Mumbai News Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्येप्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून त्यांचे कथित साथीदार वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी पालकमंत्री ठरलेले नाहीत. तिन्ही पक्षांतील अंतर्गत रस्सीखेचमुळे पालकंत्रीपदावर शिक्कामोर्तब होत नसल्याचं समजते आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : ताज्या घडामोडी वाचा

11:56 (IST) 6 Jan 2025

मुंबई : शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण; बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी

सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’ अखेर पूर्ण होणार आहे.

सविस्तर वाचा

11:55 (IST) 6 Jan 2025

मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच

राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणाला झुकतं माप मिळाल्यामुळे इथला सामान्य माणूस खूष झाला असला तरी यातून या प्रदेशावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच स्पष्ट होत आहेत. सविस्तर वाचा

11:54 (IST) 6 Jan 2025

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीचा वेध घेत बाहेर पडू लागली आहे. काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे तर आणखी काही पदाधिकारी जाण्याच्या मार्गावर आहेत. सविस्तर वाचा

11:54 (IST) 6 Jan 2025

राज्यात ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात

चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, एचएमपीव्हीबाबत दक्षतेसह सर्दी-खोकल्याच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे. सविस्तर वाचा

11:43 (IST) 6 Jan 2025

Maharashtra Live News : धाराशिवमध्ये धक्कादायक घटना, पारधी समाजाच्या २ गटात हाणामारी; चारजणांचा मृत्यू

४ जणांचा मृत्यू, ३ पुरुष एक महिला मृत्यूमुखी

वाशी तालुक्यातील बावी पिडीवरील घटना

शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती

मध्यरात्री रात्री घडली घटना येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल

१० आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात

10:38 (IST) 6 Jan 2025

संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी भिवंडीत आले? भिवंडीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी नेमकं काय सांगितलं?

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे अवघ्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी सुदर्शन घुलेसह तीनजण भिवंडीत आले होते. ज्या लोकांना ते भेटायला गेले होते, त्यांनी आता माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहे. नोकरीच्या शोधात ते भिवंडीत आल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वृत्त येथे वाचा

10:18 (IST) 6 Jan 2025

“धुतल्या तांदळासारखे रहा, अन्यथा मीच…”; अजित पवारांकडून नेत्यांना इशारा

फ्लॅट घेत असताना तुमचे करार वगैरे चोख करा. चेकने व्यवहार करा. जोखमीच्या भानगडीतच पडू नका. नाहीतर दादा जीएसटीने धाड टाकली तर… दादा त्याकरता अर्थमंत्री झालेला नाही. तुम्ही तुमचे कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. आपली गोष्ट धुतल्या तांदळासारखी स्वच्छ पाहिजे. कोणालाही घाबरायचं कारण नाही. नाहीतर फोन करून मीच जीएसटीला सांगेन की याचा बारकाईने तपास करा. सोडूच नको – अजित पवार</p>

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह