Nagpur Winter Session 2023 Updates, 07 December 2023: आजपासून (७ डिसेंबर) नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी विविध पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे या अधिवेशनात यावर काही निर्णय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटात असतील? याबाबत विविध तर्क लावले जात होते. नवाब मलिक यांनीही यावर कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती. पण आता मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…
Assembly Winter Session 2023 Nagpur Updates: नागपूर येथील हिवाळी अधिवेशानासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
नागपूर: शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यांसह इतर ठिकाणचे चंदन चोरी करणाऱ्या आरोपीस सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. तो मध्यरात्रीला बंगल्यात घुसून झाड तोडत होता आणि साथीदारांच्या मदतीने घेऊन जात होता.
नागपूर: तीन महिन्यांपासून आजारी असलेल्या पत्नीचा पत्नी गळा दाबून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मौदा तालुक्यातील माथनी गावात घडली. सविस्तर वाचा…
महापालिकेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीच्या स्थगितीची राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात केलेली घोषणा हिवाळी अधिवेशन आले, तरी हवेतच राहिली.
पाबळ परिसरातील ११४ गावांना स्वयंपूर्णतेचे धडे देण्याचा उपक्रम श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने हाती घेतला आहे.
वर्धा: काँग्रेसतर्फे ११ डिसेंबरला नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा नेण्यात येणार असून यात विदर्भातून एक लाखावर कार्यकर्ते सहभागी होणार आहे.
तलाठी कार्यालयात न जाताही या सेवांचा लाभ गावकऱ्यांना घेता येणार आहे.
नागपूर: राज्यपाल रमेश बैस हे गुरूवार ७ ते १३ डिसेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे या काळात नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे.
वसई : वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना राज्य शासनाने अचानक पणे गावे महापालिकेतच असावे अशी भूमिका घेतल्याने नवीन कलाटणी मिळाली आहे.
उरण: बाजारात सध्या वालाच्या शेंगा येऊ लागल्या असून खवय्यांना पोपटीची चाहूल लागली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्या सुरू होणार आहेत.काही ठिकाणी पोपट्यांना लागू लागल्या आहेत.
दोघीही परीक्षा संदर्भात बोलत असताना अचानक हातात काचेची बाटली घेऊन एक व्यक्ती आला आणि त्याने बाटलीने निशाला मारहाण सुरु केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. शोक प्रस्तावानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल, अशी माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
नागपूर: इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या युवकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत बळजबरीने गर्भपात केला. मात्र, गावी जाऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. प्रियकराचे लग्न झाल्याची माहिती मिळताच प्रेयसीने बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसात केली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधान परिषदेच्या सभागृहात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं विधानमंडळाच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. यासाठी शुक्रवारी(८ डिसेंबर) विधान परिषदत सभागृहात आपल्याला विधान परिषदेचे विद्यमान सदस्य, नागपूर विधीमंडळ अधिवेशनाचे वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र विधीमंडळाच्या संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचं महत्त्व’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
मुंबई: ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एएएआय) १ डिसेंबरला पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२३-२४ या वर्षासाठी प्रशांत कुमार यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ते ग्रुप एम मीडिया (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे दक्षिण आशिया विभागाचे मुख्याधिकारी आहेत. हवास इंडियाचे समूह मुख्याधिकारी राणा बरुआ यांची असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सहमतीने निवड करण्यात आली.
वाई : नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक यांना बुधवारी पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली. हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले. निमित्त होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित क्षेत्रभेटीचे!
वाशिम: मोठया थाठात सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग अल्पावधितच प्रवासी, चालकांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे.
नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ खाजगी आराम बसला काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत ही आराम बस जळून खाक झाली तर लाखो रुपयांचे नुकसान होताना दुसरीकडे मात्र सुदैवाने आराम बसमधील सर्व ५५ प्रवासी बचावले.
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला आहे. विधिमंडळ परिसरात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे प्रत्युत्तर असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी काही तासातच पुन्हा काढण्यात आली आहे.
नागपूर: विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाकडे गेलेल्या विधानसभा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मंत्री नवाब मलिक पोहचले. या प्रसंगी त्यांनी महत्वाचे भाष्यही केले.
-धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस मिळाला पाहिजे.
-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे.
-सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे.
-राज्यात सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे.
-राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. पीक विम्याचे पैसे मिळायला हवेत, अशा विविध मागण्या करत विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे. हातात काळे फलक घेऊन आणि गळ्यात संत्र्यांची हार घालत विरोधक घोषणाबाजी करत आहेत. “या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय”, “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चार सौ बीस”, अशा घोषणा विरोधक देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कोणत्या गटात जाणार? याबाबत नवाब मलिक यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, आज नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या गटात जाणार? याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. (संग्रहित फोटो)