Maharashtra Assembly Winter Session Live Updates, Day 2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार झाला आहे. रविवारी ३९ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता एकूण ४२ मंत्री आहेत. मात्र, आता राज्यातील जनतेला या मंत्र्यांमधील खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. कोणत्या मंत्र्याला कुठलं खातं मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रामुख्याने गृहमंत्रीपद कोणाला मिळणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. गृहमंत्रीपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चुरस चालू आहे. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात कोण जिंकणार हे लवकरच समोर येईल. दरम्यान, विधीमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, बीडमधील संतोष जाधव अपहरण व हत्या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद उमटत आहेत. तसेच बीड व परभणी हे दोन्ही जिल्हे धगधगतायत. या सर्व घडामोडींवर आपलं या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 2 : विधीमंडळ अधिवेशनातील घडामोडींसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

13:34 (IST) 17 Dec 2024

माटुंगा येथील झोपडपट्टीनजिकच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी बीट मार्शल, पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : माटुंगा पूर्व परिसरातील झोपडपट्टीनजीक असलेल्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी बीट मार्शल, मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाला देण्यात आली, त्याची दखल घेऊन पोलिसांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देताना या प्रकरणी कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला व याचिका निकाली काढली.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 17 Dec 2024

मुंबई : आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ आजपासून

यंदा ‘टेकफेस्ट’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाभोवती फिरणाऱ्या निरनिराळ्या स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी सर्वांसाठी उपलब्ध आहे.

सविस्तर वाचा...

13:04 (IST) 17 Dec 2024

मुंबई : प्रवाशांच्या डोक्यावर असुरक्षिततेची टांगती तलवार, अनेक ठिकाणी बस थांब्यांऐवजी केवळ बस खांबच

मुंबईत बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. लोकल पाठोपाठ बेस्ट बसला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळते.

सविस्तर वाचा...

12:52 (IST) 17 Dec 2024

एकरी १४४ टन उसाचे उत्पादन, सांगलीतील सहदेव पाटील यांचा विक्रम

मागील वर्षी दुष्काळी स्थिती तर यंदा अतिवृष्टीची स्थिती असताना पाटील यांनी या हंगामात उस उत्पादनाचा विक्रम नोंदवला आहे.

सविस्तर वाचा...

12:36 (IST) 17 Dec 2024

Parbhani Violence: सोलापुरात एसटी बसेसवर दगडफेक; शिवशाही बस जळून खाक

शहरातील संवेदनशील भागात विशेषतः आंबेडकरी वस्त्यांच्या परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:18 (IST) 17 Dec 2024

"ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…", छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…

मंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ म्हणाले, आज मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचं दुःख, निराशा व उद्विग्नता व्यक्त केली. मी त्यांना मागील पाच-सहा महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकीपासून जे काही घडलं त्याचा इतिहास सांगितला. आता मी माझ्या मतदारसंघात जात आहे. माझ्या लोकांशी चर्चा करेन. राज्यभरातील कार्यकर्ते, समर्थक, समता परिषदेतील लोक उद्या मला भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करून माझी भूमिका ठरवेन. परंतु, मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना सांगितलं आहे की तुम्हाला जो काही निषेध नोंदवायचा आहे तो शांतपणे करा. सर्वांच्या मनात निराशा आहे, परंतु मोबाईलवर व्यक्त होताना किंवा कुठेही प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना असंस्कृतपणे बोलू नका, शिवीगाळ करू नका, 'चप्पल मारो'सारखं आंदोलन करू नका. लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठेही असंस्कृतपणा दाखवू नका. शब्द जपून वापरा,असे मी सर्वांना सांगितला आहे.

दरम्यान भुजबळ यांना यावेळी विचारण्यात आलं की तुमचं मंत्रिपद नेमकं कोणी नाकारलं? त्यावर भुजबळ म्हणाले, माझं मंत्रिपद कोणी नाकारलं ते शोधावं लागेल. तेच शोधण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. परंतु, हा निर्णय पक्षांच्या प्रमुखांचा असतो. म्हणजेच भाजपामध्ये कोणाला मंत्रीपद द्यायचं, नाही द्यायचं तो निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. शिवसेनेबाबतचे निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) निर्णय अजित पवार घेतात. सर्वांनाच मंत्रिपद हवं असतं. परंतु, इथे प्रश्न मंत्रिपदाचा नाही. ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्या अवहेलनेचा हा विषय आहे. त्या संदर्भात मी उद्या सर्वांसमोर बोलेन.

12:00 (IST) 17 Dec 2024

उरण : वाढत्या प्रवाशांना एनएमएमटी सेवेची अपेक्षा

सिडकोच्या माध्यमातून विकसित होणारे उरण आणि पनवेल हे दोन्ही तालुके मुळात नवी मुंबईच्या विस्तार आणि विकासाचाच एक भाग आहेत.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 17 Dec 2024

नवी मुंबई : ट्रॅकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे

सुमारे दीड महिन्यापूर्वी एनएमएमटीच्या ताफ्यात नव्याने २५ गाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्या इलेक्ट्रिक बस असून या बसमध्ये ४ जी आणि ५ जी ही आधुनिक प्रणाली आहे.

सविस्तर वाचा...

11:38 (IST) 17 Dec 2024
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधीमंडळात पडसाद

मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक विधीमंडळात आक्रमक झाले

या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचं नाव घेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

याप्रकरणी आज विधीमंडळात चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली

मात्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यावर उद्या चर्चा करू असं म्हटलं त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला व सभात्याग केला

11:37 (IST) 17 Dec 2024

महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील शासकीय अधिकारी पुण्यात येणार एकत्र ! नक्की काय आहे कारण...

Marathi Sahitya Sammelan : महाराष्ट्र राज्याला साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. गेल्या शतकामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मराठी साहित्यात अतिशय मोलाची भर टाकली आहे.

सविस्तर वाचा...

11:27 (IST) 17 Dec 2024

पालकांनो सावधान…मुलांच्या हातात गाडी देताय ?

Pune RTO : शहरातील विविध भागांत प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अल्पवयीन वाहनचालकांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

सविस्तर वाचा...

11:15 (IST) 17 Dec 2024

"खात्यांना मंत्रीच नाहीत, अधिवेशनात प्रश्न कोणाला विचारायचे?" विरोधकांचा चिमटा; उदय सामंत म्हणाले...

उदय सामंत म्हणाले, "महायुतीमध्ये मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा कोणताही तिढा निर्माण झालेला नाही. आमच्यामध्ये योग्य समन्वय आहे. महायुतीत समन्वय नाही अशी स्थिती नाही. लवकरच महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील". दरम्यान, खात्यांना मंत्रीच नाहीत मग आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे असा प्रश्न विरोधी पक्षातील आमदारांनी उपस्थित केला आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नाही, लक्षवेधी नाही, मात्र महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने विरोधकांनी जर प्रश्न विचारले तर त्यावर उत्तर द्यायला हे सरकार सक्षम आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेले नसलं तरी आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहेत. सर्व मंत्री जनतेची सेवा करतील अशी माझ्या मनात खात्री आहे.

फडणवीसांच्या सरकारमध्ये ४२ जणांना मंत्रिपद मिळालं आहे. मात्र महायुतीमध्ये ११ नाराजीवीर आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्यांची नाराजी कशी दूर केली जाणार? असा प्रश्न विचारल्यानंतर उदय सामंत म्हणाले, भुजबळ किंवा मुनगंटीवार यांच्या प्रश्नावर मी काही बोलू शकत नाही. तो त्यांच्या त्यांच्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे. मी त्यावर वक्तव्य करणं योग्य नाही. कारण मी शिवसेनेचा नेता आहे. छगन भुजबळ यांच्याबद्दल अजित पवार निर्णय घेतील मी त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. आमच्या पक्षातील नेत्यांच्या नाराजीबद्दल बोलायचं झाल्यास एकनाथ शिंदे त्या-त्या नेत्याशी बोलतील व त्यांची समजूत काढतील.

Story img Loader