Maharashtra Assembly Winter Session Updates, Day 5 : सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. आज बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीची चर्चा अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चेची ठरत आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तरात काही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे ते आता पुढे काय भूमिका घेणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे. यासह राज्यातील राजकीय आणि हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात…

Live Updates

Maharashtra Assembly Winter Session Live Updates, Day 5

19:43 (IST) 20 Dec 2024

सिफिलीस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

सिफिलीस हा लैंगिक संबंधातून संक्रमित होणारा आजार असल्याने असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत.

सविस्तर वाचा...

19:34 (IST) 20 Dec 2024

कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत

अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या गुन्हा दाखल दहा जणांपैकी दोन जणांना विशेष पथकांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा...

19:02 (IST) 20 Dec 2024

मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

पीडित महिला मुलासह राहत होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने सहा महिन्यांपूर्वी तिच्याशी मैत्री केली.

सविस्तर वाचा...

18:58 (IST) 20 Dec 2024

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात आता पोलीस अधिकारी

अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची खात्री न करताच त्याला मोबाइलवर आलेले ओटीपी तत्काळ दिले.

सविस्तर वाचा...

18:52 (IST) 20 Dec 2024

वस्त्रोद्योगातील बालमजुरीची समस्या मांडणारा ‘अनुजा’ ऑस्करच्या स्पर्धेत

वस्त्रोद्योगातील बालमजुरीची समस्या मांडणारा ‘अनुजा’ या लघुपटाची ऑस्करच्या ‘लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म’ विभागात स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 20 Dec 2024

पिंपरी : बिल्डरांना ‘या’ वेळेत बांधकाम करता येणार नाही; महापालिकेकडून नियमावली जारी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामांची संख्याही वाढत आहे.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 20 Dec 2024

स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल…

Kareena Thapa : येत्या २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 20 Dec 2024

मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई

भाईंदर : मिरा रोड येथील गोकुळ व्हिलेज येथील ‘श्री गोपाळ लाल ‘मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा सविस्तर...

17:58 (IST) 20 Dec 2024

अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधान आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडराजा येथे आज आंबेडकरी समाज एकवटला.

सविस्तर वाचा...

17:54 (IST) 20 Dec 2024

संजय राऊत यांच्या घराची रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

Aditya Thackeray meet CM Devendra Fadnavis : संजय राऊत यांच्या सुरक्षेत आणि घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.

सविस्तर वाचा...

17:47 (IST) 20 Dec 2024

दोन्ही बंडात साथ देणारा आमदार मंत्रिपद न मिळाल्याने अजितदादांवर नाराज; अधिवेशन सोडून परतले मतदारसंघात

पिंपरी : आमदार अण्णा बनसोडे आता अजितदादांवर नाराज झाले आहेत. तिसऱ्यांदा निवडून आल्याने मंत्रिपद मिळेल असा विश्वास होता. परंतु, भ्रमनिरास झाला. त्यामुळे अधिवेशनात मनही लागत नव्हते असे आमदार बनसोडे यांनी अधिवेशन सोडून मतदारसंघात आल्यानंतर सांगितले.

वाचा सविस्तर....

17:37 (IST) 20 Dec 2024

पुणे : लिफ्टच्या डक्टमध्ये पडून तरूण मजूर ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडीत पिरॅमिड कन्स्ट्रक्शन साईटवर बांधकाम सुरू आहे.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 20 Dec 2024

महाराष्ट्र पोलीस अकादमीतून पाच अनाथ मुले उपनिरीक्षक, आरक्षणासह तर्पण फाउंडेशनच्या पालकत्वाचे फलित

अनाथ, निराधार बालकांना बालगृहात प्रवेश दिला जातो. शून्य ते १८ वयोगटातील अशा मुलांना बालगृहामध्ये अन्न, वस्त्र, निवास, शिक्षण सुविधा दिल्या जातात.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 20 Dec 2024

लोकमान्य टिळकांना कर्तृत्वापेक्षा आडनावावरून लक्ष्य केले - अविनाश धर्माधिकारी

पिंपरी : लोकमान्य टिळकांना नेहमीच त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या आडनावावरून लक्ष्य करण्याचे काम तत्कालीन इंग्रज सरकार आणि विरोधकांनी केले. टिळक म्हणजे ब्राम्हणी वर्चस्ववादी विचारांचे नेतृत्व असा अपप्रचार त्यांच्याबद्दल केला गेला. मात्र या देशासाठी एक स्वतंत्र जबाबदार सरकार असावे व त्याची निवड 'एक व्यक्ती, एक मत' या प्रक्रियेतून व्हावी, असा विचार त्यांनी सर्वप्रथम मांडला. यामध्ये कुठेही जातीभेद न करता सर्वांना समान हक्क असावा. व त्यासाठी देशाला स्वतंत्र राज्यघटना व लोकशाही असावी अशी भूमिका मांडणारे देशातील पहिले नेतृत्व लोकमान्य टिळक हे होते, असे मत निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 'टिळक पर्व' या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस व देवराज डहाळे यांच्या हस्ते धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

17:08 (IST) 20 Dec 2024
नाशिक : ज्योती स्ट्रक्चर्स कंपनीच्या आवारात आग, दोन तासांनंतर नियंत्रण

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत ज्योती स्ट्रक्चर्स कंपनीच्या आवारातील रिकाम्या टाकीला शुक्रवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने तात़डीने धाव घेत दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला. सातपूर वसाहतीत ज्योती स्ट्रक्चर्स कंपनीच्या क्रमांक दोन प्रकल्प परिसरात ही दुर्घटना घडली. या वसाहतीत अनेक बड्या उद्योगांसह शेकडो कंपन्या आहेत. ज्योती स्ट्रक्चर्सचा बंद असणारा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. आवारात उच्च क्षमतेचे पॉलिथीन साठविण्यासाठी टाकी आहे. सध्या रिक्त असणाऱ्या या टाकीने दुपारी साडेबाराच्या सुमारास अकस्मात पेट घेतला. या टाकीलगत आणखी एक टाकी असल्याने आग पसरण्याची भीती होती. या घटनेची माहिती समजताच पोलिसांसह अग्निशमन दलाने धाव घेतली. तीन ते चार बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन तासानंतर आग नियंत्रणात आली.

आगीची घटना मोकळ्या परिसरात घडली. त्यावेळी कंपनीत १५ ते २० कर्मचारी देखभाल-दुरुस्तीचे काम करत होते. काही जण मैदानात गवत काढत होते. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मोकळ्या जागेतील टाकीला आग कशी लागली, याची कारणमिंमासा कंपनी व्यवस्थापनासह अग्निशमन दलाकडून केली जात आहे.

17:01 (IST) 20 Dec 2024

पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल

संबंधित आरोपी हे नरवीर तानाजी वाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटारीमध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 20 Dec 2024

भक्तिगीते, युगुलगीते, लावणी, चित्रपटगीतांनी रंगली सुरांची मैफिल

मराठीसह हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटक्षेत्रातील आघाडीची सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल जादुई आवाजाची मोहिनी चिंचवडकरांनी अनुभवली.

सविस्तर वाचा...

16:53 (IST) 20 Dec 2024

देशभरातील घरांच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ ? चटई क्षेत्र निर्देशांकावर १८ टक्के जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव

मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली वा देशातील इतर महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे कठिण होत आहे.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 20 Dec 2024
"इथं भलत्या मुजोरीला स्थान नाही, मग तो कोणीही असो", कल्याण मारहाण प्रकरणावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

कल्याण येथे झालेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. यादरम्यान या प्रकरणावर शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी "मुजोरीला लगाम, हेच आमचं काम" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये श्रीकांत शिंदे म्हणाले की, "कल्याणमधील उच्चभ्रू वस्तीत किरकोळ वादावरुन झालेल्या भांडणानंतर अखिलेश शुक्ला नामक कुण्या सरकारी अधिकाऱ्याने मुजोरी केल्याचे दिसून येते. असली मस्तवाल मुजोरी महायुतीच्या सरकारने ना कधी खपवून घेतली, ना कधी घेईल. सदरील अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन झालेलं आहेच. त्याच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाईसुध्दा होईलच. पण भविष्यात कोणीही असा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही तासात जबाब मिळेल, याची खात्री बाळगा. कुणी काय कपडे घालावेत, काय खावे आणि कुठे राहावे, याचे सर्वाधिकार परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या संविधानाने दिले आहेत. संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. इथं भलत्या मुजोरीला स्थान नाही. मग तो कोणीही असो."

https://platform.twitter.com/widgets.js

16:20 (IST) 20 Dec 2024

कराड : पाटण कॉलनीतील बहुचर्चित मैदानावरील आरक्षण बदलणार, डॉ. अतुल भोसलेंच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश

कराड : माजी मुख्यमंत्री आणि ‘कराड दक्षिण’चे मावळते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या कराडच्या पाटण कॉलनीतील बहुचर्चित मैदानावरील वाहनतळाचे आरक्षण बदलणार असून, त्याठिकाणी ‘बेघरांसाठी घरे’ असा बदल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ‘कराड दक्षिण’चे नवनिर्वाचित भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आवर्जून हा विषय हाताळत पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना दिलासा दिला आहे.

सदर आरक्षित जागेवरील ‘वाहनतळ’ हे (पार्किंग) आरक्षण बदलून त्याठिकाणी ‘बेघरांसाठी घरे’ असा बदल करण्याची मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी केली. त्याची दखल घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

पाटण कॉलनीत पन्नास वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच या परिसराची पाहणी केली. झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले. नगरपालिकेकडे मालकी असलेल्या या जागेचे ‘खुली जागा’ असे नामाभिदान बदलून वाहनतळ करण्याचा फेरबदल राज्याच्या नगरविकास विभागाने ४ एप्रिल २०१२ रोजी केल्याचे डॉ. भोसले म्हणाले.

16:04 (IST) 20 Dec 2024

कल्याणमध्ये आजमेरा सोसायटीतील रहिवाशांची मंत्रालयीन अधिकाऱ्याच्या अटकेसाठी निदर्शने

शुक्ला यांनी मराठी लोकांचा अपमान केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी सोसायटीतील रहिवासी गुरूवारी रात्री सोसायटीच्या आवारात जमून त्यांनी शुक्ला यांच्या निषेधार्थ निदर्शने केली.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 20 Dec 2024

ठाण्यात अवैधरित्या राहत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; भाड्याने घर देणाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल

ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने भारत-बांगलादेश सीमा अवैधरित्या ओलांडून ठाण्यातील कल्याण परिसरात राहत असलेल्या सबुज सनोवर शेख आणि बिश्ती सबुज शेख या दोघांना अटक केली आहे. या दोघांवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पासपोर्ट कायदा आणि फॉरेनर्स कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पती-पत्नी दोघेही बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले असल्याची माहिती असतानाही घर भाड्याने देणाऱ्या घरमालक मुस्तफा मुन्शी याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलीसांनी दिली आहे.

15:14 (IST) 20 Dec 2024

शबरी महामंडळातर्फे आज सरपंच परिषद

नाशिक - येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, क्वाॅलिटी सिटी नाशिक आणि बिरसा मुंडा सरपंच परिषद नाशिक यांच्या सहकार्याने शुक्रवारी आदिवासी विकास महामंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे.

15:13 (IST) 20 Dec 2024
सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस - दोघांना अटक

नाशिक - शहरात चोरीची दुचाकी आणि चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा दोनच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत चार लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पाथर्डी फाटा येथील एस. के. लॉन्ससमोरून सचिन पाटील (२८, रा.आनंदवली), अनिल चिंतामणी (२९, रा. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. दुचाकीवरून अंबड, सातपूर, आडगाव, उपनगर परिसरात सोनसाखळ्यांची चोरी केल्याचे त्यांनी मान्य केले. पोलिसांनी दोघा संशयितांकडून सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे आणि अंबड पोलीस ठाणेकडील दुचाकी चोरीचा एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले.

15:03 (IST) 20 Dec 2024

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न

मुंबई : बदलापूर येथील बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबियांना का ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने गुरुवारी उपस्थित केला.

सविस्तर वाचा....

15:02 (IST) 20 Dec 2024

नाशिक शहरात १५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरे, आजपासून शेल्टर २०२४ गृह प्रदर्शन

नाशिक – क्रेडाई नाशिक मेट्रोच्यावतीने २० ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित शेल्टर – २०२४ या गृह प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी त्याचे उद्घाटन होणार आहे.

सविस्तर वाचा....

15:02 (IST) 20 Dec 2024

पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ

पुणे : नाश्ता आणि पोहे हे समीकरण जुळलेले आहे. दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाली असल्याने सामान्यांचा नाश्ता महाग झाला आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

सविस्तर वाचा...

15:01 (IST) 20 Dec 2024

“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…

नागपूर: राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत शहरी नक्षलवादी होते, तर त्यावेळी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काय करत होते? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. या मुद्यावर आणखी महत्वाच्या दिलेल्या महितीबाबत आपण जाणून घेऊ या.

सविस्तर वाचा....

15:00 (IST) 20 Dec 2024

१८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?

चंद्रपूर : पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील १८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हे कर्मचारी राज्य शासनाचे असल्याचा निर्वाळा दिला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.

सविस्तर वाचा....

15:00 (IST) 20 Dec 2024

नरेंद्र मोदी आम्हाला वेळ देणार नाही, असे का म्हणाले रोहित पवार ?

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू, परंतु ते भेटणार नसल्याचे वक्तव्य केले. विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.

सविस्तर वाचा..

assembly winter session 2024

<br />नागपूर महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024

Story img Loader