Mumbai News Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आहे. तर या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही अद्याप फरार आहेत. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केले असून या पथकाच्या चौकशीत काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील जुने सहकारी शरद पवार आणि छगन भुजबळ हे आज पुण्यातील चाकण येथे एकत्र येणार आहेत. येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी हे नेते एका मंचावर येणार आहेत. यादरम्यान महायुतीमध्ये मंत्रिपद न मिळल्याने नाराज असलेल्या भुजबळांची शरद पवारांबरोबर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates- महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

13:18 (IST) 3 Jan 2025

शहरबात (अ) राजकीय : स्वान्तसुखाय’ पुण्यातील राजकीय पक्ष

लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर प्रचाराचे दोन अंक संपले. आता महापालिका निवडणुकीचा तिसरा अंक झाला की, पाच वर्षांसाठी प्रचारावर पडदा पडणार आहे. तिसऱ्या अंकासाठी पुण्यातील राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षरूपी नाटक कंपनी आणि त्यातील राजकीय कलाकार नव्या वर्षात पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आश्वासनांचे सोंग आणणार आहेत.

सविस्तर वाचा

13:17 (IST) 3 Jan 2025

एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी

पुणे : राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी पदस्थापना देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 3 Jan 2025

लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील नव्या सुधारणेशी संबंधित जनहित याचिका निकाली काढताना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.

सविस्तर वाचा….

13:01 (IST) 3 Jan 2025

वर्धा नदीच्या काठावर मौर्यकालीन अवशेष…

चंद्रपूर: जिल्ह्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शेतात मौर्य ते सातवाहन काळखंडातील अवशेष सापडत आहेत. त्यात टेराकोटाचे मणी, घरगुती वापरातील भांड्यांचे तुकडे, दगडी हत्यार, तांब्याच्या मूर्ती आदींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा….

12:57 (IST) 3 Jan 2025
सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारेंनी लुटला ‘फुगडी’ खेळण्याचा आनंद; पाहा VIDEO

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबरोबर ‘फुगडी’ खेळळ्याचा आनंद लुटला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

#watch | Pune, Maharashtra: NCP-SCP MP Supriya Sule performed the traditional dance ‘Phugadi’ with Shiv Sena-UBT leader Sushama Andhare in Pune on the occasion of Savitribai Phule Jayanti pic.twitter.com/nJx1wCUMYJ
— ANI (@ANI) January 3, 2025
12:54 (IST) 3 Jan 2025

प्राप्तीकर विभागातून सेवा निवृत्त झालेल्या महिलेला डिजिटल अरेस्ट, २५ लाख रुपयांची सायबर फसवणूक

मुंबई : दिवसेंदिवस डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सायबर फसणुकीचे प्रकार वाढत आहेत. प्राप्तीकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ७४ वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्या बँक खात्यातील २५ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला.

वाचा सविस्तर…

12:08 (IST) 3 Jan 2025

नवी मुंबईतील थरारक घटना, वर्दळीच्या ठिकाणी ५ राऊंड फायर करून दुक्कल फरार

नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा स्टेशननजीक दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला. एकूण पाच गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. 

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 3 Jan 2025
“मोदींनी केलेलं कौतुक आमच्यासाठी फार मोठं”, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, “आमच्यासाठी हे फार मोठे कौतुक आहे. कारण गडचिरोलीचे जे काही परिवर्तन करत आहोत, त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तसेच केंद्र सरकार, केंद्रीय दल यांची मदत मिळत आहे आणि याबरोबर जिल्हा प्रशासन आणि आपली सी६० यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे. जे परिवर्तन लोकांनी पाहिलं याचं कौतुक पंतप्रधान मोदींनी केलं, खरंतर याचं सगळं श्रेय पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांना देतो.”

pic.twitter.com/eRtOEhFNUd
— NEWSDAILY MEDIA GROUP (@NEWSDAILY123) January 2, 2025
11:55 (IST) 3 Jan 2025

मोदींनी केलेलं कौतुक आमच्यासाठी फार मोठं; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

दुर्गम आणि नक्षलवादग्रस्त भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी हे फार मोठे कौतुक आहे. कारण गडचिरोलीचे जे काही परिवर्तन करत आहोत, त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तसेच केंद्र सरकार, केंद्रीय दल यांची मदत मिळत आहे आणि याबरोबर जिल्हा प्रशासन आणि आपली सी६० यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे. जे परिवर्तन लोकांनी पाहिलं याचं कौतुक पंतप्रधान मोदींनी केलं, खरंतर याचं सगळं श्रेय पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांना देतो.

https://platform.twitter.com/widgets.js

11:36 (IST) 3 Jan 2025

मराठी तरुणाला माफी मागायला लावणाऱ्यांचा मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ, पोलिसांकडून गुन्हा दाखल

ठाणे : मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याने त्याला कान पकडून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. माफी मागण्यास लावणाऱ्या २० ते २५ जणांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

11:36 (IST) 3 Jan 2025

मुंब्रा मराठी माणसाची कान पकडून माफी प्रकरण, अविनाश जाधव म्हणाले आता भोगा…

ठाणे : मुंब्रा येथे फळ विक्रेत्याला एका तरुणाने मराठी बोल असे म्हटल्यानंतर तरुणालाच माफी मागायला लावण्यात आली आहे. या प्रकारवरून आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक पोस्ट केली आहे.

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 3 Jan 2025

गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार

नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया केली जात आहे.

वाचा सविस्तर…

11:34 (IST) 3 Jan 2025

लोकप्रतिनिधी नसल्याने अंदाजपत्रक लांबणीवर? कुठे घडला हा प्रकार

पुणे : महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीत महापालिकेचे अंदाजपत्रक सादर न करण्याची तत्कालीन आयुक्तांनी सुरू केलेली ‘परंपरा’ यंदाच्या वर्षी देखील कायम राहण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

11:33 (IST) 3 Jan 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ लाख वृक्ष; महापालिकेचा दावा

पिंपरी : शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात आली आहे. या गणनेत शहरात ३२ लाख १६ हजार ७९९ वृक्ष असल्याचे दिसून आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

वाचा सविस्तर…

11:32 (IST) 3 Jan 2025

राज्यातील या शहराला मिळेना अतिरिक्त आयुक्त!

पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळात तीन मंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, अशी पदे भूषविणाऱ्या पुण्यातील राजकीय पक्षांच्या मंडळींना पुणे महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यासाठी अधिकारी मिळत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची तीनपैकी दोन पदे रिक्त आहेत.

वाचा सविस्तर…

11:32 (IST) 3 Jan 2025

इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

आळंदी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळातच आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधी इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र आहे. महायुती सरकारने इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याच आश्वासन दिलं होतं.

वाचा सविस्तर…

11:31 (IST) 3 Jan 2025

…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका

पिंपरी : महापालिकेत सात गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून, या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हद्दवाढ होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला मुळशी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा देण्याची मागणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

वाचा सविस्तर…

11:30 (IST) 3 Jan 2025

मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट

मुंबई : मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट झाली. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा गारवा अनुभवता येणार आहे. सांताक्रूझ येथे शुक्रवारी १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

सविस्तर वाचा….

11:20 (IST) 3 Jan 2025

म्हाडाच्या विजेत्यांना मोठा दिलासा, ताबापत्र मिळाल्यापासूनच सेवाशुल्क घेणार; थकबाकीचा आर्थिक भार कमी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून अर्थात तात्पुरते देकार पत्र वितरीत झाल्यापासून सेवाशुल्क आकारले जाते. मात्र काही विजेत्यांकडून घराचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास विलंब होतो आणि त्यांच्यावर सेवाशुल्कापोटी थकबाकीचा भार पडतो. पण आता मात्र….

सविस्तर वाचा….

11:19 (IST) 3 Jan 2025
…म्हणून फडणवीसींचे कौतुक केले; संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने सामना वृत्तपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. याबद्दल बोलताना सरकारने चांगले काम केल्याने आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले असल्याचे मत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र हे आमचे राज्य आहे आणि येथे नक्षलवादाने प्रभावित असलेले गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात नक्षलवादी मुख्यमंत्र्यांच्या समोर आत्मसमर्पण करून संविधानाचा मार्ग निवडत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो.

https://platform.twitter.com/widgets.js
11:11 (IST) 3 Jan 2025

अकोला : आठ दिवस रेल्वे फाटक बंद, नागरिकांना मनस्ताप

अकोला : शहरातील न्यू तापडिया नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटक रेल्वे मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आठ दिवस बंद ठेवण्यात आले. त्यामुळे हजारो नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

सविस्तर वाचा….

11:01 (IST) 3 Jan 2025

ठाणे महापालिकेची सुमारे चार हजार अनधिकृत फलकांवर कारवाई, तर ७६ गुन्हे दाखल

ठाणे : ठाणे महापालिकेने डिसेंबर महिन्यात ३ हजार ८९१ अनधिकृत फलकांवर कारवाई केली आहे. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल केले. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा…

10:47 (IST) 3 Jan 2025

चंद्रपूर : अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिल्यास पालकांनाच होणार दंड

चंद्रपूर : रस्ते अपघातात २०२४ या मावळत्या वर्षात जिल्ह्यात जवळपास दोनशे जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच या अपघातांच्या घटनांमधून अल्पवयीन शाळकरी मुले विनापरवाना दुचाकी चालवीत असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा….

10:47 (IST) 3 Jan 2025

नभोमंडपात ७ जानेवारीला सात घटनांचा अनोखा संगम

अकोला : नभोमंडपात ग्रह-तारकांचा अनोखा मेळा एकत्र बघता येणार आहे. विशेष म्हणजे आगामी ७ जानेवारीला सुमारे सात घटनांचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

सविस्तर वाचा….

10:46 (IST) 3 Jan 2025

मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांना मराठी येते काय? शासनाकडून उत्तर देण्यात टाळाटाळ

नागपूर : मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये “मराठी भाषा विभाग” असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आला होता. या विभागात कार्यरत अधिकाऱ्यांच्या भाषा, साहित्य, संस्कृती विषयक शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा….

10:37 (IST) 3 Jan 2025
“राज्यात वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के FDI अवघ्या ६ महिन्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. त्यांनी “महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यात…”, असं कॅप्शन देत ही आकडेवारी मांडली आहे.

पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले आहेत की, “पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो… माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो”.

फडणवीसांनी मांडलेली आकडेवारी

2020-21 : 1,19,734 कोटी

2021-22 : 1,14,964 कोटी

2022-23 : 1,18,422 कोटी

2023-24 : 1,25,101 कोटी

2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह