राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाष्य केले आहे. बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन- जयंत पाटील
“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे,” असे जयंत पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती – सुप्रिया सुळे
“ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. तुम्ही तो शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडीओ पाहा, तुम्हाला त्यात माणूसकी दिसते आहे का? पत्रकार असो, समाजकारणी असो पण सर्वात आधी आपण माणसं आहोत. हे चुकीचं आहे, क्रुरता आहे हे तुम्हाला वाटत नाही का? कुणाचंही सरकार असो उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनक आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन काढून टाकावे यासाठी काँग्रेसतर्फे राजभवानसमोर मूक आंदोलन करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खेरीमधील हिंसाचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. शेतकऱ्यांना चिरडणं म्हणजे सत्तेची मस्ती आहे, बाकी काही नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सविस्तर वृत्त…
ज्याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत,नेपाळमध्ये तस्करी केल्याचे आरोप आहेत, अशा केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी कायद्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले असे नाना पटोले यांनी म्हटले आहेत. सविस्तर वृत्त…
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीमधील व्यवहार राहणार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असं बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. बाजार समिती बंद राहणार असल्याने लाखो लाखो रुपयांचा व्यवहार ठप्प आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लखीमपूरमधील हत्याकांडाच्या विरोधातील महाराष्ट्र बंदला विरोध करणाऱ्या भाजपावर सडकून टीका केली आहे. या बंदला विरोध म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे, असंही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सविस्तर वृत्त…
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे देखील या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. सविस्तर वृत्त…
The Congress-Shiv Sena-NCP alliance has called for a bandh in Maharashtra today to protest the Lakhimpur Kheri violence that claimed the lives of 8 people including 4 farmers
— ANI (@ANI) October 11, 2021
Visuals from different areas of Aurangabad city pic.twitter.com/B0vp8Ucj2q
मुंबईच्या विविध भागात सोमवारी मध्यरात्री ते सकाळी आठच्या दरम्यान बेस्टच्या आठ बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
Maharashtra: BEST says eight of its buses were vandalised in different areas of Mumbai between midnight and 8 am today; seeks police protection
— ANI (@ANI) October 11, 2021
बंद आणि बंद..बंद करा हे बंद..!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 11, 2021
ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित"बंदसम्राटांचा" पुन्हा आज इतिहास आठवा…
मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले
युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले
1/3
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र युनिटमधील ७०० जवानांसह स्ट्राइकिंग साठा देखील मोक्याच्या ठिकाणी तैनात केला जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात सरकारने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.https://t.co/2jrmCKNbWi#MaharashtraBandh #Pune #LakhimpurKheriViolence pic.twitter.com/h9ywrUVtQW
— LoksattaLive (@LoksattaLive) October 11, 2021
Maharashtra: Maha Vikas Aghadi that comprises of Congress, Shiv Sena, and NCP has called for a statewide bandh today in protest against the Lakhimpur Kheri violence that claimed the lives of 8 people including 4 farmers
— ANI (@ANI) October 11, 2021
Visuals from Bandra Reclamation area in Mumbai pic.twitter.com/57yOFikZLv
सोलापूरमध्ये युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीने संगम येथे आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी युवासैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून बंदला सुरुवात केली. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा निषेध करत राजीनामा द्यावा व भारतीय शेतकरी जिंदाबाद अश्या घोषणा देण्यात आल्या.