Maharashtra Assembly Winter Session Updates : विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी झाला. फडणवीस मंत्रिमंडळात विविध जातीजमातीचे समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी १८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तरीही खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळतंय याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान, आज नवं सरकार स्थापन झाल्यानंतरचं पहिलं हिवाळी अधिवेशन होत आहे. आजपासून विरोधक आणि सत्ताधारी कोणत्या विषयांवर सभागृह गाजवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 1 : राज्यातील राजकीय घडामोडी आणि हिवाळी अधिवेशनातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने दीपक केसरकर नाराज? म्हणाले…
नवीन रक्ताला वाव द्यायला लागतो. आज अनेक नवीन मंत्री झाले आहेत. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं महाराष्ट्राची परंपरा आहे. ज्यांचे त्यांचे पक्ष योग्य तो मान ठेवतील. शेवटी आपल्याला राज्यासाठी काम करायचं असतं – दीपक केसरकर
२ लाखांपर्यंत पुरस्कार जिंकण्याची संधी, नागपुरात प्रथमच होणार चित्रपट महोत्सव
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी अशा प्रकारचे फेस्टिवल नागपुरात प्रथमच होत असल्याने आयोजकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या, नाशिकमध्ये चार दिवसांत कांद्याच्या दरात किती घसरण झाली
मुंबई : नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी (१३ डिसेंबर) लासलगाव बाजार समितीत लाल कांदा म्हणजे खरीप हंगामात निघालेला कांदा सरासरी ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विकला जात होता. सोमवारी (१६ डिसेंबर) कांद्याचे भाव १२०० ते १६०० रुपये किलो रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.
जलवाहतूक प्रकल्पाची अंमलबजावणी संथ गतीने, कामाला गती देण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी
ठाणे : मुंबई महानगरातील ठाणे, भाईंदर, डोंबिवली या शहरात रस्ते आणि रेल्वे वाहतूकीवरील भार कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाची अंमलबजावणी संथ गतीने सुरू आहे. यासंबंधीच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतानाच, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही हा मुद्दा उपस्थित करत कामाला गती देण्याची मागणी केली आहे.
वसई: परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचे पडसाद वसई विरार मध्येही उमटले आहेत. सोमवारी विरार पोलीस ठाण्याच्या बाहेर शेकडो भीम सैनिकांनी एकत्रित येत दीड तास ठिय्या आंदोलन केले. परभणीमध्ये एका माथेफिरूने १० डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी संविधानप्रेमी तथा आंबेडकरी समाजाच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता. या तरुणाचा झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहे. वसई विरार मध्येही सोमवारी सकाळी ११ वाजता आंबेडकरी अनुयायांकडून व विविध संघटना यांच्या मार्फत विरार पोलीस ठाण्याच्या बाहेर निषेध आंदोलन केले. जवळपास दीड तास आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडला होता. यात रिपब्लिकन सेना, बहुजन पँथर पक्ष, संविधान कृती समिती, बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा व इतर सामाजिक, राजकीय संघटनांचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
“पोलिसांनी गुन्हा केला तर अधिक कठोर…”, वाचा, जामीन रद्द करताना काय म्हणाले न्यायालय?
कायद्याचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र पोलिसांची त्यांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ याचा आदर राखणे आवश्यक आहे.
चोरीच्या दुचाकींची रंग बदलून विक्री, दोन संशयित ताब्यात
नाशिक : चोरीच्या दुचाकींचा रंग बदलून बाजारात विकणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांच्या मोटार सायकल चोरी शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख १२ हजार रुपयांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
Yavatmal Crime Updates: पतंगाचा दोर, आयुष्याला घोर…. विजेच्या धक्क्याने एका बालकाचा….
आर्णीतील गांधीनगर येथील रितेश हा रविवारी घराच्या छतावर पंतग उडवित होता. खांबावरून घरात वीजप्रवाह सोडलेल्या केबलच्या कापलेल्या भागास रितेशचा स्पर्श झाला.
१० लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून दोन वेगवेगळ्या प्रकरणात १० लाख रुपयांहून अधिकच्या किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
२०२५चा गणेशोत्सव ‘पीओपी’मुक्त? पर्यावरणपूरक उत्सव नियोजनासाठी पुढील आठवड्यात बैठक
मुंबई : गणेशोत्सवाला अद्यााप मोठा कालावधी शिल्लक असला तरी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे. २०२५चा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने लवकरच एक पूर्वतयारीची बैठक होईल.
रेल्वेतील अपंगांच्या डब्यात घुसखोरी, तीन वर्षांत ९ हजार जणांवर कारवाई
ठाणे : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासात गेली काही वर्षे अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांत ठाणे रेल्वे स्थानकात ९,३६२ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. सर्वाधिक कारवाई १ जानेवारी ते १३ डिसेंबर या कालावधीत झाली.
बुलढाणा : मंत्रीपद न दिल्याने कार्यकर्ते रस्त्यावर; ‘या’ आमदारांनी नागपुरातून ‘व्हिडीओ कॉल’ करुन…
तुम्हाला जो काही राग काढायचा तो माझ्यावर काढा, भाजप नेत्यांवर नका काढू, जाहीर नाराजी व्यक्त करू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.
Yavatmal Crime News: विद्यार्थिनी १० दिवसांपासून होती बेपत्ता, अखेर दगडाने ठेचलेल्या…
शहरालगत मोहा ते बोरगाव धरण घाटात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उजेडात आली.
पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत, सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात कारवाई
रविवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला धायरीतील अंबाईदरा परिसरात गस्त घालत होते.
मंत्रिमंडळाचा विस्तार होताच पुण्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय
राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. त्यानंतर लगेचच पुण्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
टाकेहर्ष महिलांचे पाण्यासाठी आंदोलन
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष ग्रामपंचायत क्षेत्रात जलस्वराज्य योजनेची नळ पाणी पुरवठा योजना दोन वर्षापासून बंद आहे. देयक न भरल्याने वीज कंपनीने योजनेची वीज जोडणी खंडित केली असून तेव्हापासून योजना बंद आहे. त्यामुळे २०२३ पासून गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.
पुणे : ‘सहजीवन व्याख्यानमाले’त गुरुवारी सरसंघचालक मोहन भागवत यांचे व्याख्यान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
वाघासोबत फोटोसेशन ! लोकांनी पुन्हा वाघाला घेरले…
परिस्थिती चिघळण्यापूर्वीच वनविभागाचे रक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी केली आणि वाघाला तेथून हाकलले.
कल्याण डोंबिवलीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना, ग्रामीण भागाला योजनेचा लाभ नाही
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी दोन टप्प्यांमध्ये अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत चालू वर्षाची पाणीपट्टी, कर थकबाकी मालमत्ता करधारकाने पालिकेच्या तिजोरीत विहित वेळेत भरणा केली तर त्या रकमेवरील दंड, व्याज माफ केले जाणार आहे.
नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “माझी एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नाव का कमी केलं गेलं. ते मला माहीत नाही. बाकी याबाबत मी व्यथित नाही. मंत्रि म्हणून गोरगरिबांचे विषय मांडायचो. आता विधानसभेत मांडेन. मोठ्या भावाची छोट्या भावासोबत झालेली ही भेट. जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात, तेव्हा मी गडकरींची भेट घेतो. त्यांचं मार्गदर्शन नेहमीच उचित असतं. देवेंद्र फडणवीसांनी जे मार्गदर्शन दिलं तेच नितीन गडकरींनी केलं आहे. मी आता सर्व संसदीय आयुध वापरणार आहे. मी नाराज कधीच राहत नाही. काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे, हे मला नेहमी माहितेय. “
“वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागे वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार आहे. पोलिस या प्रकरणात दिशाभूल करत आहेत, असे आमदार क्षीरसागर म्हणाले.
Maharashtra Live News : “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
सुधीरभाऊंशी माझी नीट चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्याचा मानस आहे. पक्ष आणि सरकार दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. काहीवेळा पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात, काहीलोक सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात. सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिडमंळात घेतलेलं नाही – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
“आता मंत्रीपद दिले तरी घेणार नाही,” विजय शिवतारेंची उद्विग्न प्रतिक्रिया
नागपूर : महाराष्ट्रात मंत्रीपद देताना प्रादेशिक समतोल राखला जात असे, परंतु आता बिहारप्रमाणे जातीय समतोल राखण्याला प्राधान्य दिले जात आहे, अशी टीका शिवसेनेचे (शिंदे) पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनी केली.
पुणे : पादचाऱ्याची चोरट्यांशी झटापट; दुचाकी सोडून चोरटे पसार – लष्कर भागातील घटना
शेख हा श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील एका गाळ्यावर कामाला आहे. तो रविवारी (१५ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास लष्कर भागातील महात्मा गांधी पीएमपी स्थानक परिसरातून निघाला होता.
“९ कोटींसाठी एका तरुणाचे अपहरण…”, नाना पटोलेंचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप
नागपूर : हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठा आरोप केला. रवींद्र चव्हाण यांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवले असल्याचे ते म्हणाले. चव्हाण यांच्या घरात त्या तरुणाला बेदम मारहाण देखील झाल्याचे त्यांनी सांगितले.
लोक अदालतीमुळे १७ कोटींचा दंड वसूल, विशेष मोहिमेत १,८३१ वाहनांविरोधात कारवाई
मुंबई : ई-चलनच्या थकीत दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव घेतल्यानंतर २ लाख ३० हजार ई-चलनवरील थकीत १६ कोटी २६ लाख रुपयांचा दंड चालकांनी भरला.
मुंबईत शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची सुटका
पूर्व द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी पहाटे ३ ते ४ दरम्यान ताब्यात घेतलेल्या घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती.
मंत्रिपद नाकारले; भुजबळ समर्थक रस्त्यावर, कुटे समर्थकांचा समाजमाध्यमावर निषेध
बुलढाणा: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात हमखास मंत्रिपद मिळणार अशी खात्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अगदी दूरवरच्या बुलढाणा जिल्हावासीयांना देखील होती. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या लाल दिव्याची देखील चाहत्यांना खात्री होती. मात्र भारतीय जनता पक्षाप्रमाणेच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित दादा गट) देखील राजकीय धक्कातंत्रचा वापर केला.
विमानाचे उड्डाण रोखण्यासाठी दूरध्वनीवरून खोटी माहिती देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा
विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑक्टोबरपासून देशातील सर्वच विमानतळांवर, तसेच विमान कंपन्यांना धमक्यांचे संदेश प्राप्त होत आहेत.
छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर; म्हणाले, “सात-आठ दिवसांपूर्वी…”
सात आठ दिवसांपूर्वी ते म्हणाले की राज्यसभेवर जायचंय तर जा. मला पूर्वी राज्यसभेवर जायचं होतं, पण त्यांनी संधी दिली नाही. मला म्हणाले की तुम्ही लढायला पाहिजे, तुमच्याशिवाय येवला नाही. मी म्हटलं ठीक आहे लढतो. मी लढलो आणि चांगल्या मतांनी निवडूनही आलो. पण आता मी ताबडतोब जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघातील मतदारांशी ती प्रतारणा ठरेल. राज्यसभेवर जायचं म्हणजे विधानसभेवर राजीनामा द्यावा लागेल. हे माझ्यासाठी दुःखदायक आहे. निश्चितपणे मी त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांना मी असं सोडणार नाही – छगन भुजबळ
सभागृहात दोन्ही बाजूचे लोक माझ्यावर अंगावर येत असतानाही मी ओबीसींची बाजू मांडली. ओबीसीचा लढा मी पूर्णपणे लढलो. लाडकी बहीण आणि ओबीसी घटकांचा फायदा झाल्याने एवढं मोठं यश मिळालं आहे – छगन भुजबळ
मी आता विधानसभा आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. यामुळे मतदारांशी प्रतारणा ठरेल. एक दोन वर्षांनी पाहूयात – छगन भुजबळ
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह
Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates, Day 1 : राज्यातील राजकीय घडामोडी आणि हिवाळी अधिवेशनातील लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या