Mumbai News Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आहे. तर या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही अद्याप फरार आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केले असून या पथकाच्या चौकशीत काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील जुने सहकारी शरद पवार आणि छगन भुजबळ हे आज पुण्यातील चाकण येथे एकत्र येणार आहेत. येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी हे नेते एका मंचावर येणार आहेत. यादरम्यान महायुतीमध्ये मंत्रिपद न मिळल्याने नाराज असलेल्या भुजबळांची शरद पवारांबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates- महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

19:48 (IST) 3 Jan 2025

शेतकरी हितासाठी वेगवेगळे उपक्रम, कृषी संवाद कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे प्रतिपादन

नाशिक : शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्यात येणाऱ्या आडकाठी दूर केल्या, उपग्रहाव्दारे छायाचित्र घेऊन नुकसानीची माहिती घेण्याची व्यवस्था केली, यासारख्या कृषिविषयक निर्णयांची माहिती देत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा…

18:54 (IST) 3 Jan 2025

शिवाजीनगर घुसमटलेलेच

मुंबई : मुंबईच्या हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तरीही मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारीही शिवाजीनगर येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे.

सविस्तर वाचा…

18:44 (IST) 3 Jan 2025
“मातोश्रींनी केलेले विधान त्यांच्या कुटुंबासाठी”, शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर तटकरेंची प्रतिक्रिया

“अजित पवार यांच्या आईने केलेले विधान त्यांच्या कुटुंबासाठी आहे. जनतेने आम्हाला निर्णय घेण्यासाठी निवडले आहे. आम्ही महायुतीचा भाग आहोत आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात पक्ष पुढे जाणार आहे “, असे विधान राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
18:06 (IST) 3 Jan 2025

मी दिव्यांगांशी बेईमानी करणार नाही…बच्चू कडूंनी अखेर सरकारी पदाचा राजीनामा…

अमरावती : दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासाठी मंत्रालयाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. पदावर राहून हे काम होणार, ही शक्यता मला मावळताना दिसत आहे. दिव्यांगांसोबत बेईमानी करणे मला शक्य होणार नाही, असे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

सविस्तर वाचा

17:40 (IST) 3 Jan 2025

“दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही”, बच्चू कडूंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल एकनाथजी शिंदे यांचे मनापासून आभार… परंतु अद्याप पर्यत दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही. पदावर राहुन हे काम होणार अशी शक्यत मला मावळता दिसत आहे. दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही. करीता माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तो मंजुर करुन सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा सुध्दा काढुन टाकावी व कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

17:38 (IST) 3 Jan 2025

कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ

मुंबई : नोव्हेंबर २०२४ च्या अखेरीस मध्यम आकारातील सरंगा ८०० रुपयांना मिळत होता. डिसेंबरअखेरीस समुद्रातील दृश्यमानता घटल्याने मासळी उत्पन्नात घट होऊन सरंग्याच्या दरात अडीच पट वाढ होऊन तो दोन हजार रुपयांवर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा….

17:25 (IST) 3 Jan 2025

मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच, श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंबरनाथ – नावात आईचे नाव समाविष्ट करणे, मालमत्तांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र गावठाण हद्दीतील मालमत्ता नोंद मोहिमेत महिला वर्ग वंचित राहिल्याची बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

16:40 (IST) 3 Jan 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद

चंद्रपूर: मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर अधिकाऱ्यांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणू नये तसेच पोलीस दलाकडून  मानवंदना देऊ नये, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तशा सूचना  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहे.

सविस्तर वाचा

16:33 (IST) 3 Jan 2025

कारागृहात ई-मुलाखतीची सुविधा! कैद्याना कुटुंबाशी साधता येईल संवाद

बुलढाणा : कारागृहात खिचपत पडलेल्या एकाकी कैद्याना आता आपल्या कुटुंबाशी ई-संवाद साधता येणार आहे… होय! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ई मुलाखत ‘ असे नामकरण करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 3 Jan 2025

कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे फलाट क्रमांक १२ आणि १३ ची पायाभूत कामे केली जात आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्स्प्रेसला फटका बसला आहे. या गाड्या ३१ जानेवारीपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील.

सविस्तर वाचा…

16:13 (IST) 3 Jan 2025

VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांची शुक्रवारी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना, पत्रकारांच्या गराड्यात शिरून एकजण मोबाईलमध्ये परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करू लागला. ही बाब आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करताच, तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील कर्मचारी असल्याचे समोर आले.

सविस्तर वाचा….

16:09 (IST) 3 Jan 2025

सिंधुदुर्गातील राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे भासवून, वैद्यकीय प्रवेशासाठी ४५ लाखांची फसणूक

मुंबई : सिंधुदुर्गातील महाविद्यालयाचे विश्वस्त असल्याचा दावा करून महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःला सिंधुदुर्गातील मोठ्या नेत्याचे नातेवाईक असल्याचे भासवले होते.

सविस्तर वाचा…

15:51 (IST) 3 Jan 2025

कल्याण-डोंबिवलीत रात्री झाडांच्या आडोशाने बसणाऱ्या ८१ गांजा व्यसनींवर कारवाई

कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा चंग बांधलेल्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक पोलिसांना रात्रीच्या वेळेत झाडे, झुडपे, खाडी किनारा भागात गांजा, मद्य सेवन, काही गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा….

15:46 (IST) 3 Jan 2025

‘तीन मुले जन्माला घाला’, सरसंघचालकांनी असा सल्ला दिल्यानंतर आता कौटुंबिक प्रबोधन बैठकीतील भाषणाकडे लक्ष

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रत्येक जोडप्याने तीन मुले जन्माला घालावीत हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी प्रत्येक जोडप्याला ३ अपत्य जन्माला घालण्याच सल्ला दिला होता.

सविस्तर वाचा

15:41 (IST) 3 Jan 2025

अजित पवार पालकमंत्री झाले तर जिल्हा सुतासारखा सरळ करतील- सुरेश धस

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारावं अशी मागणी होत आहे. यावर भाजपाचे आमदार सुरश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आमची पहिली पसंती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे ते नाही झाले तर आम्हाला अजित दादा झाले तरी चालतील. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर जसं ते (मुख्यमंत्री) सुतासारखा सरळ करतील, अजीत पवार सुद्धा करतील. अजित पवारांच्या हाताखाली मी काम केलं आहे. वेड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाहीत. ते स्पष्ट सांगतात की हे भंगार आहे हे करू नका”.

15:28 (IST) 3 Jan 2025

ईरइ धरण परिसरात अतिशय दुर्मिळ अल्बिनो गढवाल बदक

चंद्रपूर:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या ईरई धरण परिसरात अतिशय दुर्मिळ असलेला दुर्मिळ अल्बिनो गढवाल बदक आढळला आहे. पक्षी मित्र तथा अभ्यासकांनी हा बदक पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 3 Jan 2025

शेअर मार्केटमधील २५ वर्ष अनुभव असलेल्या डोंबिवलीकराची ३१ लाखाची फसवणूक

डोंबिवली – शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा २५ वर्षाचा अनुभव असलेल्या डोंबिवलीतील संत नामदेव पथ परिसरात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची दोन जणांनी ऑनलाईन माध्यमातून ३१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा….

14:54 (IST) 3 Jan 2025

वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीला डबल डेकर डब्यांचा ४ जानेवारी अखेरचा दिवस

पालघर : वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीच्या डबल डेकर च्या आयुर्मान संपुष्टात येत असल्याने तसेच या पद्धतीचे डबल डेकर डबे उपलब्ध नसल्याने या गाडीला ५ जानेवारी २०२५ पासून इतर एक्सप्रेस, शटल व पॅसेंजर गाडी प्रमाणे डबे जोडण्या चा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने अंतिम केला आहे.

सविस्तर वाचा…

14:49 (IST) 3 Jan 2025

वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा

पुणे : वैमनस्यातून सराइतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. याप्रकरणी सराइतांसह साथीदारांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय हरिसिंग परदेशी (वय ४४), जय अनिल परदेशी (वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

14:46 (IST) 3 Jan 2025

महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…

गोंदिया: राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा थंडी परतली आहे. आज शुक्रवार ३ जानेवारीला विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे करण्यात आली असून ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

14:32 (IST) 3 Jan 2025
मुंबईतील हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड, लोकल वाहतूक विस्कळीत

मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाड झाल्याने विस्कळीत झाली आहे. दुपारच्या सुमारास तुर्भे आणि कोपरखैराणे साथनाकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. याचा परिणाम म्हणून लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना अडचणींचा सामना करवा लागत आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

14:16 (IST) 3 Jan 2025
अमृत महोत्सवी वर्षात आनंदवनला आर्थिक मदतीची गरज

चंद्रपूर:  दिवंगत बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या परिश्रमतून उभे राहिलेले आनंदवन तथा महारोगी सेवा समिती अमृत महोत्सवी वर्षात आर्थिक अडचणीत सापडली आहे. संस्थेने यावर्षी ७५ वर्ष पूर्ण केली.  पाच वर्षापासून शासनाकडे संस्थेचे चार कोटी रुपये थकीत असल्याने संस्थेला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 

सविस्तर वाचा

14:13 (IST) 3 Jan 2025

हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती

पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या कोंडीबाबत सातत्याने आयटीयन्स तक्रार करीत असतात. आता ही कोंडी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

वाचा सविस्तर…

14:12 (IST) 3 Jan 2025

धनकवडीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : धनकवडीत कोयते उगारुन टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

14:12 (IST) 3 Jan 2025

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना

पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वारासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव परिसरातील संजय पार्क रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा सविस्तर…

14:04 (IST) 3 Jan 2025

अमृत महोत्सवी वर्षात,आनंदवनला आर्थिक मदतीची गरज

13:47 (IST) 3 Jan 2025

शहरी नक्षलवाद प्रकरण : प्रा. आनंद तेलतुंबडे यांची दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : शहरी नक्षलवादाशी संबंधित प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्यानंतर तेलतुंबडे यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

सविस्तर वाचा…

13:45 (IST) 3 Jan 2025

चंद्रपूर : पीएचडीसाठीची गोंडवाना विद्यापीठाची जाचक अधिसूचना रद्द

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील पीएचडी सेलने लागू केलेल्या जाचक अधिसूचनांमुळे विद्यार्थी चांगलेच त्रासले होते. हा विषय कुलगुरू, पीएचडी सेल प्रमुख यांच्याकडे सातत्याने मांडण्यात आला. शेवटी १ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाव्दारे आचार्य पदवीकरीता निर्गमित होणारे अधिनियम, अधिसूचना जशाच्या तशा गोंडवाना विद्यापीठाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा….

13:19 (IST) 3 Jan 2025

नाशिक : म्हाडाकडून नव्याने ५५५ सदनिकांचे वितरण

नाशिक – भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांच्या चौकशीचा विषय ऐरणीवर आल्यापासून म्हाडाला आतापर्यंत शहरातील १४८५ सदनिका उपलब्ध झाल्या. यातील १५७ प्रकल्पातील १३२८ सदनिका वितरित केल्या गेल्या असून लवकरच आणखी नऊ प्रकल्पातील ५५५ सदनिका अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा….

13:18 (IST) 3 Jan 2025

अमरावती : धक्कादायक! भांडणानंतर पत्नीला घरी बोलावून केली हत्या…

अमरावती : भांडण झाल्यानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीला घरी बोलावून तिची पतीने हत्या केल्याची घटना शहरातील यशोदा नगर परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर पतीने शयनकक्षात पत्नीचा मृतदेह लपवून ठेवला होता.यशोदा नगर परिसरातील भोवते लेआऊटमध्ये राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा राहत्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसून आला.

सविस्तर वाचा

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह