Maharashtra Assembly Winter Session Live Updates, Day 5 : सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. आज बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीची चर्चा अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चेची ठरत आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तरात काही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे ते आता पुढे काय भूमिका घेणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे. यासह राज्यातील राजकीय आणि हिवाळी अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Assembly Winter Session Live Updates, Day 5
कराड : पाटण कॉलनीतील बहुचर्चित मैदानावरील आरक्षण बदलणार, डॉ. अतुल भोसलेंच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश
कराड : माजी मुख्यमंत्री आणि ‘कराड दक्षिण’चे मावळते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या कराडच्या पाटण कॉलनीतील बहुचर्चित मैदानावरील वाहनतळाचे आरक्षण बदलणार असून, त्याठिकाणी ‘बेघरांसाठी घरे’ असा बदल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ‘कराड दक्षिण’चे नवनिर्वाचित भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आवर्जून हा विषय हाताळत पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना दिलासा दिला आहे.
सदर आरक्षित जागेवरील ‘वाहनतळ’ हे (पार्किंग) आरक्षण बदलून त्याठिकाणी ‘बेघरांसाठी घरे’ असा बदल करण्याची मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी केली. त्याची दखल घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
पाटण कॉलनीत पन्नास वर्षांहून अधिक काळ अनेक लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच या परिसराची पाहणी केली. झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश नगरपालिका प्रशासनाला दिले. नगरपालिकेकडे मालकी असलेल्या या जागेचे ‘खुली जागा’ असे नामाभिदान बदलून वाहनतळ करण्याचा फेरबदल राज्याच्या नगरविकास विभागाने ४ एप्रिल २०१२ रोजी केल्याचे डॉ. भोसले म्हणाले.
कल्याणमध्ये आजमेरा सोसायटीतील रहिवाशांची मंत्रालयीन अधिकाऱ्याच्या अटकेसाठी निदर्शने
शुक्ला यांनी मराठी लोकांचा अपमान केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी सोसायटीतील रहिवासी गुरूवारी रात्री सोसायटीच्या आवारात जमून त्यांनी शुक्ला यांच्या निषेधार्थ निदर्शने केली.
ठाण्यात अवैधरित्या राहत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; भाड्याने घर देणाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल
ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने भारत-बांगलादेश सीमा अवैधरित्या ओलांडून ठाण्यातील कल्याण परिसरात राहत असलेल्या सबुज सनोवर शेख आणि बिश्ती सबुज शेख या दोघांना अटक केली आहे. या दोघांवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पासपोर्ट कायदा आणि फॉरेनर्स कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पती-पत्नी दोघेही बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले असल्याची माहिती असतानाही घर भाड्याने देणाऱ्या घरमालक मुस्तफा मुन्शी याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलीसांनी दिली आहे.
शबरी महामंडळातर्फे आज सरपंच परिषद
नाशिक – येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, क्वाॅलिटी सिटी नाशिक आणि बिरसा मुंडा सरपंच परिषद नाशिक यांच्या सहकार्याने शुक्रवारी आदिवासी विकास महामंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक – शहरात चोरीची दुचाकी आणि चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा दोनच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत चार लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पाथर्डी फाटा येथील एस. के. लॉन्ससमोरून सचिन पाटील (२८, रा.आनंदवली), अनिल चिंतामणी (२९, रा. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. दुचाकीवरून अंबड, सातपूर, आडगाव, उपनगर परिसरात सोनसाखळ्यांची चोरी केल्याचे त्यांनी मान्य केले. पोलिसांनी दोघा संशयितांकडून सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे आणि अंबड पोलीस ठाणेकडील दुचाकी चोरीचा एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
मुंबई : बदलापूर येथील बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबियांना का ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने गुरुवारी उपस्थित केला.
नाशिक शहरात १५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरे, आजपासून शेल्टर २०२४ गृह प्रदर्शन
नाशिक – क्रेडाई नाशिक मेट्रोच्यावतीने २० ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित शेल्टर – २०२४ या गृह प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी त्याचे उद्घाटन होणार आहे.
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
पुणे : नाश्ता आणि पोहे हे समीकरण जुळलेले आहे. दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाली असल्याने सामान्यांचा नाश्ता महाग झाला आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…
नागपूर: राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत शहरी नक्षलवादी होते, तर त्यावेळी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काय करत होते? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. या मुद्यावर आणखी महत्वाच्या दिलेल्या महितीबाबत आपण जाणून घेऊ या.
१८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?
चंद्रपूर : पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील १८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने हे कर्मचारी राज्य शासनाचे असल्याचा निर्वाळा दिला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.
नरेंद्र मोदी आम्हाला वेळ देणार नाही, असे का म्हणाले रोहित पवार ?
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू, परंतु ते भेटणार नसल्याचे वक्तव्य केले. विधान भवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.
सविस्तर वाचा..
अमरावती : वाहनाच्या धडकेत पुन्हा एका बिबट्याचा बळी
अमरावती : राष्ट्रीय महामार्गाच्या रहाटगाव ते बडनेरा या नवीन बायपास मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बळी जाण्याची ही गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी गुरुवारी केलेल्या निदर्शनांनंतर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शहा यांच्या समर्थानात आंदोलन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत ठिय्या दिला.
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
नागपूर : मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात ‘महायुतीची महागुंडशा’ही असे फलक घेत निदर्शने केले.
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अनेक शहरी नक्षलवादीशी संबंधित संघटना सहभागी झाल्याचा दावा होता. त्यावर प्रत्युत्तर देत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लक्ष केले आहे. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊ या.
रत्नागिरी जिल्ह्यातील २५० कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी होणार, जिल्हा प्रशासनाकडून प्रदूषण मंडळासह एमआयडीसी सुरक्षा विभागाला आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात असणा-या कंपन्यांमध्ये वारंवार अपघात होत असल्याने आता जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा प्रशासनाने औद्योगिक वसाहतीमधील सुमारे २५० विविध प्रक्रिया कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याचे आदेश प्रदूषण मंडळासह एमआयडीसीच्या सुरक्षा विभागाला दिले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रकल्पासह लोटे एमआयडीसीतील रासायनिक प्रक्रिया कंपनीतील गॅस गळती आणि रत्नागिरी एमआयडीसीमध्ये मंगळवारी रात्री दुर्गधीच्या प्रकारानंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने औद्योगिक वसाहतीमधील सुमारे २५० कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याचे आदेश प्रदूषण मंडळासह एमआयडीसीच्या सुरक्षा विभागाला दिले आहेत.
मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातून बस सेवा बंद? बसस्थानक परिसराचे लवकरच काँक्रीटीकरण
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे कॉक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यात सुरू
सातारा: श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव समाधी मंदिर परिसरात उत्साहात सुरू आहे. यानिमित्ताने ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक दररोज सकाळी काढण्यात येत आहे.
“… तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू”, वडेट्टीवारांचे विधान; काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून भाजपवर निशाणा
नागपूर : विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्याकडून यासंदर्भात सकारात्मक संकेत आल्यास पुढील पाउल टाकू, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
अमरावती : रोडगे, गूळ भाकर, आलू-वांग्याची भाजी; बहिरमच्या प्रसिद्ध यात्रेची परंपरा व इतिहास…
अमरावती : संपूर्ण राज्यात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्हणून ओळख असलेल्या बहिरमच्या यात्रेला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. शेकडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बहिरम येथे विधिवत पूजा करण्यात आली.
रत्नागिरी : जयगड येथील पाच कंपन्यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे – भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत
वायूगळती झाल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामस्थ, मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.
डोंबिवलीत सहा बांगलादेशी नागरिकांना अटक
मानपाडा पोलिसांना आपल्या पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
पनवेल : तळोजातील दीपक फर्टीलायझर कंपनीत चोरांना रंगेहाथ पकडले
१ लाख ३५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दीपक कंपनीच्या व्यवस्थापनाने चोरट्यांना तळोजा पोलीसांच्या स्वाधीन केले.
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
अलिबाग : पुण्याहून रायगडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी बसला ताम्हणी घाटात अपघात झाला. चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने बस उलटली यात पाच जण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.
महापालिकेची कामगिरी १८ दिवसात केल्या २७ मिळकती सील!
पुणे : महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. मिळकतकराची वसुली करण्यासाठी मिळकतकर थकविणाऱ्यांच्या दारात महापालिका बँड वाजवून त्यांच्या मालमत्ता सील करीत आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला पकडले, पिस्तुलासह काडतूस जप्त
पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला आंबेगाव (भारती विद्यापीठ) पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक
वसई : नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात असलेल्या एका प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले आहे.
रोहित पवारांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार, म्हणाले….
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसचे परभणी येथील प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेचे रोहित पवार यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहीले की, “कोणत्याही दबावाला बळी न पडता बीडमधील मस्साजोग आणि परभणी या दोन्ही घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याचा, आरोपींना मोक्का लावण्याचा आणि IG पातळीवर SIT मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले मनापासून आभार! या चौकशीतून पिडीत कुटुंबांना न्याय मिळेल, ही अपेक्षा! या चौकशीमध्ये सरकारमधील कुणाचाही हस्तक्षेप होता कामा नये. राजकारण बाजूला ठेवून खंडणी आणि खून या दोन्ही प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक केली तरच या प्रकरणाची चौकशी वेळेत होईल. तसंच परभणीच्या घटनेचीही सखोल चौकशी करताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि खऱ्या अर्थाने अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल याकडंही लक्ष द्यावं, ही विनंती!”
कोणत्याही दबावाला बळी न पडता बीडमधील मस्साजोग आणि परभणी या दोन्ही घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याचा, आरोपींना मोक्का लावण्याचा आणि IG पातळीवर SIT मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले मनापासून आभार! या चौकशीतून पिडीत कुटुंबांना न्याय…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 20, 2024
हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर होणार का ?
गोंदिया:- धानाची शेती कसताना लागवड खर्च भरून निघत नाही. धान उत्पादक या मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने राज्य शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला जात होता. २०२२- २३ या वर्षात प्रोत्साहनपर रक्कम म्हणून हेक्टरी १५ हजार रुपये देण्यात आले होते. तर २०२३- २४ या वर्षात प्रोत्साहनपर रक्कम म्हणून हेक्टरी २० हजार रुपये देण्यात आले. यावर्षीच्या हंगामात धानाला २५ हजार रुपये हेक्टरी बोनस द्यावा, अशी धान उत्पादकांची मागणी आहे.
धारावीचा पुनर्विकास अदानी समुहाकडूनच, प्रकल्प अदानी समुहाला देण्याच्या सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समुहातर्फेच केला जाणार आहे. हा प्रकल्प अदानी समुदाला देण्याच्या सरकारला निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. सौदी अरेबियास्थित सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या कंपनीने प्रकल्प अदानी समुहाला देण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.