Mumbai News Live Today, 29 June 2023: महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत चर्चेत आहे. शरद पवारांनी डबलगेम केला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला ही वक्तव्यं त्यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे आपली २०२४ ला महत्त्वाकांक्षा काय आहे हे देखील बोलून दाखवलं आहे. या मुलाखतीवर विविध प्रतिक्रिया येण्याची चिन्हं आहेत. कोण कोण काय आरोप करणार, काय उत्तरं देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची पूजा केली. तसंच बळीराजाला सुखी कर असं साकडंही घातलं. तर राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची गेल्या ती दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. या आणि अशा सगळ्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Today: “एकनाथ शिंदे माझे बॉस” असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी
वर्धा: जिल्ह्यातील आदर्श शाळा राज्यात आदर्श ठरण्याचा संकल्प शिक्षकांनी केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्य शासनाने राज्यात ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित केल्या. त्यात वर्धा जिल्ह्यातील आठ शाळा आहेत.
वर्धा: लोकसेवा आयोगामार्फत निवड होत राजपत्रित अधिकारी होण्याचे प्रत्येक होतकरू सुशिक्षीत तरूणाचे ध्येय असते आणि निवड झाल्यावर कधीतरी सनदी अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, अशी सुप्त ईच्छा तो बाळगून असतात.
वाशीम : आज देशभरासह वाशीममध्येही ईद-उल-अज़हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची नमाज इदगाहवर अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
एकेकाळी सर्वसामान्य माणसाचा बँकेशी संबंध हा बहुतांशी फक्त पगार जमा होणे, बचत खाते असणे, काही प्रमाणात मुदत ठेवी करणे आणि थोड्याफार प्रमाणात आई-वडिलांना किंवा शिक्षणासाठी परगावी गेलेल्या मुलांना पैसे पाठवणे एव्हढाच असे.
सामाजिक एकोपा जपण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी राहुल हरिनाथराव सुतार यांनी ‘विठू माऊली तू माऊली जगाची’ हे गीत गायलं आहे. राहुल सुतार यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, आषाढी वारीच्या निमित्ताने हे गायलेलं गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नागपूर: शहरासह राज्यभरात चोरीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. मात्र, परिवहन विभाग म्हणजे आरटीओ कार्यालयही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
महापालिकेने धुळेकरांना नियमितपणे पाणी पुरवठा केलेला नाही. वर्षभरात ४० ते ४८ दिवस पाणी पुरवठा केला असतांना पाणीपट्टी वर्षभराची वसूल केली आहे. दुषित पाण्याचे नमुने घेऊन नागरिकांनी अनेकवेळा निवेदनेही दिली आहेत. त्यानंतरही महापालिकेने या तक्रारींची दखलही घेतली नाही.
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील चिखली घरकुल परिसरात अज्ञात दोघांनी दारूच्या नशेत चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी दोघांना चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सहा जुलैचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होत्या. तसेच सेवाग्राम आश्रमाला भेट देणार होत्या. दौरा वेळेवर रद्द झाल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चुराडा झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आपल्या पदरी काही ठोस पडेल, ही जळगावकरांची अपेक्षा फोल ठरली. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यासह केळी विकास महामंडळासाठी शंभर कोटींची तरतूद आणि बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या आश्वासनांवर जिल्ह्याची बोळवण करण्यात आली.
भायखळा येथील इंदू मिल ऑईल कंपाऊंडमध्ये गुरुवारी मध्यरात्री वडाचे भलेमोठे झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत रेहमान खान (वय२२) यांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. झाडाच्या फांद्यांखाली अडकलेल्या इतर व्यक्तींचा शोध आणि बचावकार्य सध्या सुरू आहे.
नागपूर: बहिणीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
अकोला : पावसामुळे किंवा इतर कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना काळजी करण्याचे कारण नाही. तक्रार करण्यासाठी ग्राहकांना महावितरणने टोल फ्री क्रमांक, मोबाइल ॲप, मिस कॉल व एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार याच पर्यायांद्वारे करावी, असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.
धुळे – धुळेकराना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या आणि नागरिकांकडून दुप्पट, तिप्पट घरपट्टी आकारणाऱ्या अकार्यक्षम महानगर पालिकेविरोधात तीन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी दिला आहे.
सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम असून गुरुवारीही सखल भागात पाणी भरले आहे. त्यामुळे बेस्टचे मार्ग बदलले आहेत. गोवंडी येथे बकरा बाजारात पाणी भरल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३५७, ३७५, ३७६ हे सकाळी ८.४० वाजल्यापासून टाटानगर थांबा नंतर जिजामाता भोसले मार्गाने फ्री वे जंक्शननंतर बस मार्ग क्रमांक १९ च्या मार्गाने सम्राट अशोक नगर व पुढे नियोजित मार्गाने जातील.

काँग्रेसने जातीचे तर मोदींनी विकासाचे राजकारण केले. या नऊ वर्षात देशाचा जगभर सन्मान वाढला. राम मंदिर बांधणारे व ३७० कलम हटविणारे नेतृत्व या देशाला मिळाले आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण तर मोदींचे संतुष्टिकरणाचे राजकारण आहे. गरिबी कमी होत आहे. आगामी तीन वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकाची भारताची अर्थव्यवस्था होणार.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी मोर्चा आयोजित केला असतानाच त्याच दिवशी आदित्य यांचे एक निकटवर्तीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष सध्या तीव्र झाला आहे. दोन्ही गट परस्परांनाना शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अकोला : जिल्ह्यात यंदाही पीककर्ज वाटपाची कूर्मगती कायम आहे. खरीप हंगामाचा एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत केवळ ५२ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. जुन्या कर्ज नूतनीकरणाअभावी नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरत असल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत असल्याचे चित्र आहे.
दि मेडिकल काॅलेज ॲण्ड हाॅस्पिटल एम्प्लाॅईज क्रेडिट सोसायटी लि.च्या नवीन संचालक मंडळासाठी ३ जुलैला आयोजित निवडणूक केंद्राच्या स्थळावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी तीन पॅनलने ही निवडणूक मेडिकल परिसरात घेण्याची विनंती केल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. लोकसत्ताने वृत्त दिल्यावर सहाय्यक निबंधकांनी ही निवडणूक मेडिकलमध्ये घेण्याचे ठरवले आहे.
‘मी पुन्हा येईन, अशी गर्जना करुन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आले खरे, पण त्यांची अवस्था खेळपट्टीवर असूनही बँटिंग मिळत नसलेल्या (‘नॉन स्ट्रायकर’) दिशेच्या बॅट्समनसारखी झाली असल्याने अपेक्षित धावा काढता येत नाहीत.
भारतातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले. त्यानुसार क्रिकेटमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर विश्वचषक स्पर्धेतील यजमान भारताची लढत अमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने मुंबईत खेळणे टाळल्याचं समजतं. पण, नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होत असलेल्या लढतीवरून मनसेने भाजपा आणि शिवसेनेला प्रश्न उपस्थित केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आणखी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त मिळणार आहेत. ही तीन पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवडसाठी २०१८ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. पिंपरी आणि ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्याचे एकत्रित करत आयुक्तालय करण्यात आले.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम मागील दोन आठवड्यांहून अधिक काळ बंद आहे. बॅरिकेडिंगची रूंदी कमी केली तरच परवानगी मिळेल, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली होती. आधी यास नकार देणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अखेर बॅरिकेंडिगची रूंदी कमी करण्यास होकार दिल्याने हे काम आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या स्थूलत्व जनजागृती व प्रतिबंध अभियानांतर्गत ससून रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे. मुख्य टपाल कार्यालय, समाज कल्याण आयुक्त कार्यालय आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालय येथील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्थूलत्व तपासणी करण्यात आली. यात ससूनच्या वैद्यकीय पथकाने सरकारी कर्मचाऱ्यांची वजन, उंची, रक्तदाब आणि रक्तशर्करा तपासणी केली.
नागपूर : ‘ते’ पिलू आईपासून दुरावलेले होते. इकडे त्याची आई विषबाधेला बळी पडली होती. विषबाधा झालेली माकडे सेमीनरी हिल्सच्या ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ला आणली होती. तर दुसरीकडे आईपासून दुरावलेले ते पिलूदेखील तिथे आणले होते आणि अचानक समोर आई दिसताच त्या पिलाने तिला मिठी मारली.
नागपूर : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाड्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गुरुवारी सकाळपासून गर्दी झाली. ‘जय जय विठोबा रखुमाई’, असा जयघोष व टाळ मृदंगाचा नादात आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी आणि दर्शनार्थी येऊ लागले आहेत.
अकोला : आषाढी एकादशीचा महोत्सव महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून या माध्यमातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने प्रभात किड्स स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा बुधवारी चांगलाच रंगला. या बहारदार कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कीर्तन, अभंग, नृत्य, पावली यासह महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवले.
नागपूर : पाच वर्षे जुन्या तक्रारींमध्ये सतत ‘समन्स’ पाठवित राहणे, त्या तक्रारींवर कोणताही निर्णय न घेणे, अशा चुका करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव प्रमोद मानमोडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.
नागपूर : केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानाने अमरावतीच्या एका तरुणीवर सीताबर्डीतील एका ओयो हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बृजेश तोमर (३४), रा. अलीगड, उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे.
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत चर्चेत आहे. शरद पवारांनी डबलगेम केला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला ही वक्तव्यं त्यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे आपली २०२४ ला महत्त्वाकांक्षा काय आहे हे देखील बोलून दाखवलं आहे.