Mumbai News Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून त्यांचे कथित साथीदार वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी पालकमंत्री ठरलेले नाहीत. तिन्ही पक्षांतील अंतर्गत रस्सीखेचमुळे पालकंत्रीपदावर शिक्कामोर्तब होत नसल्याचं समजते आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : ताज्या घडामोडी वाचा

19:39 (IST) 6 Jan 2025

नागपूर : एचएमपीव्ही विषाणूचा धोका वाढला! उच्च न्यायालयाला हस्तक्षेप…

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर २०२० मध्ये उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती.

सविस्तर वाचा…

19:39 (IST) 6 Jan 2025

नाशिक : उघड्या रोहित्रामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू

आई कामात गुंतल्यानंतर आफ्फान बाहेर खेळायला गेला. खेळताना त्याचा हात उघड्या रोहित्राला लागला.

सविस्तर वाचा…

18:53 (IST) 6 Jan 2025

Marathi News Live Updates : ‘धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करत आहेत’ जरांगे पाटील

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राज्यात जातीय तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार. लोकांच्या पोरांना मारण्यासाठी धनंजय मुंडे यांनी टोळ्या पाळल्या आहेत. मी जे बोललो ते गुंडांना बोललो आहे, कुठल्या एका जातीला बोललो नाही. या प्रकरणात मराठा, ओबीसी संबंध येतो कुठे? अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.

18:37 (IST) 6 Jan 2025

नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची घटना उघडकीस आली होती.

सविस्तर वाचा…

18:37 (IST) 6 Jan 2025

Video : “मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे; ते विकले…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडीओने खळबळ

वेळोवेळी विरोधकांबद्दल वादग्रस्त विधाने करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत राहतात. आता त्यांनी मतदारांविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

सविस्तर वाचा…

18:11 (IST) 6 Jan 2025

आरोग्य विभागाच्या विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये २ लाख ७७ हजार बालकांवर उपचार

मुंबई : अर्भक व नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांतील विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये (एसएनसीयू) सन २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण २,७७,११४ बालकांना दाखल करून मोफत यशस्वी उपचार करण्यात आले.

सविस्तर वाचा….

17:12 (IST) 6 Jan 2025

नागपूर : यार्ड रि-मॉडेलिंगसाठी दिल्ली मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द

गोधनी रेल्वे स्थानकावरील कामांमुळे ६ आणि ८ जानेवारीला विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द आणि काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा…

17:09 (IST) 6 Jan 2025

“नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्यासाठी…” ; अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतल्याचे मुंडे म्हणाले. मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे आलो होतो. माझ्याकडं जी अन्न व नागरी पुरवाठ्याच्या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्याबाबत संबंध विभागाचा आढावा अजित पवार यांना दिला आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाले.

17:02 (IST) 6 Jan 2025

भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…

ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे, मृतावस्थेत आढळलेला वाघ तीन तुकड्यात दिसून आला.

सविस्तर वाचा…

16:58 (IST) 6 Jan 2025

सर्वच जुन्या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी संरचनात्मक सर्वेक्षण

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. मात्र ही यादी तयार करण्याआधी इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वच जुन्या इमारतींचे टप्प्याटप्प्याने संरचनात्मक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या यादीनुसारच यापुढे धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाणार आहे.

सविस्तर वाचा….

16:50 (IST) 6 Jan 2025

डोंबिवलीतील ५८ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील सात प्रस्ताव नियमानुकूलसाठी नगररचना विभागात दाखल

कल्याण – डोंबिवलीतील ५८ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील सात इमारतींमधील रहिवाशांनी आपल्या वास्तुविशारदामार्फत पालिकेच्या नगररचना विभागात इमारत नियमानुकूलसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव अर्जाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. आवश्यक अधिकृत कागदपत्रे, या इमारतींची स्थळी पाहणी, इमारतीची जागा या सर्व बाबींचा विचार करून या इमारती नियमानुकूल करण्याचा विचार वरिष्ठांच्या आदेशावरून केला जाईल, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाचे प्रभारी-सहाय्यक संचालक नगररचना सुरेंद्र टेंगळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

सविस्तर वाचा…

16:44 (IST) 6 Jan 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक, समाजमाध्यमांवरून दिली होती मारण्याची धमकी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाजमाध्यांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील असल्याचे समोर आले असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा सविस्तर…

16:39 (IST) 6 Jan 2025

ठाण्यात रिक्षेत विसरलेला दीड लाखांचा ऐवज प्रवाशांना परत

ठाणे – येथील वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर परिसर येथून ठाणे स्थानक परिसरात रिक्षेतून येत असताना, एक प्रवाशी सोन्याची ऐवज आणि रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज असलेली पिशवी ठाणे स्थानकात उतरल्यावर रिक्षेत विसरले. ठाणे वाहतूक विभागाने अवघ्या तीन तासात संबंधित रिक्षेचा शोध घेऊन प्रवाशांना ऐवजासह पिशवी परत केली.

सविस्तर वाचा…

16:27 (IST) 6 Jan 2025

कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई

कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागांत अती वेगाने दुचाकी चालविणाऱ्या, दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करणाऱ्या १५० हून अधिक तरुणांवर गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी रात्रीच्या वेळेत दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा दुचाकीस्वारांनी धसका घेतला आहे.

सविस्तर वाचा….

16:07 (IST) 6 Jan 2025

धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला, बैठक सुरू; मोठा निर्णय होणार?

अजित पवारांच्या मंत्रालयातील दालनात धनंजय मुंडे भेटीला गेले आहेत. या दोन्ही नेत्यांची आता बैठक सुरू असून बीडप्रकरणी या दोन नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे थोड्याच वेळात मोठा निर्णय हाती येण्याची शक्यता आहे.

15:55 (IST) 6 Jan 2025

बल्लारपूरची जमजम पठाण केबीसीच्या हॉट सीटवर…बिग बीच्या प्रश्नाला…

चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड मधील रहिवासी जमजम महमूद पठाण ही सोमवार ६ आणि मंगळवार ७ जानेवारी रोजी कौन बनेगा करोडपती गेम शोच्या हॉट सीटवर दिसणार आहेत. बीग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोरील हॉट सीटवर बसून जमजम पठाण ही उत्तरे देणार आहे.

सविस्तर वाचा…

15:37 (IST) 6 Jan 2025

धक्कादायक! उपराजधानीत अनेक ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये देहव्यापार…

नागपूर : शहरात सुरु असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये ‘सेक्स रॅकेटॅ सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या छापा कारवाईतून उघडकीस आली आहे. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेने घातलेल्या २६ छाप्यात तब्बल १४ ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये देहव्यापार करताना तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. तर नागपुरातील सर्वाधिक नामांकित असलेल्या गंगा स्पामध्ये पोलिसांनी छापा घालून ४ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा…

15:35 (IST) 6 Jan 2025

नववर्षात प्रथमच सोने-चांदीच्या दरात घट… हे आहेत आजचे दर…

नागपूर : नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. या दिवशीपासून सातत्याने नागपूरसह राज्यभरात सोने- चांदीचे दर वाढत असल्याचे चित्र होते. परंतु सोमवारी ६ जानेवारीला मात्र सोने- चांदीच्या दरात प्रथमच घट झाल्याचे दिसत आहे.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 6 Jan 2025

पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार

पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांनी दहशत माजविली असून, पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली. स्टेशन परिसरात आठवडभरात लुटमारीच्या तीन घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सविस्तर वाचा…

15:00 (IST) 6 Jan 2025

स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून महिलेला अटक

स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार प्रीती मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा…

14:31 (IST) 6 Jan 2025

नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या उद्यापासून परीक्षा

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध शिक्षणक्रमांच्या लेखी परीक्षा सात ते २३ जानेवारी या कालावधीत होणार आहेत.

सविस्तर वाचा…

14:13 (IST) 6 Jan 2025

Dharashiv Crime News : शेतात विहिरीतील पाणी देण्यावरून हाणामारी; तिघांचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास काळे कुटुंबातील काका, पुतणे, नणंद यांच्यात विहिरीतील पाणी शेताला देण्यावरून वाद झाला.

सविस्तर वाचा…

14:09 (IST) 6 Jan 2025

Maharashtra News LIVE Updates : “माझ्या सर्व भावना मेल्या”, छगन भुजबळांचं विधान चर्चेत!

तुमच्या भावनांशी खेळलं जातंय का? असा प्रश्न आज छगन भुजबळांना विचारला असता ते म्हणाले, “माझ्या सर्व भावना मेल्या. मला काही बोलायचं नाही.”

13:34 (IST) 6 Jan 2025

कल्याणजवळील शहाड रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर कारवाई, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फलक कमानी, निवारे जमीनदोस्त

कल्याण : कल्याण जवळील शहाड रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर पालिकेच्या अ प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने शुक्रवारी कारवाई केली. या कारवाईत पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करणारे, गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 6 Jan 2025
“मतदार राज्याचे मालक”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मतदार आपल्या मंत्र्यांचे मालक आहेत की नाही माहीत नाही. पण हे मतदार या राज्याचे मालक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने त्यांना मालक बनवलं आहे – छगन भुजबळ

अजित पवार काय म्हणाले होते?

“अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला होता

13:02 (IST) 6 Jan 2025

“एक लाख द्या अन् पाच लाख घ्या,” इन्स्टाग्रामवरील दाव्याने खळबळ

बुलडाणा : एक लाख रुपये द्या अन् त्याबदल्यात पाच लाख रुपयाच्या बनावट नोटा घेऊन जा, असा दावा इन्स्टाग्रामवरून करण्यात आल्याने आणि यावर कळस म्हणजे हे आव्हान करणाऱ्याने बुलढाणा जिल्ह्यातील पत्ता दिल्याने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 6 Jan 2025

सराइताला जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे; आरोपीकडून बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका जप्त

सराइत चोरट्याला जामीन देण्यासाठी लष्कर न्यायालायात बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा प्रकार वानवडी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका अशी बनावट कागदपत्रे जप्त केली. सविस्तर वाचा

11:57 (IST) 6 Jan 2025

जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नायलॉन मांजा विक्रेत्यंना पकडले

संक्रातीतील पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिक, तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने पकडले. सविस्तर वाचा

11:57 (IST) 6 Jan 2025

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती

राज्यात खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी राज्यभरात जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. सविस्तर वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह