठी राबवण्यात आलेली प्रक्रिया चुकीची होती. त्यामुळे, सीबीआयने चुकीच्या मंजुरीच्या आधारे आपल्यावर कारवाई केल्याचा दावाही कोचर यांनी याचिकेत केला आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. त्या वेळी, या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी सीबीआयने वेळ देण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य करून याचिकेची सुनावणी ५ जानेवारी रोजी ठेवली आहे.
आयसीआयसीआय संचालक मंडळाने २२ एप्रिल रोजी कोचर यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी मंजुरी देण्याचा ठराव संमत केला. संचालक मंडळाने दिलेल्या परवानगीची माहिती सीबीआयने जूनमध्ये विशेष न्यायालयाला दिली होती.
मुलगी रात्री २ वाजताच्या सुमारास घराच्या मागील दरवाजातून बेपत्ता झाली.
वासाच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे आढळून आल्यावर सेन्सर्स तत्काळ हाऊसकीपिंग कर्मचार्यांना संदेश देईल.
मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीस्थित सिम्पी भारद्वाज या महिलेला रविवारी अटक केली. भारद्वाज यांचे मृत पती अजय भारद्वाज यांनी भावाच्या साथीने सुमारे सहा हजार ६०६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, विशेष न्यायालायाने सिम्पी भारद्वाज यांना २६ डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
आरोपींनी कूट चलन बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. याप्रकरणी देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे १५ गुन्हे दाखल असून त्यातील तीन गुन्ह्यांमध्ये सिम्पी भारद्वाज आरोपी आहे. सिम्पी या मे. वेरिब्लेटेक प्रा. लि., सिंगापूरमधील संचालकांपैकी एक होत्या. त्यांच्यासह इतर आरोपींनी बिटकॉइनवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी, एका संकेतस्थळाचाही वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, ईडी गैरव्यवहारातील रकमेचा माग काढत आहे. याप्रकरणी, आरोपी महिलेला अटकेनंतर मुंबईतील विशेष ईडी न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
नाशिक: शहरात तीन ते चार वर्षांपासून बिबट्यांचा मुक्त संचार होत असून यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पिंपरी: शहरातून वाहणाऱ्या पवना नदी प्रदूषणमुक्तीसाठी जलदिंडी प्रतिष्ठानातर्फे बुधवारपासून पवनामाई जलदिंडी काढली जाणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानापासून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दिंडीचे प्रस्थान होईल.
संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच ओबीसी विभागाच्या मंत्र्यांना आता योजनांच्या अंतिम मंजुरीसाठी सचिवांच्या दारात उभे राहावे लागणार असल्याचे चर्चा रंगली आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश असले, तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे पंचनामे रखडले आहेत.
मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला. वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारी मध्यम श्रेणीत होती.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि मुंबई विभागातील तिकीट तपासनीसांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला.
अजित पवार गटाच्या दांडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची प्रचंड लाट पसरली आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाला आहे.
मोठी उलाढाल असणारा हा व्यवसाय कोरोना काळात चांगलाच चर्चेत होता.
सर्व मंत्री व आमदारांनी रेशीमबागेत स्मृती मंदिर परिसरात येऊन आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दिवसाला साधारणपणे ७५० ते ८०० मॅट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोयदापाडा येथील कचराभूमीवर नेऊन टाकला जातो.
बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षस्थापना दिनानिमित्त पक्षनिधी उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाने आठ महिन्यापूर्वी शिळफाटा रस्त्यावरील गावांमध्ये जाणारे ४० हून अधिक पोहच रस्ते रस्ता रोधक उभे करून बंद केले आहेत.
विविध विरोधी पक्षांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. एकाच दिवशी इतक्या खासदारांना निलंबित केल्याने हा आकडा आता ९२ वर पोहोचला आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी
“आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाचे दर कोसळले असतील तर बोनसच्या रुपात शेतकऱ्यांना मदत करा. आम्ही पेरणी नाही केली तर तुम्ही धतुरा खाणार का? तुम्ही शेतकऱ्यांच्या भरवशावर आहात. त्यामुळे या सरकारला जागं करण्यासाठी, यांच्या बुडाखाली आग लावण्यासाठी आम्ही हजारो शेतकरी नागपूरच्या विधानभवनात घुसणार आहोत.” -शेतकरी नेते रविकांत तुपकर
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेत नागपूरच्या विधानभवनात घुसणार असल्याची घोषणा केली आहे.