HSC Result Date 2025 Maharashtra Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात सुरु असून १५ मे पूर्वी किंवा १५ मे च्या दिवशी बारावीचा निकाल लागू शकतो अशी शक्यता आहे. यंदा उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन लवकर पूर्ण झाल्याने निकाल १५ मे किंवा त्या आधी लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २१ मे या दिवशी निकाल लागला होता.
बारावीची परीक्षा मार्च महिन्यांत संपली
राज्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली. आता प्रतीक्षा आहे ती निकालांची. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण संस्था, विदेशाती विद्यापीठांमध्ये अर्ज करत आहेत. अर्ज करणाऱ्या मुलांना निकाल वेळेत मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे निकाल प्रक्रिया वेळेत आणि तातडीने पूर्ण करण्यावर आमचा भर आहे असं शिक्षण मंडळातील अधिकाऱ्याने म्हटलं आहे. दरम्यान आपण जाणून घेऊ बारावीचा निकाल कसा तपासायचा?
महाराष्ट्र बोर्ड HSC अर्थात १२वी निकाल २०२५ केव्हा लागणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून HSC २०२५ चा निकाल मे २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात, १५ मे २०२५ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकालाची संभाव्य वेळ: दुपारी १:०० वाजता
अधिकृत संकेतस्थळे:
mahresult.nic.in
mahahsscboard.in
निकाल कसा पाहायचा?
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – mahresult.nic.in
“HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा
आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका
“Submit” वर क्लिक करा
निकाल स्क्रीनवर दिसेल – त्याची PDF डाउनलोड करा
SMS द्वारे निकाल पाहण्याची प्रक्रिया काय?
MHSSC असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. दरम्यान दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळते. वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे निकाल लवकर समजत नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त होतात. पण आता वेबसाइटवर वाढणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात फारशी अडचण जाणवणार नसल्याची चर्चा आहे. वेबसाईटवर नियमित लोड टेस्टिंगद्वारे तपासण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच, आयटी विभागाला सात दिवसांत तपशीलवार सुरक्षा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आले आहेत.