Opposition Walk Out in Maharashtra Assembly: महाराष्ट्रात एकीकडे सत्ताधारी पक्षांमध्ये कुणाला मंत्रीपद मिळालं, कुणाला नाकारलं याची चर्चा असताना दुसरीकडे विरोधी पक्षांकडून बीड आणि परभणीमधील घटनांवरून सरकारला जाब विचारला जात आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या दोन्ही घटनांवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, ही मागणी मान्य न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या दोन्ही घटनांवरून देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, विरोधी पक्षांचे नेते या दोन्ही ठिकाणचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले.

“एवढं पाशवी बहुमत लोकांचा जीव घ्यायला दिलंय का?”

विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बीड व परभणीतील घटनांवर सविस्तर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विरोधकांची ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सरकारचा निषेध केला. तसेच, आज दिवसभराच्या कामकाजावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला. “सत्ताधाऱ्यांना एवढं पाशवी बहुमत लोकांचा जीव घेण्यासाठी दिलंय का? गुंडांना संरक्षण देण्यासाठी दिलंय का? या दोन्ही मागण्या आम्ही केल्या, तर आमचा आवाज दाबला जातो. चर्चेचीही परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध केला आहे. आम्ही सगळे बीड आणि परभणीला जाणार. मोर्चाही काढणार. या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला आहे”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Mumbai Highcourt
Mumbai Highcourt : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

“परभणीत संविधान शिल्पाचा झालेला अवमान कोणताही संविधानप्रेमी सहन करू शकत नाही. त्याचा उद्रेक तिथे झाला. यानंतर अतिरिक्त पोलीसदल मागवून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. घराघरातून दलित व्यक्तींना, महिलांना, मुलांना मारहाण करण्यात आली, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. एक स्पष्ट आहे, तिथे पोलिसांनी आंदोलक सूर्यवंशीला कोठडीत बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचं त्याच्या शरीरावरील जखमांवरून दिसून येत आहे. पोलीस यासाठी जबाबदार नाहीयेत का? त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणं चूक आहे का?”, असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केले.

“…याचा अर्थ दाल में कुछ काला है”

“आम्ही अधिवेशनात याची मागणी करतोय, मग सरकार यावर का घाबरतेय. तातडीनं चर्चेसाठी तयार का होत नाहीये? याचा अर्थ दाल में कुछ काला है. सरकार दलितांवरील अत्याचारांकडे डोळे झाकून दुर्लक्ष करू इच्छित आहे. कुणी मरो, वाचो याचं काहीही देणंघेणं सरकारला नाहीये”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

Beed: “बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

“एवढं भीषण कृत्य कधीही पाहिलं नाही”

“बीडमध्ये एक गुंड सरकार व मंत्र्यांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो. तिथे सरपंचाला ज्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्याची हत्या करण्यात आली, एवढं भीषण कृत्य मी कधी पाहिलं नाही. लायटरनं त्याचे डोळे जाळले गेले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं. हे काय चाललंय महाराष्ट्रात? हे काय बघतोय आपण?” असा जाब वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला.

Story img Loader