Mumbai-Maharashtra News in Marathi : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलंच अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून या मुद्द्यांवर सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी सज्ज आहेत.
Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
अश्लील चित्रफित निर्मितीच्या आरोपांतून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या राज जामिनावर बाहेर आहे. वाचा सविस्तर बातमी…
सधन स्थिती असल्याने प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात येणारा लाभ घेतला असून, त्यात पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक शेतकरी बारामती तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले असून त्यांच्याकडून या योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईतील ‘हॉटेल द ललीत’मध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले असून त्यांचा स्फोट होऊ नये यासाठी पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी वलसाड येथून एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. धमकी आल्यानंतर हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…
हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने वातावरण तापलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी इतर धर्मांतील तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिष देऊन कोणीही कोणाचं धर्मांतरण होत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अहमदनगरमध्ये झालेल्या प्रकरणात पोलीस अधिकारी सानप यांना निलंबित केलं असल्याचंही ते म्हणाले. सविस्तर वाचा
शैक्षणिक वर्ष जून मध्ये सुरू होऊन आता तीन महिने झाले तरी कल्याण डोंबिवली पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, दप्तरे व इतर शालेय साहित्याचे शिक्षण विभागाने वाटप न केल्याने पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) निवृत्त अधिकारी महिलेच्या मुलाच्या नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्तिकर भरणा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या पॅनकार्डचा गैरवापर करुन आरोपी प्राप्तिकर भरणा केला. मुलाचे करपात्र उत्पन्न नसताना आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे भरणा करुन शासन तसेच प्राप्तिकर विभागाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या कार विभागातील (कार प्लांट) कामगारांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून तीव्र असंतोष आहे. वेतनवाढ करारातील तरतुदी आणि जेवण व नाष्ट्याच्या वेळेतील बदल, यासह इतर कारणास्तव कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या चहा, नाश्ता आणि जेवणावर दोन हजारांहून अधिक कामगारांनी बहिष्कार घातला आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तुकोबाराय हे सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे विचार अखंडितपणे अंमलात राहतील, यात शंका नाही असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले आहेत. ते आज (बुधवार) देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. वाचा सविस्तर बातमी…
पुण्याच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे काम गेल्या पावणे दोन वर्षांपासून ठप्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या जागेवरच विमानतळ होणार असल्याची घोषणा करूनही नव्या सरकारकडून अद्याप प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर बातमी…
करोना केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकरसह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाचा सविस्तर बातमी…
५० खोके, एकदम ओके अशा घोषणा विरोधकांकडून आल्यानंतर आता त्याला सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शरद पवारांचं नाव आलेल्या लवासा प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे. पावसाळी अधिवेशनात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्ताधाऱ्यांनी लवासाचे खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या.
महाराष्ट्र विधानसभा (संग्रहीत छायाचित्र)
Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर