Mumbai News Live Today, 29 June 2023: महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत चर्चेत आहे. शरद पवारांनी डबलगेम केला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला ही वक्तव्यं त्यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे आपली २०२४ ला महत्त्वाकांक्षा काय आहे हे देखील बोलून दाखवलं आहे. या मुलाखतीवर विविध प्रतिक्रिया येण्याची चिन्हं आहेत. कोण कोण काय आरोप करणार, काय उत्तरं देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची पूजा केली. तसंच बळीराजाला सुखी कर असं साकडंही घातलं. तर राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची गेल्या ती दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. या आणि अशा सगळ्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra News Live Today: "एकनाथ शिंदे माझे बॉस" असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी

18:23 (IST) 29 Jun 2023
"...मग फडणवीसांनी काय केलं", मोदींच्या ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपावर शरद पवारांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा...

18:21 (IST) 29 Jun 2023
"त्यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर..."; सुप्रिया सुळेंबाबतच्या मोदींच्या आरोपाला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, "खरं आहे..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर गंभीर आरोप केले. घराणेशाहीचा आरोप करतानाच मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचाही गंभीर आरोप केला. यानंतर शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 29 Jun 2023
VIDEO: कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन, लेशपाल जवळगे म्हणाला, "तुम्ही आमच्याशी..."

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात तरुणीला कोयत्याने झालेल्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचंही व्यक्तिगतरित्या कौतुक केलं. भाजपा माजी आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून हा संवाद झाला. यावेळी फडणवीसांशी बोलताना लेशपाल जवळगेनेही आपली भावना व्यक्त केली.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 29 Jun 2023
VIDEO: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसमोर भाजपा नेते भिडले, हातातून माईक ओढला अन्...

राजस्थानमधील जोधपूर येथे भाजपाच्या एका रॅलीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोरच भाजपाचे नेते भिडल्याचं पाहायला मिळालं. या रॅलीत भाजपाच्या नेत्यांनी माजी आमदाराच्या हातातून माईक घेत त्याला बोलण्यापासून रोखलं. त्यानंतर या नेत्यांमध्ये माईकची ओढाओढ झाली. त्यात माईक स्टँडपासून वेगळा झाला. या वादात राजनाथ सिंह यांनाही हस्तक्षेप करावा लागला. यानंतर राजस्थान भाजपामधील गटबाजीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

सविस्तर वाचा...

18:13 (IST) 29 Jun 2023
जळगाव : ‘जानकाबाई की जय’च्या नामघोषात रथोत्सवात भक्तांचा मेळा; पिंप्राळा उपनगरात भक्तिमय वातावरण

जळगाव – प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पिंप्राळा उपनगरातील रथोत्सवास भक्तिमय वातावरणात गुरुवारी दुपारी विठ्ठलनामाच्या गजरात प्रारंभ झाला. जानकाबाई की जय, पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

सविस्तर वाचा...

18:12 (IST) 29 Jun 2023
उपनगरीय रुग्णालयांतील कंत्राटी डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार; बोगस प्रमाणपत्रप्रकरणी महानगरपालिकेचा निर्णय

मुंबई: मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 29 Jun 2023
नागपूर: अल्पवयीन मुलीला रस्त्यावरून उचलले; घरात कोंडून बलात्कार

नागपूर: बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून नेऊन घरात कोंडून बलात्कार करण्यात आला. कशीबशी सुटका केल्यानंतर मुलीने पालकांना घडलेला प्रकार सांगितला.

सविस्तर वाचा...

17:25 (IST) 29 Jun 2023
गृहप्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याची मुभा ही विकासकांसाठी पळवाट! मुंबई ग्राहक पंचायतीचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरण म्हणजेच महारेराने राज्यातील १०७ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याची दिलेली मुभा ही विकासकांसाठी पळवाट असल्याची टीका मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 29 Jun 2023
धक्कादायक..! पाकिस्तानी ध्वज आणि ‘लव्ह पाकिस्तान’ मजकूर छापलेल्या फुग्यांची सोलापुरात विक्री, मुस्लीम बांधवांच्या सतर्कतेमुळे विक्रेत्याला अटक

सोलापूर : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रपणे उत्साहाने आणि मंगलमय वातावरणात साजरी होत असतना सोलापुरात काही असामाजिक शक्ती सक्रिय होऊन शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदानावर समूहिक नमाज अदा झाल्यानंतर ईदगाहबाहेर बालबच्च्यांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या फुग्यांवर चक्क पाकिस्तानचे नाव आणि झेंडे असल्याचे आढळून आले.

सविस्तर वाचा..

17:08 (IST) 29 Jun 2023
अल्पवयीन मुलीला रस्त्यावरून उचलले, घरात कोंडून बलात्कार

मुंबई: मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 29 Jun 2023
आरोग्य दूत तुषार जगतापचा गुटखा तस्करीत सहभाग; पोलिसांच्या ताब्यात

नाशिक: आरोग्य दूत, सामाजिक कार्यकर्ता तसेच भाजपशी संबंधित कार्यकर्ता अशी वेगवेगळी ओळख असलेला तुषार जगताप हा राज्यस्तरावर चालविण्यात येणाऱ्या गुटखा बाजारपेठेचा माफिया निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा...

15:59 (IST) 29 Jun 2023
नागपूर : सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; मेडिकल कर्मचारी संस्थेची…

नागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे निवडणूक घेणे कठीन जाते. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे सांगत सहकारी संस्थांच्या निवडणूक शासनाने पुढे ढकलल्या आहे. त्यामुळे नागपुरातील दि मेडिकल काॅलेज ॲण्ड हाॅस्पिटल एम्प्लाॅईज क्रेडिट सोसायटी लि.ची निवडणूकही इतर संस्थेप्रमाने ३० सप्टेंबरनंतरच होणार आहे.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 29 Jun 2023
शेतातील जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने शेतमजुराचा मृत्यू; वणी तालुक्यातील घटना

यवतमाळ: वणी तालुक्यातील खांदला शिवारात एका शेतात पडून असलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन शिरपूर येथील एका शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 29 Jun 2023
नाशिक : सावाना अभ्यासिकेत प्रवेशासाठी आता ई व्यवस्था, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न

नाशिक – विद्यार्थी विश्वात स्पर्धा परीक्षांची तयारी करताना महाविद्यालयीन ग्रंथालयासह सार्वजनिक अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावतात. येथील सार्वजनिक वाचनालयाची पानसे अभ्यासिका यापैकी एक. नाममात्र शुल्क आकारून विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली अभ्यासिका सध्या कात टाकत आहे. अभ्यासिकेत लवकरच आसन व्यवस्थेसह अन्य बदल होत आहेत. अभ्यासिकेचे प्रवेशद्वार आता बदलण्यात येत असून ई प्रवेशद्वार करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा..

15:36 (IST) 29 Jun 2023
अनधिकृत शाळांची केवळ यादी जाहीर; प्रत्यक्ष कारवाईकडे मात्र प्रशासनाचा कानाडोळा

मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते. नियामांप्रमाणे अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई वा गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र कारवाईची प्रक्रिया थंडावल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध झाेलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

सविस्तर वाचा

15:25 (IST) 29 Jun 2023
आषाढीनिमित्त भाविकांनी फुलली संतनगरी; शेगावात दिंड्यांसह हजारो भाविक दाखल, संध्याकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा

बुलढाणा : ‘होय होय वारकरी, पाहे-पाहे पंढरी’ या पंक्तीप्रमाणे जिल्ह्यातील हजारो वारकरी व भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. मात्र ज्यांना तिथे जाणे जमलेच नाही, ते थेट विदर्भ पंढरी अर्थात शेगावची वाट धरतात. या अलिखित परंपरेप्रमाणे आज संतनगरी विदर्भासह राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी नुसती फुलून गेली आहे.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 29 Jun 2023
यवतमाळ : महिला सहाकारी बँकेच्या संचालक, अधिकाऱ्यांच्या मलामत्तांवर टांच; ९७ कोटींचा अपहार

यवतमाळ : येथील अवसायनात निघालेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील ९७ कोटींच्या वसुलीप्रकरणी बँकेच्या महिला संचालकांसह व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्ता अवसायकांनी गोठविल्या (फ्रिज) आहेत. संचालक आणि अधिकाऱ्यांच्या मालकीच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मालमत्ता विक्रीवर आक्षेप नोंदविण्यात आल्याने त्यांच्या मालमत्तांवर टाच आली आहे.

सविस्तर वाचा...

15:16 (IST) 29 Jun 2023
Police Recruitment : पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; दोन उमेदवारांवर गुन्हा

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुजित शिवाजी साळुंखे (वय २५, रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय २६, रा. वडोली, ता.माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

14:54 (IST) 29 Jun 2023
भंडारा : कर्तव्यावर असलेल्या वनाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या पाचजणांवर गुन्हे दाखल

भंडारा : खातखेडा येथे एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून कर्तव्य बजावत असलेल्या वनाधिकाऱ्यांवर संतप्त जमावाने हल्ला चढवला. यात सहाय्यक वनरक्षक नागुलवार हे गंभीररित्या तर वनपाल वावरे आणि गुप्ता हेसुद्धा जखमी झाले. वनाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी जमावाला चिथावणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या ५ जणांवर पवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

14:11 (IST) 29 Jun 2023
कल्याणमधील दुर्गाडी येथे शिवसैनिकांचे घंटानाद आंदोलन

कल्याण: बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ला येथे हिंदू भाविकांना देवीच्या दर्शनासाठी प्रवेश बंद असतो. हा प्रवेश खुला करावा म्हणून मागील अनेक वर्षापासून शिवसेनेतर्फे सुरू असलेले घंटानाद आंदोलन गुरुवारी सकाळी लालचौकी भागात करण्यात आले.

सविस्तर वाचा...

14:04 (IST) 29 Jun 2023
कॉलेज रोड, गंगापूर रस्त्यावर एकेरी वाहतुकीची गरज; कोंडी फोडण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नियोजन आवश्यक; राष्ट्रवादीचे पोलिसांना साकडे

नाशिक: कॅनडा कॉर्नर ते भोसला प्रवेशद्वार हा कॉलेज रोड आणि जुना गंगापूर नाका ते जेहान सर्कल या गंगापूर रस्त्याला जोडणाऱ्या पाच रस्त्यांच्या चौफुल्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 29 Jun 2023
पुणे : कोयता हल्ल्यात तरूणीला वाचविणाऱ्या युवकांचे फडणवीस यांच्याकडून कौतुक

पुण्यातील सदाशिव पेठेतील हल्ल्यात तरुणीला वाचविणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवर कौतुक करून शुभेच्छा दिल्या. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी संपर्क करून दिला.

सविस्तर वाचा

13:47 (IST) 29 Jun 2023
मोशी क्रिकेट स्टेडियमचा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा घाट कशासाठी घातला आहे. सल्लागाराच्या नावाखाली ७ कोटी ९६ लाख रुपयांची उधळण आयुक्त कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेचा कष्टाचा पैसा मनमानी पद्धतीने उधळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 29 Jun 2023
परदेशात शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेला ५ जुलैपर्यंत मुदतवाढ; सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

सविस्तर वाचा...

13:25 (IST) 29 Jun 2023
धुळे : अंगणवाडी भरतीत भ्रष्टाचार – ठाकरे गटाचा आरोप, नव्याने प्रक्रियेसाठी विभागीय उपायुक्तांना घेराव

धुळे – शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत लाच मागितल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. यासाठी उपायुक्तांना शिष्टमंडळाने तासभर घेराव घातला.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 29 Jun 2023
बेकायदा इमारती, चाळींमुळे कल्याण-डोंबिवली तुंबली

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या १५ वर्षाच्या कालावधीत शहराच्या विविध भागात झालेली अस्ताव्यस्त बेकायदा बांधकामे कल्याण, डोंबिवली शहरे जलमय करण्यास कारणीभूत आहेत. ही बांधकामे करताना नैसर्गिक स्त्रोत, गटारे, विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षित भूखंड भूमाफियांनी हडप केले आहेत.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 29 Jun 2023
पुणे : तरुणीवर कोयत्याने हल्ला प्रकरण, कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसापूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेम प्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीमध्ये तीन कर्मचारी उपस्थित नव्हते.

वाचा सविस्तर...

13:14 (IST) 29 Jun 2023
विदर्भात उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी

अमरावती: दोन महिन्याच्या सुटीनंतर विदर्भात उद्या शुक्रवारी ३० जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.

सविस्तर वाचा...

13:12 (IST) 29 Jun 2023
वसई : ईदच्या दिवशी दुर्घटना, नालासोपारामध्ये विहिरीत २ तरुण बुडाले

वसई : ईदच्या दिवशी नालासोपारामध्ये दुर्घटना घडली आहे. कुर्बानी देऊन घरी परतलेले दोन तरुण विहिरीत बुडाले. त्यापैकी एका तरुणाला बाहेर काढण्यात आले आहे, तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.

सविस्तर वाचा..

13:03 (IST) 29 Jun 2023
Video : १२ वर्षांत लग्नपत्रिकांपासून पक्ष्यांसाठी तयार केली २१०० घरटी; नागपुरातील अशोक तेवानी यांचा उपक्रम

नागपूर : लग्नाचा सिझन म्हणजे घरी कुणा ना कुणाकडील लग्नपत्रिका येऊन पडलेल्या. हल्ली तर या लग्नपत्रिकांचा आकारही मोठा. लग्नसोहळा आटोपल्यावर त्यांचे करायचे काय? एकतर ते अग्नीच्या स्वाधीन करायचे, नाही तर फेकून द्यायचे. त्याचाही योग्य उपयोग होऊ शकतो, कुणाला तरी त्यातून निवारा मिळू शकतो हे तुमच्या-आमच्या गाठीही नसेल, पण सेवानिवृत्त ७२ वर्षीय अशोक तेवानी यांनी ते करून दाखवलंय.

सविस्तर वाचा...

devendra fadnavis cm eknath shinde bjp

देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान! (फोटो - एएनआय)

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत चर्चेत आहे. शरद पवारांनी डबलगेम केला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला ही वक्तव्यं त्यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे आपली २०२४ ला महत्त्वाकांक्षा काय आहे हे देखील बोलून दाखवलं आहे.

Story img Loader