Maharashtra Assembly Winter Session Live Updates, Day 1 : विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी झाला. फडणवीस मंत्रिमंडळात विविध जातीजमातीचे समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तरीही खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळतंय याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, आज नवं सरकार स्थापन झाल्यानंतरचं पहिलं हिवाळी अधिवेशन होत आहे. आजपासून विरोधक आणि सत्ताधारी कोणत्या विषयांवर सभागृह गाजवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 1 : राज्यातील राजकीय घडामोडी आणि हिवाळी अधिवेशनातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या
छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करा – ओबीसी नेते लक्ष्मण हाके
विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सभासद म्हणून छगन भुजबळ असून त्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले. त्यामागे नेमकी कोणती कारणे होती. याबाबत अजित पवार यांनी समोर येऊन उत्तर द्यावे, असे हाके म्हणाले.
Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; सख्ख्या भावाचा खुलासा, म्हणाले, “हत्या जातीयवादातून झालेली नाही”!
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. परंतु, संतोष देशमुख यांच्या भावाने धनजंय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केला. संतोष देशमुख यांची जातीयवादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं.
मेट्रो ४ : कापूरबावडी येथे चार तुळई बसविण्यात एमएमआरडीएला यश, प्रत्येकी १०० टनाच्या तुळई आठ तासांत बसविल्या
‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम हाती घेतले आहे. ‘मेट्रो ४’ मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
पुणे : महापालिकेविरोधातील दावा तडजोडीत निकाली
मॅथ्यू यांनी नियमितपणे मिळकत कर बचत खात्यामधून भरला. मात्र, त्यांनी भरलेला कर महापालिकेच्या नोंदीवर आला नाही.
Maharashtra Live News: "आमदार रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या मुलाला कोंडून ठेवलंय", काँग्रेसचा गंभीर आरोप
रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या एका मुलाचं अपहरण करून कोंडून ठेवलंय. त्याच्याकडून ९ कोटी गायब झाले. जी माहिती आमच्याकडे आहे, रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या मुलाला लपवून ठेवलंय. त्याच्याकडून ९ कोटी गायब झाल्याने साडेचार कोटी उकळले आहेत. उर्वरित साडेचार कोटींसाठी त्याच्यावर अत्याचार सुरू आहेत - नाना पटोले

पहिल्याच दिवशी विधानसभेत 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
भारतात मानसिक आजार दुर्लक्षित, मनोरूग्ण दोषसिद्ध आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
प्रदीपकुमार याला वडिलांच्या खुनाप्रकरणी २०१५ मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मी एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय? काय फरक पडतो.. मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं.. छगन भुजबळ संपला नाही. ज्यांनी मला डावललं त्यांना फोन करून विचारा - छगन भुजबळ
मी कोणाशी चर्चा केलेली नाही. माझ्या लोकांबरोबर चर्चा करेन. माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि समता परिषदेतील लोकांशी चर्चा करेन - छगन भुजबळ
Maharashtra Live NEws : मंत्रिमंडळातील एक जागा जयंत पाटलांकरता राखीव ठेवलीय - अमोल मिटकरी
मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठी रिकामी ठेवलं होतं. त्यावेळी त्यांनी खूप विचारही केला. लोकसभेत त्यांना चांगला जनादेश मिळाला. त्यामुळे त्यांना वाटलं आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की एक मंत्रिपद रिकामी ठेवलंय त्यामुळे ते नक्कीच विचार करतील - अमोल मिटकरी

Pune Winter News: पुणे गारठले; यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद
Pune Cold Weather : थंडीचा जोर चांगलाच वाढल्याने पुणे आणि परिसर गारठल्याचे चित्र आहे. किमान तापमानात घट होत असल्याने आज (१६ डिसेंबर) यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
धक्कादायक! ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री, आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता
गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषधांप्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या बनावट औषधांचा साठा सरकारी रुग्णालयांमध्येही विक्री झाल्याचे उघड झाले होते.
Maharashtra Live News : जामिन घ्यायलाही कोणी शिल्लक ठेवला नाही, परभणी हिंसाचार प्रकरणी सुषमा अंधारेंचा घणाघात
संजय वाकोडे जुना पँथरचा माणूस. अनेक आजारांनी ग्रस्त आहे. हा माणूस तोडफोड करूच शकत नाही. रवी सोनकांबळे नगरसेवक राहिलेला माणूस. परभणीत शांतता राहण्यासाठी शांतता कमिटीत काम केलेला माणूस. सुधीर साळवे, महादेव ननावरे, विशाल जंगले, रमेश मोरे, चंद्रकांत जोंधळे, अमोल जोंधळे, एका एका कुटुंबातील अख्ख कुटुंबावर गुन्हा दाखला. म्हणजे जामीन घ्यायलाही कोणी शिल्लक नाही राहिला पाहिजे.सोमनाथ सुर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी असून तो फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता याला इतकी बेदम मारहाण झाली की याची मारहाण अक्षरशः धारदार शस्त्राने मारहाण करत असाल त्याला बळी जात असेल त्याचा एमसीआर चालू असताना तो गेला, पण त्याला पोलीस कस्टडीत असताना अमानुष मारहाण केली गेली - सुषमा अंधारे

‘रिपाइं’चा चेंबूरमध्ये रास्ता रोको, परभणी घटनेचा निषेध
मुंबई: परभणी येथे संविधानाची विटंबना केल्या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत रविवारी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ ‘रिपाइं’तर्फे सोमवारी सकाळी चेंबूर येथे शीव-पनवेल मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
परभणी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची काही समाज कंटकानई विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यालाही अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सूर्यवंशीचा रविवारी मृत्यू झाला. सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्ष अनेक जिल्ह्यात सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. चेंबूरमध्ये ‘रिपाइं’तर्फे सोमवारी सकाळी चेंबूर नाका परिसरात आंदोलन करण्यात आले. ‘रिपाइं’चे चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काही आंदोलकांनी शीव-पनवेल मार्गावर रास्ता रोको आदोलन केले. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चेंबूर पोलिसांनी तत्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले आणि वाहतूक सुरळीत केली.
मुंबई विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरील नियुक्त्या जाहीर, अधिसभेच्या विशेष बैठकीत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण
अपूर्ण असलेल्या विविध प्राधिकरणांना आकार मिळाला असून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न लवकरच सुटतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली, शेकडो लीटर पाण्याची नासाडी
कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले.
Maharashtra Live News : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज? म्हणाले...
समाज सर्वांची समजूत घालेल. काही अपेक्षा नाहीत, एवढीच प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. दरम्यान आज दुपारी १२ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
Maharashtra Live News : हे सरकार गेल्याशिवाय लोकशाहीला न्याय मिळणार नाही- भास्कर जाधव
हे सरकार आलंय ते अनैतिक मार्गाने सत्तेवर आलं आहे. ईव्हीएम असेल, सरकारी यंत्रणा असेल, जातीयवाद फैलावणं असेल. हे सरकार गेल्याशिवाय या लोकशाहीला न्याय मिळणार नाही - भास्कर जाधव

Maharashtra Live News : ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडी आवाज उठवणारच - अंबादास दानवे
हे सरकार ईव्हीएम सरकार आहे. या सरकारच्या बाजूने जनमत नाही. त्याविरोधात आवाज महाविकास आघाडी उचलणार - अंबादास दानवे

बीड, परभणीच्या घटनेवर फडणवीस थेटच बोलले, “तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई…”
बीड जिल्ह्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. सरपंचाची हत्या होणे हे कुठेही सहन केले जाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
...तर विरोधकांची यापेक्षा वाईट परिस्थिती होईल - चंद्रशेखर बावनकुळे
आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. ईव्हीएमवर दोष देऊन ते वेळ काढत असतील तर यापेक्षाही वाईट परिस्थिती विरोधकांची होईल. ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान करत आहेत. जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे - चंद्रशेखर बावनकुळे

जेव्हा मंत्री माहिती कार्यालयच्या गाडीत बसून मंत्रिमंडळ बैठकीत जातात
वर्धा : राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन तासभराचा कालावधी लोटत नाही तोच एक मंत्री अडचणीत सापडला. सर्व मंत्री शपथ घेऊन थांबले. नंतर रामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक लगेच बोलावल्याचा निरोप सर्व नवनियुक्त मंत्र्यांना गेला. आणि लगबग उडाली. रामगिरीवार पोहचायचे कसे ते!
कमी संख्याबळाचा वारंवार उल्लेख, विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न
नागपूर : विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुती सरकारमधील नेत्यांनी विरोधी पक्ष संख्येने कमी असले तरी त्यांचा सन्मान राखला जाईल, अशी भूमिका निकालाच्या पहिल्या दिवसापासून घेतली खरी, पण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संख्याबळाचा वारंवार उल्लेख करून व नंतर त्यांचा सन्मान राखला जाईल, असे सांगत एकप्रकारे त्यांना हिणवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “होय आमचे सरकार ईव्हीएमचे, कारण…”
नागपूर: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीचे सरकार ‘ईव्हीएम’मुळे आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होय, आमचे सरकार ‘ईव्हीएम’चे सरकार असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे. पण यावेळी फडणवीसांनी त्यांच्या ईव्हीएमचा अर्थही सांगितला आहे.
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 1 : राज्यातील राजकीय घडामोडी आणि हिवाळी अधिवेशनातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या