Maharashtra Hiwali Adhiveshan Updates : राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आजचा तिसरा दिवस आहे. काल अनेकविध मुद्द्यांवर विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा झाली. तसंच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. ते दिल्लीत गेल्याची चर्चा होती. परंतु, ते नागपुरातच असल्याचं समोर आलं. तसंच, त्यांच्या घशाला संसर्ग झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यानंतर आज ते विधिमंडळात हजर होणार असल्याचं सांगितलं जातंय. आज नागपुरात त्यांची अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यासह हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

Live Updates

Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 3 : महाराष्ट्र विधानसभेतील महत्त्वाच्या बातम्या वाचा

19:17 (IST) 18 Dec 2024

१६०० हून अधिक म्हाडा कर्मचारी ३५ वर्षांपासून निवृतिवेतनापासून वंचित

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणात (म्हाडा) एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून निवृत्तिवेतन मिळत असताना उर्वरित १६०० हून अधिक कर्मचारी गेल्या तीन दशकांपासून निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 18 Dec 2024

गेटवे ऑफ इंडियात मोठा अपघात, एलिफंटाला जाणारी बोट उलटली

एलिफंटा येथे जाणारी एक बोट आज गेट वे ऑफ इंडिया किनारपट्टीवर बुडाली. यामध्ये जवळपास ६० प्रवासी होते. आतापर्यंत २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. ICG जहाजांद्वारे शोध मोहीम सुरू असताना एक मृतदेहही सापडला आहे. अधिक तपशील तपासले जात आहेत, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

17:32 (IST) 18 Dec 2024

मालेगावात परप्रांतियास लुटणाऱ्याला अटक

नाशिक : मालेगावात परप्रांतीय व्यक्तीला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी आणि चोरलेले पाच हजार रुपये, असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:09 (IST) 18 Dec 2024

मुंब्रा शहरात फेरीवाल्यांमध्ये राडा, जागेच्या वादातून फेरीवाल्याच्या पायावरून दुचाकी चालविली

ठाणे : मुंब्रा येथे फेरीवाल्यांमध्ये झालेल्या वादातून सात ते आठ जणांनी फेरीवाल्याला बेदम मारहाण करून त्याच्या पायावरून दुचाकी चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे फेरीवाल्याचा पायाचा दुखापत झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:48 (IST) 18 Dec 2024

नागपूर : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी… “

नागपूर : निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे निवडून आणावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र त्यांची मागणीच ही अर्थाने हास्यास्पद असल्याची टीका करत आम्हाला जेलमध्ये टाकू अशी भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अलीकडे आमुलाग्र बदल असून ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

वाचा सविस्तर...

16:47 (IST) 18 Dec 2024

चार नवीन स्मशानभूमींसाठी पनवेल महापालिकेचा १० कोटींचा निधी

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये तळोजा वसाहतीमध्ये दोन ठिकाणी, कोयनावेळे आणि घोट या चार ठिकाणी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम पालिका प्रशासन करणार आहे. यासाठी पालिका १०.६८ लाख रुपये खर्च करणार आहे.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 18 Dec 2024

Maharashtra Assembly Winter Session Live Updates in Marathi :

महाराष्ट्र नक्षलवाद विधेयक विधानसभेत सादर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सादर केलं विधेयक

16:07 (IST) 18 Dec 2024

विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाजासाठी सदस्य चैनसुख संचेती यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.

15:42 (IST) 18 Dec 2024

लोक अदालतीची नोटीस येताच चालकांनी भरली ६६ लाखांचा थकित दंड

ठाणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात. ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटीसानंतर ६६ लाख ७ हजार ९ रुपयांचा थकित दंड वाहतुक विभागाकडे भरण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 18 Dec 2024

कल्याण मुरबाड प्रवासी वाहतूक करणाऱ्या अवैध जीपवर ‘आरटीओ’ची कारवाई

कल्याण : कल्याण ते मुरबाड दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आठहून अधिक जीप चालकांवर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आयुर्मान संपलेली ही वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 18 Dec 2024

बाबासाहेबांच्या अवमानावरून विधिमंडळात रण पेटले…निलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवेंना बोलण्याची परवानगी नाकारली…

नागपूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात परिषदेच्या सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली.

वाचा सविस्तर...

14:48 (IST) 18 Dec 2024

द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वाहनाच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

सविस्तर वाचा...

14:35 (IST) 18 Dec 2024

Maharashtra Live News : "पुन्हा राज्या-राज्यांत जाणार अन् ओबीसींचा एल्गार पुकारणार", छगन भुजबळ गरजले

अनेक राज्या-राज्यात जाणार आणि पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार पुकारणार - छगन भुजबळ

अधिवेशन सुरू होतं, राजस्थानपासून मुंबई, बिहारचे लोक आले होते. अख्ख मैदान भरलं होतं. पाऊस आला तरी कोणी उठले नाहीत. पाटणा, बिहार येथे सात लाख लोकांचं मैदान आहे. जयप्रकाश नारायण यांचं तिथे भाषण फुल्ल झालं हतं. त्यानंतर महात्मा समता परिषदेच्या सभेला पूर्ण मैदान भरलं होतं. लालूजी पाहत बसले, काय सभा आहे. अनेक ठिकणी सभा झाल्या. थोडं शांत राहा, पुढे जाणार. जावं लागेल. ताकद एकत्र करावी लागेल. काही लोकांचं आपल्याबद्दल वेगळं मत झालेलं आहे - छगन भुजबळ

मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौड आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी - छगन भुजबळ

14:12 (IST) 18 Dec 2024

‘हिरकणी’ रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्यात, पनवेल महापालिकेचे दोन एकर जागेवर आठ मजली रुग्णालय

पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रातील महिला आणि बालकांच्या आरोग्याचा विचार करता सर्वाधिक खर्चाची तरतूद पालिकेच्या पहिल्या माता बाल संगोपण रुग्णालयासाठी केली आहे. दोन एकर जागेवर हे आठ मजली ‘हिरकणी’ रुग्णालय बांधण्यासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जाणार आहे.

सविस्तर वाचा...

13:14 (IST) 18 Dec 2024

भुजबळांचे मंत्रीपद अन् त्याचे नागपूर कनेक्शन

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यात आल्याने ते नाराज आहेत. तशा भावनाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा विषय सर्वाधिक चर्चेचा आहे. यातूनच भुजबळांचे मंत्रीपद आणि त्याचे नागपूर कनेक्शन याचाही उलगडा झाला आहे.

वाचा सविस्तर...

13:14 (IST) 18 Dec 2024

पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”

नागपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. विरोधी पक्षनेते पद मिळवण्याएवढेही संख्याबळ कुठल्याही विरोधी पक्षाकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

वाचा सविस्तर...

13:13 (IST) 18 Dec 2024

कापूस, धान, सोयाबीनच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विधान भवन परिसरात…

नागपूर : धान, कापूस, सोयाबीन या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या मुद्यावर विरोधकांचे विधीमंडळ परिसरात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विरोधकांनी एक आगळी वेगळी गोष्ट केली. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

वाचा सविस्तर...

13:02 (IST) 18 Dec 2024

Maharashtra live News : विधानसभेत आमदार गैरहजर, भास्कर जाधव संतापले

असं झालंय की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीत टेक्निकल मुद्दा उपस्थित करतो म्हणून मी बऱ्याचदा गप्प बसतो. आजचे कामकाज पाहिले. २९३ चा प्रस्ताव वाचला. २९३ च्या प्रस्तावावर ज्या सदस्यांची नावे टाकली आहेत त्यातील बरेसचे सदस्य सभागृहात आलेले नाहीत. म्हणून २९३ चा प्रस्ताव मी बारकाईने वाचत होतो. जे सदस्य सभागृहात आलेच नाहीत, त्यांची नावे सभागृहात आलेत नाहीच. आताही तुम्ही २३ नावे वाचली, त्यातील एकही सदस्य हजर नाहीत. मग त्यांनी नावे दिली होती का - भास्कर जाधव

11:38 (IST) 18 Dec 2024

Maharashtra Live Update : शेतकरी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1869262827812253765

10:55 (IST) 18 Dec 2024

Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates

अजित पवार विधानभवनात दाखल, आज कामकाजात होणार सहभागी

10:51 (IST) 18 Dec 2024

Maharashtra Live Blog : छगन भुजबळांचा समता परिषदेतील सभासदांना इशारा; म्हणाले, "तुमचा राग..."

अद्वातद्वा शब्द वापरू नका. असं करणारे आमच्या समता परिषदेचे सभासद नाहीत, ते कणीतरी वेगळे असतील असं मी आधीच सांगतो. तुमचा राग व्यक्त करण्यास माझी मनाई नाही, पण ती चांगल्या सुसंस्कृत शब्दांत आणि कृतीतून व्यक्त झाली पाहिजे.

10:38 (IST) 18 Dec 2024

Maharashtra Live Blog : दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अजित पवार आज विधानसभेत हजर राहणार?

दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेलेल अजित पवार आज नागपुरात आहेत. नागपुरातील विधानभवनात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली. विविध निवेदने घेऊन कार्यकर्ते आज अजित पवारांना भेटत होते. त्यामुळे ते आज विधानसभेतही हजर राहणार असल्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह

Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 3 : महाराष्ट्र विधानसभेतील महत्त्वाच्या बातम्या वाचा

Story img Loader