Mumbai News Update, 04 September 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुन्हा एकदा आंदोलन उभं राहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या सात दिवसांपासून त्यांनी उपोषणही पुकारले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना त्यांनी सराकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, या मराठा आंदोलनासाठी अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अनेक राजकीय नेते मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आहेत. तर, आज राज ठाकरेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. दरम्यान, आज (४ सप्टेंबर) छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Live News Maharashtra : मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि राज्यभरातील इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर 

17:57 (IST) 4 Sep 2023
पुणे: संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध गुन्हा; परवानगी नाकारल्यानंतरही सभा

पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

17:45 (IST) 4 Sep 2023
धक्कादायक! गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन संपविले जीवन

गोंदिया: गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

17:44 (IST) 4 Sep 2023
“…तर आम्ही डोकी फोडून टाकू”, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

हे सरकार संकेत देतंय की याद राखा न्याय हक्कांसाठी कोणी आंदोलन करत असेल तर आम्ही डोकी फोडून टाकू. हे सरकार आपल्याला पाहिजे. बारसूच्या गरिब जनतेवरही बेछुट लाठीमार केला. माता भगिनींना लाठीमार केला. वारकऱ्यांवर लाठीमार. हम करे सो कायदा सुरू आहे – उद्धव ठाकरे

17:37 (IST) 4 Sep 2023
दोन महिलांचा विहिरीत पडून मृत्यू

नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

17:09 (IST) 4 Sep 2023
बैलगाडीवर वीज कोसळली; महिला ठार, दोघे जखमी

यवतमाळ: शेतातील कामे आटोपून बैलगाडीने घरी परतताना अचानक वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मारेगाव तालुक्यातील गोरज शिवारात सोमवारी दुपारी घडली. सुवर्णा संजय कांबळे, (३२) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

16:36 (IST) 4 Sep 2023
डोंबिवली, कल्याणमध्ये बेकायदा बांधकामांची दस्त नोंदणी सुरू, सह दुय्यम निबंधक दोन आणि चारमधील प्रकार

येथील पूर्व भागातील गांधीनगर भागातील सह दुय्यम निबंधक चार आणि कल्याण मधील सह दुय्यम निबंधक दोन कार्यालयात काही दलालांच्या माध्यमातून बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे दस्त नोंदणीकरण सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

16:21 (IST) 4 Sep 2023
मराठा आंदोलकांवर आम्ही लाठीमार करू शकतो का?, मुख्यमंत्र्यांचा प्रतिप्रश्न

जालन्यात शुक्रवारी मराठा आंदोलनावेळी हिंसाचारा झाला. पोलिसांनी लाठीमार केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. परंतु, लाठीमार का झाला हा प्रश्न अद्यापही अन्नुतरीत आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यावर आरोप करत आहेत, गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. आधी कोणावर आरोप करायचे ते ठरवा. मराठा आंदोलकांर लाठीमार करण्याचे आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. तेही राज्यकर्ते होते, अशाप्रकारचे आदेश दिले जाऊ शकतात का, दिले जातात का? असा प्रतिप्रश्न शिंदेंनी विचारला.

14:53 (IST) 4 Sep 2023
घर दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू, ना मदत, ना सांत्वन,शासन ‘ त्यांच्या’ दारी गेलेच नाही

“शासन आपल्या दारी”  उपक्रमाव्दारे सरकार लोकांपर्यंत जाण्याचा दावा करीत आहे तर उध्दव ठाकरे यांनी ” शासन आपल्या दारी, सरकार थापा मारते लय भारी ” अशी टीका केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कांद्री येथे घर पडून बाप- लेकीचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा

14:47 (IST) 4 Sep 2023
पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू

नाशिक: पाण्याच्या टाकीत पडल्याने मनमाड येथे तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मनमाड येथे संकलेचा शोरुम परिसराजवळ घरांचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी संतोष श्रीराम यांचा मुलगा शिवांशु हा खेळत होता. खेळताना तो पाण्याच्या टाकीत पडला. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

14:24 (IST) 4 Sep 2023
तुम्ही जीआर घेऊन या, तुमच्या हातानेच उपोषण सोडतो – जरांगे पाटील

तुम्ही जीआर घेऊन या, तुमच्या हातानेच उपोषण सोडतो, असं आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना दिले

14:09 (IST) 4 Sep 2023

समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय जाहीर करणार, अर्जुन खोतकर यांची मनोज जरांगे पाटलांना ग्वाही

14:09 (IST) 4 Sep 2023
मराठा आरक्षणप्रकरणी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू

मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथगृह सुरू झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, समितीचे इतर सदस्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, इतर मागस बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. उदयनराजे भोसले, आ. आशिष शेलार, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विशेष सल्लागार समितीचे सदस्य नरेंद्र पाटील, योगेश कदम, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, मंत्रालयीन सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

14:06 (IST) 4 Sep 2023
संसदेत मराठा आरक्षणावर भाजपचे खासदार गप्प; रोहित पवार यांची टीका

धुळे: आगामी काळात होणार्‍या संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.

सविस्तर वाचा…

14:04 (IST) 4 Sep 2023
कल्याण-डोंबिवलीतील विना परवाना बाजार भरविणाऱ्या मालकांना नोटिसा, खासगी बाजार चालकांमध्ये खळबळ

कल्याण-डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या, नागरीकरण याचा विचार करुन पालिकेने १० वर्षापूर्वी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर या वाढत्या वस्तीचा येणारा भार विचारात घेऊन रेल्वे स्थानक परिसराचा विकास करण्याचे काही प्रकल्प प्रस्तावित केले होते. सविस्तर वाचा…

13:33 (IST) 4 Sep 2023
वाशी-कोपरखैरणेच्या वेशीवर प्रदूषण कायम; शनिवारी रात्री वाशी-कोपरीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ वर

नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्यालगत असलेल्या विभागांना अजून ही प्रदूषित वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 4 Sep 2023

13:01 (IST) 4 Sep 2023
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर विकासाचे प्रकल्प राजकीय इच्छाशक्ती अभावी बारगळले?

12:28 (IST) 4 Sep 2023
भाजपशी युतीनंतर अल्पसंख्याक समाजाची समजूत काढण्याचा तटकरेंचा मतदारसंघात प्रयत्न

खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी माणगाव आणि म्हसळा येथे अल्पसंस्ख्यांक समाजाचे मेळावे घेतले. महायुतीत सहभागी झाल्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सर्वधर्मसमभावाचा विचार सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…

12:27 (IST) 4 Sep 2023
पैलवानाच्या तयारीने सांगलीत लढत तिरंगी होणार ?

लोकसभा निवडणुकीला आठ महिन्याचा अवधी असताना भाजप-काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू झाली असून काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत असतानाच विट्याचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला आहे.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 4 Sep 2023
कथित पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल… आणि हे गुडलक काय आहे? वाचा नेमके काय प्रकरण आहे…

नवी मुंबई: जुगार खेळतात असा आरोप करून गुडलकच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या व्यक्ती विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 4 Sep 2023
मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

जालन्यातील अंतरावील सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवलं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुद्द्यावरून त्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सरोटीत दाखल झाले असून त्यांनी मनोज सरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 4 Sep 2023
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी

नाशिक: श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात एकिकडे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असताना ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठीही भाविक येत आहेत.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 4 Sep 2023
चंद्रपूर: तेलंगणाची दादागिरी;महाराष्ट्राच्या जमिनीचे पट्टे वाटप, काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावादात अडकलेल्या १४ गावातील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या २३८७ हे. जमीनीपैकी ४२९ हे. जमिनीचे महसूल मोजणीचे काम भूमी अभिलेख कार्यालयाकडून झाले असून उर्वरित मोजणीचे काम सुरू असतानाच तेलंगणा सरकारने त्या  १४ गावातील अनु. जमातीच्या ६१७ शेतकऱ्यांना वैयक्तिक वनहक्काचे पट्टे वाटप केले.

सविस्तर वाचा…

11:29 (IST) 4 Sep 2023
गडचिरोली: भ्रष्टाचारप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित, तरीही तीन विभागाचा प्रभार

गडचिरोली : सव्वा लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर ते फरार झाले.

वाचा सविस्तर…

11:24 (IST) 4 Sep 2023

गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका – राज ठाकरे

परत या लोकांच्या नादी लागू नका – राज ठाकरे

गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका व्हा काठीचे बोळे लक्षात ठेवा – राज ठाकरे

11:24 (IST) 4 Sep 2023
“ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसावल्या…”, राज ठाकरेंचा आंदोलकांना सल्ला

मी विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसावल्या, बुलेट मारायला लावल्या त्या सर्वांना मराठवाड्यात बंदी करुन टाका – राज ठाकरे

11:23 (IST) 4 Sep 2023
मान्सूनला वातावरण अनुकूल! विदर्भ, मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’

नागपूर : मान्सूनला अनुकूल वातावरण राज्यात तयार झाले आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.

वाचा सविस्तर…

11:22 (IST) 4 Sep 2023
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ तारखेपासून २०० रेल्वेगाड्या रद्द होणार

नागपूर : नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमुळे सरकारने सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आणखी १०० गाड्यावर परिणाम होणार आहे.

वाचा सविस्तर…

11:20 (IST) 4 Sep 2023
पुणे – नगर रस्त्यावर शिरुरजवळ टेम्पोची मोटारीला धडक; दोन महिलांसह तिघांचा मृत्यू, तीन जण जखमी

पुणे: भरधाव टेम्पोने मोटारीला धडक दिल्याने मोटारीतील दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावरील शिरुर परिसरात घडली. अपघातात तिघेजण जखमी झाले.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 4 Sep 2023
अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

नागपूर: एखादा व्यवसाय असलेल्या कुटुंबात जन्म झाला त्या व्यवसायाच्या नावावर त्याची जात, धर्म ठरवला जात आहे. अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह