Marathi News Updates : राज्यात गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. या हत्येतील सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान या प्रकणातील आरोपींचा वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान वाल्मिक कराड कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची आक्रमकपणे मागणी करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक सुरू असून, या विषाणूचे काही रुग्ण भारतातही सापडले आहेत. आज राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर नागपूरातही या विषाणूचे दोन संशयीत रुग्ण आढळले आहेत. हे दोन रुग्ण ७ आणि १४ वयाची आहेत. भारतातील एकूण प्रकरणे आता ७ पर्यंत वाढली आहेत.
डोंबिवलीत कोकणातील दोन जणांकडून हत्ती दंताची तस्करी
डोंबिवली : डोंबिवली जवळील २७ गावातील कोकणातील दोन व्यक्तिंकडून मानपाडा पोलिसांनी विक्री करण्यासाठी आणलेले हत्तीचे दोन दात रविवारी संध्याकाळी एमआयडीसी भागात जप्त केले आहेत.
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षाचे हे नगरसेवक आज (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सविस्तर वाचा…
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
वादातून दोन तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
राज्यातील खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याचे पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे. यासाठीची नियमावली आरोग्य विभागाने तयार केली आहे. या नियमावलीनुसारच रुग्णालयांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, डॉक्टरांना नाहक त्रास देऊ नये, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर; नायडू रुग्णालयात विलगीकरणाची व्यवस्था अन् रुग्ण सर्वेक्षण
ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरणासाठी ५० रुग्णशय्या आणि ५ अतिदक्षता रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला लुटले- लुटमारीची तिसरी घटना
हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना घडली. हनुमान टेकडी परिसरात घडलेली लूटमारीची ही तिसरी घटना आहे. सविस्तर वाचा…
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
किमान ५५ टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी मिळविलेले उमेदवारही आता सहायक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकणार आहेत. मानव्यविद्या, वाणिज्य, शिक्षणशास्त्र आदी ठरावीक विद्याशाखांसाठीच ही सवलत मिळणार आहे. सविस्तर वाचा…
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले असले तरी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा…
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात काही आमदारांची कामगिरी अव्वल तर काही तळाशी गेल्याची आकडेवारी आहे. हे अभियान जोरात सूरू आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान हे अभियान चालणार आहे. सविस्तर वाचा…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित आढावा बैठकीत दिल्या. विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून, या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…
नागपूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे परिपत्रक जाहीर केले. यात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती २५ ऑगस्टला साजरी करण्याच्या सूचना दिल्या. यावर अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने आक्षेप घेतला आहे.
साहित्य हाच साहित्यिकांचा धर्म, डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत
पिंपरी : साहित्यिकांना कोणताही जातधर्म नसतो. साहित्य हाच त्यांचा धर्म असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मोशीतील एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, खेडचे आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समिती सदस्या ॲड. माधवी निगडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, डॉ. शिवाजीराव मोहिते, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे यावेळी उपस्थित होते.
‘मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच पातळीवर बदलला पाहिजे. उपेक्षितांचे जिणे आणि सौभाग्याचे लेणे ल्यालेल्या मराठी भाषेने जगाला विश्वात्मकतेच्या धाग्यात बांधले आणि इतिहासाच्या पानापानावर पराक्रमाचा, वैभवाचा, शालीनतेसह औदाऱ्याचा इतिहास सुवर्णअक्षरात लिहिला. व्यापाराची, ज्ञान – विज्ञानाची, व्यवसायाची भाषा म्हणून इंग्रजी भाषेचे जगात प्रचंड स्तोम असताना मराठीची गळचेपी होऊ नये. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वांची जबाबदारी वाढल्याचे’ गावडे म्हणाले.
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले
काटई कर्जत राज्यमार्गावर मंगळवारी सकाळी अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेवाळी ते खोणी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोकण इतिहास परिषदेचे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन, डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
कोकण इतिहास परिषदेच्या १४ वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Marathi News Live Updates : नागपूरमध्ये आढळले एचएमपीव्हीचे दोन रुग्ण
नागपुरात ७ आणि १४ वर्षांच्या दोन मुलांची ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चाचणी पॉझिटिव्ह आली असून, या आजाराच्या रुग्णांची संख्या आता सातवर पोहचली आहे. ताप आणि खोकला लागल्याने या मुलांना ३ जानेवारी रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या चाचण्या घेतल्यानंतर, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी, दोघांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट केले.