Nagpur Vidhan Sabha Session 2023 Updates, 08 December 2023 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (७ डिसेंबर) नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती. आज त्याचे पडसाद विधीमंडळ सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे नेते यावर आपली मते व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Live Updates |नगरमधील कुटुंबाचे भोतमांगे करू, अशी धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, छगन भुजबळांची मागणी

12:06 (IST) 8 Dec 2023
पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन परीक्षेला सुरूवात

पनवेल महापालिकेमधील ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांसाठी राज्यभरात एकाच वेळी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून परिक्षेला सुरूवात झाली.

सविस्तर वाचा…

12:03 (IST) 8 Dec 2023
मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार बचावात्मक

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला होता. हा लाठीमार बचावात्मक होता, असे लेखी उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे.

11:59 (IST) 8 Dec 2023
ठाणे ग्रामीणचा मैला व्यवस्थापन प्रकल्प रखडला; प्रकल्पाचे काम देण्यात आलेली संस्थांच डबघाईला

ठाणे: ग्रामीण भागातील चर पद्धतीने मैला व्यवस्थापन करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने आठ ते नऊ महिन्यांपूर्वी घेतला होता. या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील १४५ गावांचा समावेश करण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 8 Dec 2023
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल प्रियांक खर्गे यांनी केलेल्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी केले आहे.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 8 Dec 2023
विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनच आंदोलन, काय आहे कारण जाणून घ्या…

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा संताप व्यक्त करत हे आंदोलन झाले.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 8 Dec 2023
‘हात नका लावू कानाला, भाव द्या धानाला’, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक

नागपूर: ‘हात नका लावू कानाला, भाव द्या धानाला’ आणि इतर नारे देत विरोधकांनी सलग दुसऱ्याही दिवशी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी आंदोलकांनी गळ्यात कापसाच्या माळ आणि तूर आणि धानाचे रोप सोबत आणले होते.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 8 Dec 2023
नवाब मलिक पुन्हा विधान भवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात, अजित पवार म्हणतात…

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसल्याने सत्ताधारी पक्षातील भाजपा आणि शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी नवाब मालिकबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आजही नवाब मलिक अजित पवार गटाकडे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बसले.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 8 Dec 2023
वाढीव घरपट्टीविरोधात धुळ्यात अजित पवार गटाचा सत्ताधारी भाजपला दणका, महापालिकेवर मोर्चा

धुळे : वाढीव घरपट्टी रद्द करुन दिलेल्या नोटीस मागे घ्याव्यात, या मागणीसाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महापालिकेवर मोर्चा काढला. विशेष म्हणजे, राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या अजित पवार गटाने धुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपची यानिमित्ताने कोंडी केल्याचे मानले जात आहे.

11:41 (IST) 8 Dec 2023
नाशिक : ध्वजदिन निधी संकलनात ऑनलाईनचा पर्याय शक्य, सैनिकांप्रती योगदान देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात ऑनलाईन पेमेंट व युपीआयसारख्या आधुनिक सुविधांचा पर्याय उपलब्ध झाल्यास निधी संकलनात मोलाची भर पडेल. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

11:41 (IST) 8 Dec 2023
नवाब मलिक दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी बाकावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे पहिल्याच दिवशी जोरदार राजकारण तापले. मात्र त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसलेले दिसले, अशी बातमी टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिली असून त्याचा फोटोही त्यांनी सादर केला आहे.

11:38 (IST) 8 Dec 2023
फुकट्या प्रवाशांवर रेल्वेचा दंडुका! महिनाभरात अडीच कोटींची वसुली

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात तब्बल २८ हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 8 Dec 2023
मुंबईः महिला पोलिसाला चावणाऱ्या आरोपीला अटक

मुंबईः उच्च न्यायालयात बंदोबस्ताला तैनात असणाऱ्या महिला पोलिसाच्या हाताचा महिला आरोपीने चावा घेतल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 8 Dec 2023
‘इझी पे’ कंपनीवर कर्मचाऱ्यांनीच मारला करोडोंचा इझी डल्ला!

इझी पे कंपनीचे येरवड्यात कार्यालय आहे. कंपनी देशभरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 8 Dec 2023
आफ्रिकेतील मालावी आंबा पुण्याच्या बाजारात

घाऊक बाजारात मालावी आंब्यांच्या एका पेटीला प्रतवारीनुसार दोन हजार ते २७०० रुपये दर मिळाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 8 Dec 2023
धार्मिक स्थळी जायचंय? एसटीकडून शेगाव, अष्टविनायकसह अनेक ठिकाणी सुविधा

शिवाजीनगर स्थानकातून आता शेगावसाठी शयनयान गाडी सुरू करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 8 Dec 2023
पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार ३५१ कुणबी नोंदी; ‘असे’ मिळविता येणार प्रमाणपत्र

महसूल अधिकाऱ्यांकडे कुणबी दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 8 Dec 2023
गोंडवाना विद्यापीठात ‘पेट पास’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळेना!

विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे मार्गदर्शक मिळत नसल्याने आचार्य पदवी प्रवेश प्रक्रियेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 8 Dec 2023
महाराष्ट्रातील तिसरे “मधाचे गाव” घोलवड

घोलवड येथे बुधवार ६ डिसेंबर रोजी आयोजित मध उत्पादन जनजागृती मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 8 Dec 2023
टंचाईमुक्तीसाठी पाण्याची देवाणघेवाण; मोरबेचे पाणी कळंबोली, कामोठेला तर हेटवणेचे पाणी नवी मुंबईला देण्याचे नियोजन

पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना शहराच्या काही भागांत जाणवणाऱ्या पाणी तुटवड्याबाबत पालिकेने नियोजन केले आहे.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 8 Dec 2023
थाटामाटात विवाह होण्यासाठी माहेरच्यांनी केला १५ लाखांचा खर्च… पण वधूने संपवली जीवनयात्रा

चारित्र्याच्या संशय घेणाऱ्या पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 8 Dec 2023
“पुणे लोकसभा पोटनिवडणूक का घेतली नाही? भूमिका स्पष्ट करा, अन्यथा…”, उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला इशारा!

मुंबई: खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कायद्यानुसार सहा महिन्यांत घेण्याची तरतूद आहे. असे असताना ही पोटनिवडणूक का घेण्यात आली नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 8 Dec 2023
प्रफुल पटेल यांच्याबाबतही मलिकांसारखी भावना व्यक्त करणार का? अंबादास दानवे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) खासदार प्रफुल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडी ने जप्तीची कारवाई केली होती. ती देखील दाऊदच्या खास हस्तकाशी निगडित असलेल्या प्रकरणात! जशी ‘तीव्र’ भावना आपण नवाब मालिकांबद्दल व्यक्त केली, तीच भावना आपली खासदार प्रफुल पटेल यांच्याबाबतही आहे का? याचा खुलासा व्हायला हवा! कारण त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोंदिया विमानतळावर स्वागतही केले होते!

11:11 (IST) 8 Dec 2023
नगरमधील कुटुंबाचे भोतमांगे करू, अशी धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, छगन भुजबळांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री येथील दलित कुटुंबावर झालेल्या अत्याचार प्रकरणी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आवाज उचलला. एका दलित कुटुंबाला तुमचा भोतमांगे करू किंवा मणिपूर करू, अशी धमकी महाराष्ट्रात दिली जात असेल तर कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

अधिवेशन काळात विधी मंडळ परिसरातील फूड स्टॉलची रोज तपासणी; धर्मराव बाबा आत्राम असे का म्हणाले…

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (७ डिसेंबर) नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती. आज त्याचे पडसाद विधीमंडळ सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.