Maharashtra Hiwali Adhiveshan Updates : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. अशात आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय काय घडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान १६ डिसेंबर रोजी सुरू झालेले हे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
सध्या नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
दुसरीकडे आज रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपासह शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते आणि आमदार दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे (अजित पवार) राजू कारेमोरे हे एकमेव आमदार रेशीमबागेत गेले आहे. उममुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाही या बौद्धिकाला दांडी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता आठवडा होत आला आहे. अशात आज नव्या मंत्र्यांना खातेवाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासह हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी.
Maharashtra Hiwali Adhiveshan Live News Updates, Day 4| यंदाचे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार
भाजप आमदार स्पष्टच बोलले, म्हणाले पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही
पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही, अशी टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलतांना केली. भाजपने मंत्री केलेल्या पंकजा मुंडेंवर खुद्द पक्षाच्या आमदाराने गंभीर आरोप केल्याने नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स. (Photo- ANI)
सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. अशात आज विधानसभा आणि विधान परिषदेत काय काय घडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान १६ डिसेंबर रोजी सुरू झालेले हे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.