Mumbai News Update, 04 September 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुन्हा एकदा आंदोलन उभं राहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या सात दिवसांपासून त्यांनी उपोषणही पुकारले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना त्यांनी सराकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, या मराठा आंदोलनासाठी अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अनेक राजकीय नेते मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आहेत. तर, आज राज ठाकरेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. दरम्यान, आज (४ सप्टेंबर) छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Live Updates

Live News Maharashtra : मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि राज्यभरातील इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर 

11:19 (IST) 4 Sep 2023
कोकणातील प्रवास आता आणखी होणार वेगवान, कशेडी बोगद्याची एक मार्गिका आठ दिवसात सुरु होणार

अलिबाग: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटातील प्रवास आता करावा लागणार नाही.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 4 Sep 2023
धक्कादायक! राज्यात तीन वर्षात ११ लाख लोकांना भटक्या श्वानांचा चावा

नागपूर: महाराष्ट्रात मागील तीन वर्षात (२०२० ते २०२२) भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या तब्बल ११ लाख ९ हजार ७६० घटनांची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 4 Sep 2023
जी-२० च्या प्रदर्शनात भांडारकर संस्थेतील ‘ऋग्वेद’

नवी दिल्लीतील भारतमंडपम् येथे ‘जी-२०’च्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेप्रसंगी ‘कल्चरल कॉरिडॉर’ या प्रदर्शनात भारतातर्फे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील ऋग्वेदाचे हस्तलिखित ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात प्रत्येक देशाकडून राष्ट्रीय महत्त्वाच्या दोन वस्तू मांडण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा

10:50 (IST) 4 Sep 2023
गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात राडा

गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा

10:18 (IST) 4 Sep 2023
“सत्ताधाऱ्यांनी…”, मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका; ओबीसी आरक्षणाचाही केला उल्लेख!

मराठा आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशीही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी मागणी सरकारकडून केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असा सल्ला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. शिवशक्ती परिक्रमेच्यानिमित्ताने त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

वाचा सविस्तर

10:17 (IST) 4 Sep 2023
आता तृतीयपंथी फोडणार दहीहंडी, देशातील पहिल्या चार गोविंदा पथकांची पुणे-पिंपरीत स्थापना

तृतीयपंथी यांचा सहभाग असलेले १०० जणांचे तब्बल चार पथके हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आले असून त्यांनी कसुन सरावालाही सुरुवात केली आहे.

वाचा सविस्तर…

10:12 (IST) 4 Sep 2023
मराठा आंदोलकांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता राज ठाकरे आज जालन्याच्या दिशेने निघाले आहेत. जालन्यात जात असताना मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवून त्यांना निवेदन सुपूर्द केले आहे.

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Live News Maharashtra : मराठा समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि राज्यभरातील इतर घडामोडी वाचा एका क्लिकवर