Marathi News Updates : राज्यात गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. या हत्येतील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान या प्रकणातील आरोपींचा वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची आक्रमकपणे मागणी करत आहेत.
दुसरीकडे चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक सुरू असून, या विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. आज राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर नागपूरातही या विषाणूचे दोन संशयीत रुग्ण आढळले आहेत. हे दोन रुग्ण ७ आणि १४ वयाची आहेत. भारतातील एकूण प्रकरणे आता ७ पर्यंत वाढली आहेत.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारोह २०२४ सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला. दीक्षान्त समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर व अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो उपस्थित होते.
https://platform.twitter.com/widgets.jsराज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारोह २०२४ सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झाला. pic.twitter.com/sMstj8A8aS
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 7, 2025
दिंडोरी तालुक्यात युवकाची हत्या
नाशिक - दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव येथील युवकाची हत्या झाली. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दिंडोरी तालुक्यातल ननाशी येथे मागील भांडणाचा राग मनात धरत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाची हत्या करण्यात आली. या हत्येची चर्चा थांबत नाही तोच तालुक्यातील गणेशगाव येथे युवकाची हत्या झाली. ज्ञानेश्वर पिंगळ (४०) हा गणेशगावात शेती करतो. सोमवारी रात्री त्याला कोणाचातरी भ्रमणध्वनी आला. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला. परंतु, रात्री घरी परतलाच नाही. मंगळवारी सकाळी शेतातील घरासमोरील चारीत ज्ञानेश्वरचा मृतदेह आढळून आला. याविषयी दिंडोरी पोलिसांना माहिती मिळाल्यावर पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
गणेशोत्सवातील वर्गणी गोळा करणाऱ्या दोघांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी एकाला दोषी ठरवून पाच लाख रुपयांचा दंड, तसेच दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सविस्तर वाचा…
राज्यातील शाळांमध्ये व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह; नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन
राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने १४ ते २१ जानेवारी या कालावधीत उद्योग-व्यवसाय क्षेत्र भेट, माजी विद्यार्थी मार्गदर्शन सत्र, करिअर मार्गदर्शन असे उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा…
बुमराची पाठीची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला मुकण्याचा धोका?
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज बुमरासमोर सफाईदार खेळ करू शकला नाही.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा… भारत-कॅनडा संबंध आता तरी सुधारतील? खलिस्तानवाद्यांना अभय मिळणे थांबेल?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तेथील सत्तारूढ पक्षाच्या प्रमुखपदाचा आणि पर्यायाने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. गेले काही महिने ट्रुडोंना पक्षातूनच प्रखर विरोध होत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री ख्रिस्तिना फ्रीलँड यांनी राजीनामा दिला. सविस्तर वाचा…
‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका सतर्क, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार
ठाणे : एचएमपीव्ही या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतातही आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे.
आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान रूळावर लोखंडी पट्टी ठेऊन घातपाताचा प्रयत्न
मध्य रेल्वेच्या आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी मध्यरात्री अज्ञात इसमाने एक फूट लांंबीची लोखंडी पट्टी रेल्वे रूळावर ठेऊन घातपात करण्याचा प्रयत्न केला.
नवेगावबांधमध्ये पर्यटकांसाठी सूसज्ज निवास व्यवस्था ; या आहेत सुविधा
गोंदिया : विदर्भातील गोंदिया जिल्ह्यांमध्ये राज्य पर्यटन विकास महामंडळाने सूसज्ज असे ज्ञपर्यटक उभारले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जानेवारी रोजी मुंबईतून आभासी पद्धतीने त्याचे उद्घाटन केले. पर्यटक निवासातील सुविधा नवेगावबांध या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरिता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून २१ कोटीच्या निधीतून पर्यटक निवास बांधले आहे.
दूध व कांदा दरवाढीसाठी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांचे आंदोलन
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी बारामतीतील भिगवण चौकात, कांदा आणि दूधाचे दर वाढवावेत अशी मागणी करत आंदोलन केली. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
ठाणे : महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वी अकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतलेला असतानाही विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील इमारती आणि गृहसंकुलांना जिल्हा प्रशासनाकडून अकृषिक कर भरण्यासंबंधीच्या नोटीसा पाठविण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
“मरणारा शेतकरी हिंदू नाही का?”, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक; अमरावतीत मोर्चा
अमरावती : पश्चिम विदर्भात वर्षभरात १ हजार १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना या प्रश्नावर सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे. राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे.
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात एका दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आली.
अपंगांना ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग सुविधा केंव्हा मिळणार?
नागपूर : ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा नसल्याने अपंग व्यक्तींना तिकीट खिडकीवर रांगेत लागून तिकीट खरेदी करावी लागतेय त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी रोखणारे तुम्ही कोण- शिवेंद्रसिंहराजे
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज आणि लहानग्या शंभुराजांना औरंगजेब आग्र्याच्या कैदेत रोखू शकला नाही. आज साडेतीनशे वर्षे उलटून गेली तरी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दलचे प्रेम प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेले आहे.
महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामण नायगाव उड्डाणपुलाखाली मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ट्रक बंद पडला होता. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटर लांब इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबई व अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पैशांच्या पावसापोटी ३६ लाखांची फसवणूक, म्हसवडमध्ये दोन भोंदूबाबांविरुद्ध तक्रार
सातारा : हवेतून पैशांचा पाऊस पाडून त्याचे ३६ कोटी रुपये करून देतो, अशी बतावणी करून दोन भोंदूबाबांनी पाच जणांना ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार यांनी दिली.
आयआयटी, आयसर संशोधनाचे केंद्रबिंदू, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांची माहिती
मुंबई : देशामध्ये विद्यापीठ, महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक संशोधनाला चालना मिळावी यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने ‘पेअर’ उपक्रमांतर्गत ‘हब ॲण्ड स्पोक’ प्रकल्प हाती घेतला आहे.
"दीड कोटी कुटुंबांना भाजपाचे सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट", चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
"दीड कोटी कुटुंबांना भाजपाचे सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट", चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती "महाराष्ट्रात, दीड कोटी कुटुंबांना प्राथमिक सदस्य बनविण्याचे भारतीय जनता पार्टीचे उद्दिष्ट आहे. ज्यांना पंतप्रधान मोदी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले जाण्याची इच्छा आहे, त्यांना भारतीय जनता पार्टी यासाठी प्रोत्साहित करणार आहे", अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली आहे.
तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या; मलकापूर शहर हादरले
बुलढाणा : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेले मलकापूर शहर आज धक्कादायक घटनेने हादरले! मलकापूर परिसरात एका तृतीयपंथीयाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून या हत्येचा उलगडा करण्याचे आणि मारेकऱ्याला जेरबंद करण्याचे आव्हान मलकापूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
संत कबीरनगर झोपडपट्टीविरोधात जनहित याचिका
नाशिक : पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित केलेल्या व महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टी विरोधात सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना पकडले; सर्वाधिक बांगलादेशी भोसरीमध्ये!
पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हटलं जातं. या शहरात आणि परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांमधून विविध धर्माची आणि जातीची लोक शहरात वसलेली आहेत. अशातच घुसखोर बांगादेशीच प्रमाण वाढलं आहे.
डोंबिवलीत वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
डोंबिवली : काही दिवसापूर्वी डोंबिवलीत एका वडिलाने आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच, आता अन्य एका घटनेत वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी डोंबिवलीत घडली आहे.
उद्धव ठाकरे गटात अपमानास्पद वागणूक, राजीनामा देताना जळगाव जिल्हा महिला संघटक महानंदा पाटील यांचा आरोप
जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) दोन्ही जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आधीच पक्ष संघटन खिळखिळे झाले असताना महिला जिल्हा संघटक महानंदा पाटील यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे पाटील यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक व शिपाई पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेतील गोंधळ, परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाची दखल घेत परीक्षा रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे दिलेले आश्वासन, यामुळे बँकेची परीक्षा रद्द होते की काय, याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
आधी गळा आवळला, मग रस्त्यावर डोके आपटले; ‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या महिलेची हत्या
अकोला : ‘मॉर्निंग वॉक’ साठी घरातून बाहेर पडलेल्या एका महिलेचा गळा आवळत रस्त्यावर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील जुना हिंगणा मार्गावर घडली.
“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
नागपूर : घरातून चोरी झालेले पैसे आणि दागिने परत मिळतील, अशी आशा कोणालाच नसते. तसेच सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्यानंतर त्यांच्या तावडीतून पैसे परत आणणे हे देखील मोठे जिकरीचे काम असते. त्यामुळे अनेक जण तक्रारसुद्धा देत नाहीत. मात्र, नागपूर पोलिसांनी गेल्या वर्षभरात तब्बल ८० गुन्ह्यांचा छडा लावून चोरी गेलेला ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे : शिवसेनेचे ४० ते ५० जागांवर लक्ष, महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेने (शिंदे) सावध भूमिका घेऊन शहरातील ४० ते ५० जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
‘एनईपी’ अंमलबजावणीनुसार सुविधाप्राप्ती; उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनासाठी ‘यूजीसी’कडून नवे निकष
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिले जाणारे विशेषाधिकार आणि हक्क प्राप्त करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना आता राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीवर भर द्यावा लागणार आहे. या अंमलबजावणीचे मूल्यमापन करून कुणाला किती विशेषाधिकार व हक्क द्यायचे याचा निर्णय होणार आहे. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘देशातील उच्च शिक्षणात गुणवत्ता राखण्यासाठी यूजीसीकडून अधिनियम अधिसूचित करण्यात येतात. यूजीसीचे काही विशेषाधिकार वा हक्क प्राप्त करण्यासाठी यूजीसीच्या काही अधिनियमांत नॅक मूल्यांकनात मिळवलेली श्रेणी वा गुण ग्राह्य धरले जातात. आता, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’च्या अंमलबजावणीवर हे विशेषाधिकार वा हक्क दिले जातील. त्यासाठी द्विस्तरीय मूल्यमापन पद्धती विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार, उच्च शिक्षण संस्थांना गुण दिले जातील. त्या गुणांनुसार विशेषाधिकार व हक्क दिले जातील,’ असे परिपत्रकात म्हटले आहे. या आराखड्यावर हरकती-सूचना मागवण्यात आल्या असून, त्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.