Mumbai News Updates, 23 November 2022 : सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नसताना आता कर्नाटक सरकारने थेट सांगलीतल्या जत तालुक्यामधली ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा विषय दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live, 23 November 2022 : रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाच्या संशयास्पद मृ़त्यूमुळे आश्रमाच्या कामकाजासह विद्यार्थी सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकारानंतर आश्रमातील बालके घाबरली असून प्रचंड दबावाखाली आहेत. पोलीस विभागही याविषयी बोलण्यास तयार नाही.
नवी मुंबई बसणाऱ्या सिडकोच्या सीबीडी येथील मुख्य कार्यालय आवारातच मोठ्या प्रमाणात राडा रोडा अनेक महिन्यापासून पडून आहे. आपणच वसवलेल्या शहराची स्वच्छते कडे सिडकोचे कानाडोळा करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. सिडको आवारात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला हा राडा रोडा अनेक महिन्यापासून पडला असून राडा रोडा ज्या गोंयांत ठेवण्यात आला आहे.
जून महिन्यामध्ये राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीला शिंदे गट पुन्हा जाणार असल्याच्या वृत्तावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्कामोर्तब केलं. शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिंदेंनी आम्ही गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी नेमका हा दौरा कधी आयोजित केला जाणार आहे, यामध्ये शिंदे गटातील सर्व आमदार जाणार का यासंदर्भातील सविस्तर माहिती शिंदेंनी दिलेली नाही. वाचा सविस्तर बातमी...
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो. अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. यावरून आशिष शेलारांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...
आदित्य ठाकरे आज (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी थेट बिहरला जाऊन या नेत्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी. भेटीचे नेमके कारण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत, या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ही भेट राजकीय नव्हती, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर
भिवंडी येथील अंबाडी-भिवंडी रोडवर अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर परिसरात बिबट्यांचा संचार नवीन नसला तरी मानवी वसाहतीत अनाहुतपणे आलेल्या या पाहुण्यासमोर अनेकांनी हिंस्त्र स्वरुपाचे दर्शन घडविले. वडाळा नाका भागातील आयेशानगरात शिरलेल्या बिबट्याला बघायला हजारोंचा जमाव जमला. वन विभागाच्या पथकाने बेशुध्दीचे इंजेक्शन डागल्यानंतर शेकडो जण लाठ्या-काठ्या घेऊन त्याच्यावर धावून गेले. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : समर्थ अभिनयाने रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवून रसिकांवर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना या सीमा वादाला पंडित नेहरुच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा सीमा प्रश्न पंडित नेहरुंमुळे उद्भवला असून त्यांनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे, असे ते म्हणाले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
नागपूर: तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने मुख कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचारासह या आजारावर नियंत्रणासाठी शासन सर्वसमावेशक धोरण तयार करेल. त्यासाठी निधीही दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बातमी वाचा सविस्तर...
ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-ऐरोली स्थानकादरम्यान दिघा स्थानकाचे काम या वर्षा अखेरीस पूर्ण होणार असल्याची माहिती एमआरव्हिसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) देण्यात आली आहे. त्यानंतर प्रवाशांना आणखी एक नवीन स्थानक उपलब्ध होणार आहे.
वसई : ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळच्या व्हि.पी. शुगर्सने शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. याला शेतकरी आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. जोपर्यंत कारखाना उसाचा दर जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमधील शौचालयाच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. ही मागणी मार्गी लावावी यासाठी पतित पावन कामगार महासंघाकडून बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बातमी वाचा सविस्तर...
श्रद्धा वालकरने हत्येच्या आधी केलेलं संभाषण समोर आलं आहे. १८ मे रोजी म्हणजेच मृत्यूच्या काही तास आधी श्रद्धाने हा संवाद साधला होता. श्रद्धाने दुपारी ४ वाजून ३४ मिनिटांनी आपल्या एका मित्राला मेसेज पाठवला होता. पण हा आपला शेवटचा मेसेज असेल याची श्रद्धाला कल्पनाही नव्हती.
नवी मुंबईकरांसाठी मुंबई सागरी मंडळाने वॉटर टॅक्सीची नवी सेवा सुरू केली आहे. नवी मुंबईकरांना अलिबागला केवळ सव्वातासात पोहचता यावे यासाठी बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून या सेवेला सुरुवात होणार असून या वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० आणि ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र ही सेवा केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.
कर्नाटक सरकारने सांगलीतील जत तालुक्यामधील ४० गावांवर दावा सांगण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता राज्यात वातावारण तापलं असून राजकीय नेते व्यक्त होत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला असून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात अत्यंत दुबळं, हतबल सरकार असल्यानेच महाराष्ट्र-कर्नाटक वाद निर्माण होत आहे. महाराष्ट्रात जे सरकार आलं आहे त्यामुळे अनेक राजकीय दरोडेखोरांना आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो असं वाटत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नांदेड : काँग्रेसचे युवानेते खा. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याविरुद्ध केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद राज्यासह देशभरात उमटले असून भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी विविध शहरांमध्ये जोरदार आंदोलन केले. मात्र नांदेडमध्ये या पक्षांनी आंदोलन तर सोडा, साधा खा.गांधी यांच्या वक्तव्याचा निषेधही केला नाही. बातमी वाचा सविस्तर...
अकोला : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री समोरा-समोर उभे ठाकले होते. बातमी वाचा सविस्तर...
पश्चिम बंगाल मधील आसनसोल दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीत दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून किमती ऐवज लुटून नेला होता. या दरोडेखोरांमधील एक दरोडेखोर आसनसोल एक्सप्रेसने भिवंडी-कल्याण येथे येण्यासाठी प्रवास करत असल्याची माहिती आसनसोल पोलिसांनी कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली.
निमखेडी ( जि. बुलढाणा) : जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेल्या भारत जोडो पदयात्राने आज, बुधवारी बुलढाणा जिल्ह्यासह महराष्ट्राचा निरोप घेतला. सकाळी मध्यप्रदेशच्या सिमेत दाखल होताच यात्रेचे स्वागत करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर...
जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटक राज्यात सामील होण्यासाठी केलेल्या ठरावावर आम्ही विचार करतो आहे, असं विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई केले असून यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागात अनेक कामं केली आहेत. ते बघून कर्नाटकची जनता तिथल्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारेल म्हणून ही खोडी काढायचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील युती, भाजपबरोबर मनसेची वाढत चाललेली सलगी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या रूपाने पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीची एकीकरणाची शक्यता अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आरपीआय) आठवले गटामध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यात नवजात बाळ विक्री करण्यासाठी नागपूर शहर देशात कुख्यात ठरत असून आतापर्यंत ४० ते ५० नवजात बाळांची नागपुरातून परराज्यात विक्री झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बातमी वाचा सविस्तर...
कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यातल्या दोन घटनांविषयी आजच्या बातम्या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. इराणच्या फुटबॉलपटूंनी आपल्या देशाचं राष्ट्रगीत गायला नकार दिला- त्याऐवजी हे सारे पुरुष फुटबॉलपटू फक्त उभे राहिले- ही पहिली गोष्ट. सप्टेंबर महिन्यात महासा अमिनी या बावीस वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्यावर स्त्रियांच्या हिजाबच्या सक्तीच्या मुद्द्यावरून इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. बातमी वाचा सविस्तर...
त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षाच्या बालकाची गळा दाबून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला. या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे आधारतीर्थ आश्रमाच्या कामकाजासह,बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. बातमी वाचा सविस्तर...
परभणी: आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार अशी ग्वाही दिल्यानंतरही एक-एक आमदार सोडून जात असताना परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील हे मात्र अविचल राहिले. ‘मातोश्री’शी असलेली निष्ठा त्यांनी जराही ढळू दिली नाही म्हणूनच परभणीत शिवसेना अभेद्य राहिली. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्वत परिषद व अभ्यास मंडळाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. यात प्राचार्य आणि व्यवस्थापन गटात विद्यापीठ शिक्षण मंचाला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे प्रतिस्पर्धी महाआघाडीला धक्का बसला. बातमी वाचा सविस्तर...
धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास भीषण अपघातात शासकीय कामासाठी नाशिक येथे जात असलेले अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जागीच ठार, तर चालक जखमी झाला आहे. चौधरी यांच्याकडे यावलच्या गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. बातमी वाचा सविस्तर...
तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात सध्या वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गावाला लागून व्याघ्रप्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीव गावाशेजारी नेहमीच येत असतात. गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असून अनेकांना वाघ दिसल्याचेही बोलले जात आहे. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली.