Mumbai News Update, 04 September 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुन्हा एकदा आंदोलन उभं राहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या सात दिवसांपासून त्यांनी उपोषणही पुकारले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना त्यांनी सराकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, या मराठा आंदोलनासाठी अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अनेक राजकीय नेते मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आहेत. तर, आज राज ठाकरेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. दरम्यान, आज (४ सप्टेंबर) छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Live News Maharashtra : मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि राज्यभरातील इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
गोंदिया: गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हे सरकार संकेत देतंय की याद राखा न्याय हक्कांसाठी कोणी आंदोलन करत असेल तर आम्ही डोकी फोडून टाकू. हे सरकार आपल्याला पाहिजे. बारसूच्या गरिब जनतेवरही बेछुट लाठीमार केला. माता भगिनींना लाठीमार केला. वारकऱ्यांवर लाठीमार. हम करे सो कायदा सुरू आहे - उद्धव ठाकरे
नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.
यवतमाळ: शेतातील कामे आटोपून बैलगाडीने घरी परतताना अचानक वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारात सोमवारी दुपारी घडली. सुवर्णा संजय कांबळे, (३२) असे मृत महिलेचे नाव आहे.
येथील पूर्व भागातील गांधीनगर भागातील सह दुय्यम निबंधक चार आणि कल्याण मधील सह दुय्यम निबंधक दोन कार्यालयात काही दलालांच्या माध्यमातून बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे दस्त नोंदणीकरण सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
जालन्यात शुक्रवारी मराठा आंदोलनावेळी हिंसाचारा झाला. पोलिसांनी लाठीमार केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. परंतु, लाठीमार का झाला हा प्रश्न अद्यापही अन्नुतरीत आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यावर आरोप करत आहेत, गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. आधी कोणावर आरोप करायचे ते ठरवा. मराठा आंदोलकांर लाठीमार करण्याचे आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. तेही राज्यकर्ते होते, अशाप्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात का, दिले जातात का? असा प्रतिप्रश्न शिंदेंनी विचारला.
“शासन आपल्या दारी” उपक्रमाव्दारे सरकार लोकांपर्यंत जाण्याचा दावा करीत आहे तर उध्दव ठाकरे यांनी " शासन आपल्या दारी, सरकार थापा मारते लय भारी " अशी टीका केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कांद्री येथे घर पडून बाप- लेकीचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा
नाशिक: पाण्याच्या टाकीत पडल्याने मनमाड येथे तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मनमाड येथे संकलेचा शोरुम परिसराजवळ घरांचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी संतोष श्रीराम यांचा मुलगा शिवांशु हा खेळत होता. खेळताना तो पाण्याच्या टाकीत पडला. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
तुम्ही जीआर घेऊन या, तुमच्या हातानेच उपोषण सोडतो, असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना दिले
समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय जाहीर करणार, अर्जुन खोतकर यांची मनोज जरांगे पाटलांना ग्वाही
मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथगृह सुरू झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, समितीचे इतर सदस्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, इतर मागस बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. उदयनराजे भोसले, आ. आशिष शेलार, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विशेष सल्लागार समितीचे सदस्य नरेंद्र पाटील, योगेश कदम, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, मंत्रालयीन सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
धुळे: आगामी काळात होणार्या संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या, नागरीकरण याचा विचार करुन पालिकेने १० वर्षापूर्वी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर या वाढत्या वस्तीचा येणारा भार विचारात घेऊन रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्याचे काही प्रकल्प प्रस्तावित केले होते. सविस्तर वाचा…
नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्यालगत असलेल्या विभागांना अजून ही प्रदूषित वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्यालगत असलेल्या विभागांना अजून ही प्रदूषित वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या, नागरीकरण याचा विचार करुन पालिकेने १० वर्षापूर्वी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर या वाढत्या वस्तीचा येणारा भार विचारात घेऊन रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्याचे काही प्रकल्प प्रस्तावित केले होते. सविस्तर वाचा…
खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी माणगाव आणि म्हसळा येथे अल्पसंस्ख्यांक समाजाचे मेळावे घेतले. महायुतीत सहभागी झाल्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सर्वधर्मसमभावाचा विचार सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…
लोकसभा निवडणुकीला आठ महिन्याचा अवधी असताना भाजप-काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू झाली असून काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत असतानाच विट्याचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला आहे.
नवी मुंबई: जुगार खेळतात असा आरोप करून गुडलकच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या व्यक्ती विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जालन्यातील अंतरावील सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सरोटीत दाखल झाले असून त्यांनी मनोज सरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाशिक: श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात एकिकडे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असताना ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठीही भाविक येत आहेत.
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावादात अडकलेल्या १४ गावातील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या २३८७ हे. जमीनीपैकी ४२९ हे. जमिनीचे महसूल मोजणीचे काम भूमी अभिलेख कार्यालयाकडून झाले असून उर्वरित मोजणीचे काम सुरू असतानाच तेलंगणा सरकारने त्या १४ गावातील अनु. जमातीच्या ६१७ शेतकऱ्यांना वैयक्तिक वनहक्काचे पट्टे वाटप केले.
गडचिरोली : सव्वा लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर ते फरार झाले.
गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका - राज ठाकरे
परत या लोकांच्या नादी लागू नका - राज ठाकरे
गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका व्हा काठीचे बोळे लक्षात ठेवा - राज ठाकरे
मी विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसावल्या, बुलेट मारायला लावल्या त्या सर्वांना मराठवाड्यात बंदी करुन टाका - राज ठाकरे
नागपूर : मान्सूनला अनुकूल वातावरण राज्यात तयार झाले आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
नागपूर : नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमुळे सरकारने सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आणखी १०० गाड्यावर परिणाम होणार आहे.
पुणे: भरधाव टेम्पोने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावरील शिरुर परिसरात घडली. अपघातात तिघेजण जखमी झाले.
नागपूर: एखादा व्यवसाय असलेल्या कुटुंबात जन्म झाला त्या व्यवसायाच्या नावावर त्याची जात, धर्म ठरवला जात आहे. अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे.
Live News Maharashtra : मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि राज्यभरातील इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर