Nagpur Vidhan Sabha Session 2023 Updates, 08 December 2023 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (७ डिसेंबर) नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती. आज त्याचे पडसाद विधीमंडळ सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे नेते यावर आपली मते व्यक्त करत आहेत.

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates |नगरमधील कुटुंबाचे भोतमांगे करू, अशी धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, छगन भुजबळांची मागणी

18:02 (IST) 8 Dec 2023
पिंपरी-चिंचवडमधील आगीच्या दुर्घटनेची चौकशी करा - सुप्रिया सुळे

"पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागून यामध्ये मोठी जीवितहानी झाली. या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मयत व्यक्तींच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हे गोदाम अनधिकृत असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे", अशी प्रतिक्रिया एक्स या साईटवर मांडली आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1733094821752078443

17:08 (IST) 8 Dec 2023
बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

बुलढाणा: रखडलेल्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे आज ‘शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी वकाना (ता संग्रामपूर) येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवर चढल्याने प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली.

सविस्तर वाचा...

16:26 (IST) 8 Dec 2023
काँग्रेसचा मोर्चा आक्रमक, नाना पटोलेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. या मोर्चा आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यावेळी रस्त्यावर उतरलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

15:53 (IST) 8 Dec 2023
खेरवाडी येथे मोटरगाडीच्या धडकेत अंध व्यक्तीचा मृत्यू

मुंबईः वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात मोटरगाडीने दिलेल्या धडकेत ४६ वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला. मृत व्यक्ती अंध असून रस्ता ओलांडत असताना अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 8 Dec 2023
बोईसर : प्रदूषणकारी आरे ड्रग्स कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तारापुर औद्योगिक क्षेत्रातील आरे ड्रग्स या कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा...

15:37 (IST) 8 Dec 2023
नामांकित कंपन्यांच्या नावाने खाद्य तेलात भेसळ करणारी टोळी उध्वस्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

नवी मुंबई: कृषी उप्तन्न बाजार समिती परिसरात  एका गोडाऊन मध्ये नामांकित खाद्य तेलात भेसळ करून विकणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने उध्वस्त केले. सदर ठिकाणी छापा टाकून तब्बल एक कोटी ७ लाख ५० हजार १०७ रुपयांचे भेसळयुक्त खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ११ पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

वाचा सविस्तर...

15:22 (IST) 8 Dec 2023
पालघर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध समित्या निष्क्रिय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला बोगस डॉक्टरचा शोध

जिल्ह्यात बोगस डॉक्टर नसल्याचे समितीच्या सदस्यांकडून बैठकीदरम्यान युक्तिवाद करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 8 Dec 2023
प्रतिकात्मक प्रेतयात्रा काँग्रेस कार्यालयात नेण्याचा भाजयुमोचा प्रयत्न, सावरकरांविषयी प्रियांक खर्गे यांच्या विधानाचा निषेध

नाशिक - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्याबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शुक्रवारी नाशिक शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने प्रियांक खर्गे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून ती शहरातील काँग्रेस कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही अंत्ययात्रा मध्येच रोखल्याने काही काळ गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी खर्गे यांचे छायाचित्र असणारे फलक जाळून घोषणाबाजी केली.

कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान केल्याचे भाजपचे म्हणणे आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत शहर भाजपचे अध्यक्ष प्रशांत जाधव, भाजयुमोचे सागर शेलार, उपाध्यक्ष ॲड. मिनल वाघ-भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी कार्यकर्ते रेडक्रॉस सिग्नल परिसरात जमले. या चौकातून हाकेच्या अंतरावर काँग्रेसचे शहर व ग्रामीणचे कार्यालय आहे. प्रियांक खर्गे यांचे छायाचित्र असणारे फलक व प्रतिकात्मक प्रेतयात्रा घेऊन त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नंतर आंदोलकांनी महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखल्याने झटापट झाली. संबंधितांच्या हातातील प्रतिकात्मक तिरडी पोलिसांनी काढून घेतली. भाजप कार्यकर्त्यांनी खर्गे यांचे फलक जाळले. यावेळी सागर शेलार यांनी सावरकरांविषयी सतत गरळ ओकणाऱ्या कॉंग्रेससोबत असलेल्या उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आता भूमिका स्पष्ट करावी, कॉंग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांविषयी निषेधार्ह बोलणे बंद करावे, असा इशारा दिला. नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, सरचिटणीस नाना शिलेदार, वसंत उशीर, प्रदेश महामंत्री योगेश मैंद आदी उपस्थित होते.

15:22 (IST) 8 Dec 2023
संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले, वाचला अडचणींचा पाढा

रायगड प्राधिकरणाला निधी मिळत नाही, मनुष्यबळ मिळत नसल्याचे सांगत त्यांनी अडचणींचा पाढाच वाचला.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 8 Dec 2023
प्रियांक खरगेंच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन; वादग्रस्त वक्तव्याचे बुलढाण्यात पडसाद

बुलढाणा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी वि. दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे जिल्ह्यात पडसाद उमटले. भाजपतार्फे बुलढाण्यात प्रियांक खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुतळ्याला चपलांनी बदडण्यात आले.

14:43 (IST) 8 Dec 2023
नक्षलवादी ते तेलंगणा सरकारमध्ये मंत्री; असा आहे सीताक्काचा संघर्षमय प्रवास…

गडचिरोली : वयाच्या १५ व्या वर्षी नक्षल चळवळीत दाखल होऊन क्रांतीची स्वप्ने पाहणारी तरुणी. त्यांनतर मुख्य प्रवाहात सामील होत वकील, आमदार आणि आता तेलंगणा सरकारमध्ये मंत्री असा प्रवास करणाऱ्या डॉ. दानसारी अनसुया उर्फ सीताक्का हे नाव सध्या चर्चेत आहे.

सविस्तर वाचा...

14:21 (IST) 8 Dec 2023
देशद्रोह्याच्या बाजूला बसणार नाही, शिवसेनेची आक्रमक भूमिका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याबाबत घेतलेली भूमिका आम्हाला मान्य असून नवाब मलिकांच्या मांडिला मांडी लावून आम्ही बसणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी मांडली आहे. देशद्रोह्याला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका उघड करायला हवी, असेही ते म्हणाले.

14:05 (IST) 8 Dec 2023
वसई : खासगी शिकवणीचालकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग

आरोपी जयदीप मकवाना याने पीडित मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी कुणाकडे वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली.

सविस्तर वाचा...

14:05 (IST) 8 Dec 2023
पुणे : शंभर वर्षांचा लक्ष्मी रस्ता येत्या सोमवारी फक्त पादचाऱ्यांसाठी!

महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन आयोजित केला जात आहे.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 8 Dec 2023
वैतरणा व शिरगाव खाडीत बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल विभागाची कारवाई; तीन सक्शन बोटीसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त

वसई: वैतरणा व शिरगाव खाडीत होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल विभागाने बुधवारी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन सक्शन बोटी व २० ब्रास वाळू असा सुमारे १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 8 Dec 2023
अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २४ घरफोड्या केल्याचं निष्पन्न

मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

सविस्तर वाचा...

13:38 (IST) 8 Dec 2023
बंदी असतानाही नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री, अकोल्यात महिलेचा पाय…

अकोला : नॉयलॉन मांजाचा जीवघेणा फास आत्तापासून आवळला जात आहे. नॉयलॉन मांजावर बंदी असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास त्याची विक्री केली जाते. शहरात एका महिलेचा पाय नॉयलॉन मांजामुळे कापला गेला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. प्रशासन लक्ष देऊन नॉयलॉन मांजाची विक्री थांबवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा...

13:37 (IST) 8 Dec 2023
पंधरा दिवसात दोनदा पक्षप्रवेश

मुंबई: भायखळ्यातील एका सामान्य कार्यकर्त्याने पंधरा दिवसात दोनदा पक्षप्रवेश करण्याचा विक्रम केला आहे. भायखळा विभागातील पदाधिकारी संतोष कदम आणि प्राची कदम यांनी अवघ्या पंधरा दिवसात शिवसेनेच्या शिंदे गटातून ठाकरे गटात आणि मग परत शिंदे गटात असा पक्ष प्रवेश केला.

सविस्तर वाचा...

13:22 (IST) 8 Dec 2023
सोलापुरात कांदा लिलाव न झाल्याने शेतकरी रस्त्यावर

व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला. कांदा लिलाव अचानकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

सविस्तर वाचा...

13:09 (IST) 8 Dec 2023
खून केला पोराने, तुरुंगात गेले आई-बाप; १४ वर्षाच्या मुलाने केलेल्या हत्येचे प्रताप

चांदनी साह या ८ वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या करणार्‍या १४ वर्षीय मुलाचे आई-बापही आता तुरुंगात गेले आहे.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 8 Dec 2023
मंत्री अब्दुल सत्तार यांनी सैनिकांच्या जमिनी हडप केल्या; काँग्रेस आमदाराचा आरोप

राज्याचे मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी ९० लोकांच्या जमिनी हडप केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यात काही जमिनी सैनिकांच्या आहेत, असेही ते म्हणाले. तसेच हे अब्बा-डब्बा-जब्बाचे सरकार असल्यामुळे कारवाई होत नाही, असेही ते म्हणाले.

13:02 (IST) 8 Dec 2023
मुंबईत १२ दिवसांत ३ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई: मुंबईत गुटखा, पान मसाला व सुगंधीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपासून या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात माेहीम हाती घेतली आहे.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 8 Dec 2023
जेजुरीत कंत्राटी कर्मचाऱ्याकडून स्थानिक राजकीय नेत्यांचा छळ… जाणून घ्या काय आहे प्रकरण

सर्वपक्षीय नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्याकडे तक्रार केली.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 8 Dec 2023
पुणे : गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन

बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, प्रामुख्याने मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय ७६) यांचे शुक्रवारी निधन झाले.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 8 Dec 2023
अमरावती : उत्पादन घट तरीही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अमरावती : यंदा खरीप हंगामात अनियमित पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले, तरी बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनला ५ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळाला, त्यात आता घट आली असून सध्या ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये दर मिळत आहेत.

सविस्तर वाचा...

12:35 (IST) 8 Dec 2023
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर अंधारात; पहाटेच्या वेळेत रेल्वे स्थानक भागात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय

डोंबिवली: मागील दोन दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील पथदिवे बंद राहत असल्याने प्रवाशांना अंधारातून रेल्वे स्थानकाकडे जावे लागते. पादचाऱ्यांना मोबाईल विजेरीचा वापर करून या भागातून येजा करावी लागते.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 8 Dec 2023
नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडल्याने पिंपळगाव बसवंत येथे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले.

सविस्तर वाचा...

12:21 (IST) 8 Dec 2023
'मराठा आंदोलकांवर गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत' - फडणवीस

आंतरवली सराटी येथील आंदोलनात पोलिस बळाचा वाजवी पद्धतीने वापर केल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. या लाठीमारात ५० आंदोलक आणि ७९ पोलिस जखमी झाले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल. तसेच सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.

12:15 (IST) 8 Dec 2023
पनवेल महापालिकेची पदभरती परीक्षा आजपासून, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 8 Dec 2023
नवाब मलिकनंतर प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या रडारवर! विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचे फडणवीसांना पत्र

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते लक्ष्मण दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे कुख्यात डॉन दाउदशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र लिहीत जाब विचारला.

सविस्तर वाचा...

Daily inspection of the food stalls in the Legislature area by the Food and Drug Department during the session

अधिवेशन काळात विधी मंडळ परिसरातील फूड स्टॉलची रोज तपासणी; धर्मराव बाबा आत्राम असे का म्हणाले...

 

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (७ डिसेंबर) नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती. आज त्याचे पडसाद विधीमंडळ सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.

Story img Loader